Homeमहाराष्ट्रLand Mafia Build Tower On Dr Babasaheb Ambedkar Family Land Demolition Order...

Land Mafia Build Tower On Dr Babasaheb Ambedkar Family Land Demolition Order | Dombivli News | बाबासाहेबांच्या वारसांच्या जमिनीवर भूमाफियांचा डल्ला: उभारली बेकायदा 8 मजली टोलेजंग इमारती; आता पालिका करणार कारवाई – Mumbai News

डोंबिवली येथील भूमाफियांनी चक्क भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वारसांच्या नावावर असणारा भूखंडच हडपल्याची गंभीर बाब उजेडात आली आहे. अतिक्रमण करणाऱ्यांनी या ठिकाणी 8 मजली टोलेजंग इमारत बांधली. हे प्रकरण चव्हाट्यावर आल्यानं

?

डोंबिवली लगतच्या दावडी येथे व्यंकटेश पेट्रोल पंपाच्या मागील सेंट जॉन शाळेसमोरील जागेवर भूमाफियांनी अतिक्रमण करून एक 8 मजली इमारत बांधली आहे. मुळात ही जमीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सुपुत्र यशवंत भीमराव आंबेडकर यांच्या नावे आहे. या जमिनीच्या सातबाराच्या उताऱ्यावर वारस म्हणून बाबासाहेबांचे नातू प्रकाश आंबेडकर, आनंदराज आंबेडकर, भिमराव आंबेडकर, रमाताई तेलतुंबडे यांची नावेही आहेत. पण त्यानंतरही भूमाफियांनी या जमिनीवक कब्जा करून ती ताब्यात घेतली.

एका विकासकाने काम सोडले, दुसऱ्याने केले

आपल्या भूखंडावर अतिक्रमण होत असल्याचे लक्षात येताच आनंदराज आंबेडकर यांनी संबधित भूमाफियाला जाब विचारला. तसेच त्याची रिपब्लिकन सेनेच्या पदाधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी आनंद नवसागरे यांनी याप्रकरणी पालिका प्रशासनाकडे तक्रार करत हे अनधिकृत बांधकाम तोडण्याची मागणी केली. मागील अडीच वर्षांपासून नवसागरे या प्रकरणाचा पाठपुरावा केला. मधल्या काळात एका विकासाने या इमारतीचे काम अर्धवट सोडले. त्यानंतर भूमाफियाने दुसऱ्या एका विकासकाच्या मदतीने अर्धवट इमारतीचे काम पूर्ण केले.

2023 मध्ये केली होती पालिकेकडे तक्रार

विशेष म्हणजे 2023 मध्ये या इमारतीचे तळ अधिक एक मजल्याचे बांधकाम झाल्यानंतर याविषयी डोंबिवली पालिका प्रशासनाकडे तक्रार करण्यात आली. त्यावर पालिकेने नोटीस बजावण्याशिवाय दुसरी कोणतीही कारवाई केली नाही. पण आता जनक्षोभ उसळल्यानंतर पालिका प्रशासनाने या प्रकरणी विकासकावर एमआरटीपी अंतर्गत मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तसेच वादग्रस्त इमारत 20 मे रोजी पाडण्याची कारवाई केली जाणार असल्याचेही स्पष्ट केले आहे. पालिकाने या कामासाठी पोलिसांकडे बंदोबस्ताची मागणी केली आहे.

डोंबिवलीत भूमाफियांचा अक्षरशः कहर

उल्लेखनीय बाब म्हणजे कल्याण डोंबिवली येथील बेकायदा बांधकामांचा प्रश्न अत्यंत क्लिष्ट बनला आहे. भूमाफियांनी पालिकेचे बनावट दस्तऐवज बनवून रेरा घोटाळा केल्याची बाब समोर आली आहे. रेरा घोटाळ्यातील 65 बेकायदा बांधकामाविरोधात वास्तुविशारद संदीप पाटील यांनी एक जनहित याचिका दाखल केली होती. त्यानंतर कोर्टाने सदर अवैध बांधकाम पाडण्याचे आदेश दिलेत. दरम्यान, भूमाफियांनी शहरातील मोकळ्या जागांवर कब्जा तर केला आहेच, शिवाय पालिकेच्या आरक्षित जमिनींवरही टोलेजंग इमारती बांधल्याचे उजेडात आले आहे.

