Homeमनोरंजनआयपीएल 2025 रेन आरसीबी वि एसआरएच सामन्याचे ठिकाण बंगळुरू पासून लखनऊ चिन्नास्वामी...

आयपीएल 2025 रेन आरसीबी वि एसआरएच सामन्याचे ठिकाण बंगळुरू पासून लखनऊ चिन्नास्वामी स्टेडियमवर बदलले


आयपीएल 2025: इंडियन प्रीमिअर लीग 2025 च्या 65 व्या सामन्याचं ठिकाण बदलण्यात आलं आहे. 23 मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) आणि सनरायजर्स हैदराबाद (SRH) यांच्यात बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडिअममध्ये सामना खेळवला जाणार होता. मात्र आता या सामन्याचं ठिकाण बदलण्यात आलं असून, लखनऊच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी इकाना क्रिकेट स्टेडिअममध्ये सामना खेळवला जाणार आहे. पावसामुळे सामन्याचं ठिकाण बदलण्यात आलं आहे.

बंगळुरुचा हा घऱच्या मैदानावर अखेरचा सामना होता. याचा अर्थ आता बंगळुरुच्या चाहत्यांना विराट कोहलीला चिन्नास्वामी स्टेडिअमवर खेळताना पाहता येणार नाही. बंगळुरु आता आपले दोन्ही शेवटचे सामने लखनऊत खेळणार आहे. सनरायजर्स हैदराबादनंतर लखनऊविरोधात 27 मे रोजी एकाना स्टेडिअममध्ये बंगळुरु संघ खेळताना दिसेल.

सनरायजर्सला लखनऊत थांबण्यास सांगितलं

ESPCCricInfo ने दिलेल्या वृत्तानुसार, सनरायजर्सला मंगळवारी संध्याकाळी बंगळुरुसाठी उड्डाण करायचं होतं. त्यांना बंगळुरुविरोधातील सामन्यासाठी लखनऊमध्येच थांबण्यास सांगण्यात आलं आहे. आरसीबीला मैदान बदललल्याची माहिती मंगळवारी दुपारी देण्यात आली. बंगळुरुच्या हवामान विभागाने यल्लो अलर्ट जारी केल्यानंतर मैदान बदलावं लागलं आहे. हवामान विभागाने गुरुवारपर्यंत जोरदार पावसाचा इशारा दिला आहे.

बंगळुरुच्या चाहत्यांचा हिरमोड

आयपीएल 2025 नव्याने सुरु झाल्यानंतर आरसीबी आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील 17 मे रोजी होणारा सामना पावसामुळे रद्द झाला होता. विराट कोहलीने कसोटीमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर त्याला निरोप देण्याच्या हेतून चाहते सफेद रंगाच्या जर्सीत दाखल झाले होते. पण पावसामुळे त्यांना विराटला खेळताना पाहता आलं नाही. त्यातच आता चिन्नास्वामी स्टेडिअममध्येही ते खेळताना पाहू शकणार नाहीत.

अहमदाबादमध्ये होणार अंतिम सामना

आयपीएल 2025 चा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये 3 मे रोजी खेळला जाणार असल्याचंही बोललं जात आहे. क्वालिफायर 2 चा सामनाही इथेच खेळला जाणार आहे. क्वालिफायर 1 आणि एलिमिनेटर चंदीगढच्या मुल्लांपूर येथे होईल. पण अद्याप आयपीएलकडून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

तुलसीदास मंत्र जप भाव जीवन प्रभाव, हिंदीमध्ये मंत्रजपाचे फायदे, भक्तीबद्दल प्रेरक कथा

0
6 तासांपूर्वीलिंक कॉपी कराआयुष्यात कधीकधी आपले मन कोणत्याही कामात लागत नाही. कधी थकवा, कधी ताण, कधी निराशा आणि कधी मनातील गुंतागुंत आपल्याला पूजा-पाठ,...

भारत वनडे मालिकेसाठी इंग्लंड संघ जाहीर:कोल्सला पहिल्यांदा संधी, जोफ्रा आर्चरचे पुनरागमन; हॅरी ब्रूक कर्णधारपद...

0
भारताविरुद्ध होणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी इंग्लंडने 16 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. ससेक्सचा अष्टपैलू खेळाडू जेम्स कोल्सला पहिल्यांदाच वनडे संघात स्थान मिळाले...

पावसाळ्यात झाडे पडणे ही केवळ नैसर्गिक घटना नाही; ती मानवनिर्मित आपत्ती ! – सुराज्य...

0
झाडांच्या मुळांची गळचेपी करून नागरिकांचा जीव धोक्यात घालणाऱ्यांवर ‘सदोष मनुष्यवधा’चा गुन्हा दाखल करा !  मुंबई : पावसाळ्यात वारंवार झाडे पडण्याच्या घटना या केवळ नैसर्गिक आपत्ती...

उजनी-भीमा नदी प्रदूषण : जनमानसाच्या जीवाशी हा खेळ का ?

0
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची तीन स्मरणपत्रे; कृती अहवाल कधी ? - सुराज्य अभियानाचा सवाल   उजनी जलाशय आणि भीमा नदीतील वाढते प्रदूषण हा आता लाखो नागरिकांच्या आरोग्य,...
spot_img

भारत वनडे मालिकेसाठी इंग्लंड संघ जाहीर:कोल्सला पहिल्यांदा संधी, जोफ्रा आर्चरचे पुनरागमन; हॅरी ब्रूक कर्णधारपद...

0
भारताविरुद्ध होणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी इंग्लंडने 16 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. ससेक्सचा अष्टपैलू खेळाडू जेम्स कोल्सला पहिल्यांदाच वनडे संघात स्थान मिळाले...

सगळ्यांच्या ‘हो ला हो’ करतो:मी सगळ्यांना खूश करतो, माझे स्वतःचे असे व्यक्तिमत्व नाही, मला...

0
प्रश्न– मी २७ वर्षांचा आहे आणि गेल्या काही काळापासून एक विचित्र गोष्ट माझ्या लक्षात येत आहे. जेव्हा मी माझ्या कुटुंबासोबत असतो, तेव्हा एका...

कॉमेडियन म्हणाला- डॉक्टर बनून महिलांचे अवयव बघेन:पोलिसवाला बनायचं नाही, बाबू गप्पीने पोस्ट केला आक्षेपार्ह...

0
प्रसिद्ध कॉमेडियन आणि यूट्यूबर बाबू गप्पी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर वाद निर्माण झाला आहे. यामध्ये ते महिलांबद्दल आक्षेपार्ह गोष्टी बोलत...

ई-रिक्षाला रस्त्यात थांबवणारे मोबाईल ॲप बॅन:चीनी कंपनीच्या ॲपचा गैरवापर होत होता, ब्लूटूथद्वारे कनेक्ट होत...

0
दिल्लीतील ई-रिक्षा चालकांना सध्या एका विचित्र समस्येचा सामना करावा लागत आहे. रस्त्यावर चालत असताना अचानक ई-रिक्षा बंद पडतात आणि पुन्हा सुरू होत नाहीत....
error: Content is protected !!