T20 विश्वचषक 2026 : 7 फेब्रुवारीपासून टी 20 वर्ल्ड कप 2026 ला सुरुवात होणार असून यंदाचा वर्ल्ड कप हा भारत आणि श्रीलंका या देशांमध्ये खेळवला जाईल. या स्पर्धेत यंदा 20 संघांचा समावेश असून यातील संघ एक एक करून त्यांचे वर्ल्ड कप संघ जाहीर करू लागले आहेत. अशातच भारताच्या शेजारील देश नेपाळने सुद्धा टी 20 वर्ल्ड कप 2026 साठी संघाची घोषणा केली आहे. 23 वर्षांचा ऑलराऊंडर रोहित पौडेल याला नेपाळ संघाचा कर्णधार म्हणून निवडण्यात आलं आहे. तर उपकर्णधार म्हणून दीपेंद्र सिंह याचं नाव जाहीर करण्यात आलंय.
नेपाळचा संघ हा टी20 वर्ल्ड कप 2024 मध्ये केलेल्या निराशाजनक प्रदर्शनाला सुधारू इच्छित असेल. हा 15 सदस्यीय संघ फिरकी गोलंदाजी, ऑलराउंडर खेळाडूंमधील खोली आणि फलंदाजीतील वाढता दबाव सहन करण्याची क्षमता यांवर बनवला गेला आहे. यात संदीप लामिछाने हा स्पिन गोलंदाजीची कमान सांभाळेल, त्याच्याकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा खास अनुभव आहे. तसेच तो स्पिनर ललित राजबंशी सोबत मिळून चांगली गोलंदाजी करतील. त्याला सहकारी स्पिनर दीपेंद्र सिंग ऐरी आणि बसीर अहमद यांचीही साथ मिळेल. दीपेंद्र, गुलशन झा, आरिफ शेख आणि सोमपाल कामी हे नेपाळच्या ऑलराऊंडर खेळाडूंचा कणा असतील.
हेही वाचा : बांगलादेशचा माज उतरला! टी 20 वर्ल्ड कप संदर्भात ICC ने दिल्या सूचना
कुशल भुर्तेलवर संघाला आक्रमक सुरुवात करून देण्याची जबाबदारी असणार आहे. विकेटकिपर आसिफ शेख हा स्टंपच्या मागील कामगिरी पार पडेल. तर लोकेश हा मिडल ऑर्डरला स्थिर करण्यात आणि संघाला सपोर्ट देण्यात मदत करेल. सहा सलामीवीरांसह संदीप जोरा आणि नंदन यादव फलंदाजीमध्ये संघासाठी चांगली कामगिरी करतील. सोमपाल कामी आणि करण केसी हे वेगवान गोलंदाजीचे नेतृत्व करतील.
कोणासोबत होणार सामने?
पुरुष टी20 वर्ल्ड कप 2026 मध्ये नेपाळला ग्रुप सी मध्ये ठेवले गेले आहे. नेपाळ 8 फेब्रुवारी रोजी इंग्लंड विरुद्ध सामना खेळेल. त्यानंतर 12 फेब्रुवारी रोजी त्यांचा सामना इटली सोबत होईल. 15 फेब्रुवारी रोजी नेपाळ विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात सामना होईल. 17 फेब्रुवारी रोजी त्यांचा सामना हा बांगलादेश सोबत होईल.
टी20 वर्ल्ड कपमध्ये नेपाळचा संघ :
रोहित पौडेल (कर्ंधर), दीपेंद्र सिंग ऐरी, संदीप लामिछाने, कुशल भुरटेल, आसिफ शेख, संदीप जोरा, आरिफ शेख, बसीर अहमद, सोमपाल कामी, करण केसी, नंदन यादव, गुलशन झा, ललित राजबंशी, शेर मल्ला, लोकेश बाम.






