हे ही वाचा…

बीड भाजप जिल्हाध्यक्षपदाची नियुक्ती रखडली:पंकजा मुंडे – सुरेश धस यांच्यातील संघर्षाचा परिणाम? देशमुखांवरच विश्वास का? चर्चेला उत

बीड – भाजपने मंगळवारी राज्यातील 36 जिल्ह्यांसाठी 58 जिल्हाध्यक्षांच्या नावांची घोषणा केली. या माध्यमातून भाजपने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांची जोरदार तयारी केली आहे. पण सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे चर्चेत आलेल्या बीड जिल्ह्यात भाजपने आपला जिल्हाध्यक्ष दिला नाही. मंत्री पंकजा मुंडे व आमदार सुरेश धस यांच्या वादामुळे ही नियुक्ती रखडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. वाचा सविस्तर



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

माजी CEC राजीव कुमार HDFC चे अध्यक्ष:हरियाणा राजस्थानला देणार वार्षिक 580 दशलक्ष घनमीटर पाणी,...

0
आजच्या प्रमुख चालू घडामोडी, ज्या सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत- राष्ट्रीय (NATIONAL) 1. जनरल उपेंद्र द्विवेदी पदावरून निवृत्त आर्मीत जनरल 2....

दुःखी पती-पत्नीला संतांचा उपदेश:वैवाहिक जीवनात सुख नशिबाने नाही, तर परस्पर सामंजस्य, प्रेम, धैर्य, आदर...

0
फार जुन्या काळातील एक लोककथा आहे. एका छोट्या गावात एक जोडपे (दंपत्ती) राहत होते, त्यांचे वैवाहिक जीवन खूप सुखी होते. पती आपल्या पत्नीवर...

इंग्लंड विरुद्ध डीआर काँगो, बेल्जियम विरुद्ध सेनेगल, यूएसए विरुद्ध बोस्निया

0
मराठी बातम्याखेळफिफा विश्वचषक 2026: इंग्लंड विरुद्ध डीआर काँगो, बेल्जियम विरुद्ध सेनेगल, यूएसए विरुद्ध बोस्नियाक्रीडा डेस्क2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराफिफा विश्वचषक २०२६ मध्ये इंग्लंड आणि...

विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवर विठूनामाचा गजर:संत गजानन महाराजांच्या दिंडीचे वाढोण्यात जंगी स्वागत

0
गण गण गणात बोते, जय जय रामकृष्ण हरी च्या गजरात निघालेल्या श्रीक्षेत्र शेगाव येथील संत गजानन महाराज पायी दिंडीचे बुधवारी ता. 1 मराठवाड्यात...
spot_img

इंग्लंड विरुद्ध डीआर काँगो, बेल्जियम विरुद्ध सेनेगल, यूएसए विरुद्ध बोस्निया

0
मराठी बातम्याखेळफिफा विश्वचषक 2026: इंग्लंड विरुद्ध डीआर काँगो, बेल्जियम विरुद्ध सेनेगल, यूएसए विरुद्ध बोस्नियाक्रीडा डेस्क2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराफिफा विश्वचषक २०२६ मध्ये इंग्लंड आणि...

‘नेट बॉलर’ पासून ‘मॅच विनर’ पर्यंत:भारतीय वंशाच्या जयने आयर्लंडसाठी 5 बळी घेतले; कधीकाळी टीम...

0
राजस्थानच्या टोंक जिल्ह्यातील जय मुंदडाने रविवारी संपलेल्या दोन सामन्यांच्या मालिकेत आयर्लंडकडून खेळताना भारताच्या विरोधात पाच बळी घेतले. तो सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये दुसऱ्या...

वॉशिंग मशीन बाल्कनीमध्ये ठेवणे योग्य आहे का?:जाणून घ्या देखभाल टिप्स, 12 खबरदारी, किती दिवसांनी...

0
वॉशिंग मशीन आज जवळपास प्रत्येक घराची गरज बनली आहे. बहुतेक घरांमध्ये ती तुम्हाला बाल्कनीमध्ये ठेवलेली दिसेल. लोक जागा वाचवण्यासाठी असे करतात. हे सोयीचे...

‘आवारापन 2’ चा टीझर प्रदर्शित:चित्रपट 14 ऑगस्ट रोजी जगभरातील थिएटरमध्ये प्रदर्शित होईल

0
सुमारे दोन दशकांच्या प्रतीक्षेनंतर, इम्रान हाश्मी अभिनित 'आवारापन 2' या चित्रपटाने अखेर आपली पहिली झलक प्रेक्षकांसमोर सादर केली आहे. कल्ट चित्रपट 'आवारापन'चा वारसा...
error: Content is protected !!