ऑटो न्यूज महिंद्रा कार : मागील दशकभराच्या काळात भारतानं तंत्रज्ञान विश्वातसुद्धा झपाट्यानं बदल झाले असून, कार हा विषय फक्त चारचाकी वाहनापुरता सीमित राहिला नसून, त्याहीपलिकडे एक अद्ययावत Vehicle म्हणूनही त्याकडे पाहिलं जात आहे. सुरुवातीला कारमध्ये AC आले तेव्हा त्याचं अनेकांनाच कौतुक वाटतं, तिथपासून ते अगदी आतापर्यंकत एका बटणाच्या क्लिकवर कारमध्ये होणारे बदल अनेकांनाच भारावणारे आहेत. अशा आधुनिकतेवर भर देणाऱ्या आणि देशातील अग्रगण्य कार उत्पादक कंपन्यांपैकी एक असणाऱ्या महिंद्रा अँड महिंद्रा या कंपनीनं नुकतीच ग्लोबल प्रिमीयम इवेंटमध्ये दमदार कार लाँच केली.
कार नव्हे, रस्त्यावर चालणारं एक दमदार मशीन, थिएटर..
महिंद्रानं लाँच केलेल्या या कारचं व्हेरिएंट पाहिलं असता ही फक्त एक कार नाही, तर हे एक दमदार आणि अद्ययावत तंत्रज्ञानानं परिपूर्ण असं यंत्र आहे असंच अनेकांचं मत. 5 जानेवारी रोजी महिंद्राकडून ही कार भारतीय ऑटो क्षेत्रात विक्रीसाठी अधिकृतरित्या उपलब्ध करून देण्यात आली. अशा या अफलातून मॉडेलचं नाव आहे Mahindra XUV 7XO. 14 जानेवारी 2026 रोजी मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर या कारचं बुकिंग सुरू केलं जाणार आहे, तर तिची टेस्ट ड्राईव्ह 8 जानेवारीला सुरू होणं अपेक्षित आहे. प्राथमिक माहितीनुसार या कारची एक्स शोरुम किंमत 13.66 लाख रुपये आहे.
साधारण 5 वर्षांपूर्वी कंपनीनं XUV 700 लाँच केली होती. ही नवी एसयुव्ही त्याच कारचं लेटेस्ट जनरेशन मॉडेल आहे, जिला नवं नावही देण्यात आलं आहे. या कारमध्ये अनेक बदल करण्यात आले असून, कंपनीच्या दाव्यानुसार यामध्ये ADAS तंत्रज्ञानाचाही वापर केला जात आहे. आहे Mahindra XUV 7XO साठी नव्या इलेक्ट्रीक वाहनांकडून प्रेरणा घेण्यात आली असून, यामध्ये बरेच डिझाईन एलिमेंट, XEV 9S आणि XEV 9Eमधून घेण्यात आले आहेत. या एसयुव्हीमध्ये बूमरँग शेप डे टाईम रनिंग लाईट, ट्रॅपजॉईडल फ्रंट एलईडी हेडलँप, रिवाईज़्ड फ्रंट ग्रिल देण्यात आली आहे.
कार आतून कशी दिसते माहितीये?
महिंद्राच्या या दमदार एसयुव्हीच्या आल अपहोल्स्ट्री कलर थीम असून, त्यामध्ये सर्वात मोठा बदल ट्रीपल स्क्रीन सेटअपच्या रुपात पाहता येतो. ज्यामध्ये डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, सेंट्रल इंफोटेनमेंट स्क्रीन, फ्रंट पॅसेंजरसाठी वेगळी स्क्रीन यांचा समावेश आहे. याशिवाय नवं टू स्पोक व्हील, टच बेस्ड HVAC कंट्रोल पॅनल, पॅनोरॅमिक सनरुफ, वेंटिलेटेड फ्रंट सीट, फ्रंड पॅसेंजरसाठी पॉवर्ड बॉस मोड, 16 स्पीकर हार्मन कार्डन साऊंड सिस्टीम, डॉल्बी अॅटमॉस आणि क्लायमेट कंट्रोल असे फीचर मिळतात.
चेतावणी: उपस्थिती इतकी आश्चर्यकारक आहे की तुम्हाला पुन्हा पहावेसे वाटेल.
XUV 7XO शेवटी आले आहे. किंमत ₹13.66 लाखापासून सुरू होते*#XUV7XO #MahindraXUV7XO pic.twitter.com/sPjGqq3gri— महिंद्रा XUV 7XO (@Mahindra_XUV7XO) 5 जानेवारी 2026
ही नवीन वर्षाची भेट आहे ज्याची तुम्ही वाट पाहत आहात.
काल संध्याकाळी वर्ल्ड प्रीमियरमध्ये Mahindra XUV 7XO चे स्पॉटलाइटमध्ये पाऊल टाका.
14 जानेवारी 2026 रोजी बुकिंग सुरू होईल. pic.twitter.com/Fdp8IbNB1v— महिंद्रा XUV 7XO (@Mahindra_XUV7XO) 6 जानेवारी 2026
महिंद्राच्या दाव्यानुसार ही कार देशातील पहिल्यावहिल्या डॉल्बी विजन आणि डॉल्बी अॅटमॉससह उपलब्ध असून, त्यामध्ये डॅशबोर्डमध्ये देण्यात येणारं पॅनोरामिक डिस्प्ले कारच्या केबिनमध्ये असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी अद्भूत अनुभव देणारं असेल. याशिवाय कारमध्ये वेन्यूएस्केप नावाचं एक फिचर असून त्यामुळं उत्तम ऑडिओ क्वालिटी मिळते. कारमध्ये अॅलेक्सा, चॅट जीपीटी इनेबल्ड केबिन असून, भारतात हे फिचर पहिल्यांदाच कोणत्या कारमध्ये देण्यात आले आहेत.
कुठंही तडजोड नाही…
महिंद्राच्या या कारमध्ये 200 बीएचपी पॉवर असणारं 2.0 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन असून, ते 185 बीएचपी इतकी पॉवर जनरेट करतं. कारमध्ये सुरक्षिततेबाबत कंपनीनं कोणतीही तडजोड केली नसून, त्यामध्ये 540 डिग्री कॅमेरा, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक ऑटो होल्ड असे साधारण 75 सेफ्टी फिचर दिले आहेत.






























