Homeमनोरंजनऑटो न्यूज SUV डिझेल कार Tata Nexon Kia Syros शीर्ष मायलेज वैशिष्ट्ये

ऑटो न्यूज SUV डिझेल कार Tata Nexon Kia Syros शीर्ष मायलेज वैशिष्ट्ये


ऑटो न्यूज SUV डिझेल कार: पेट्रोलच्या वाढत्या दरांनी अनेक सामान्य कारमालकांना घाम फोडलेला असतानाच आता काही मंडळी डिझेल कारच्या पर्यायांचा विचार करत आहेत. भारतात मागच्या काही वर्षांत डिझेल कारचा खप तुलनेनं कमी झाला, ही वस्तूस्थिती असली तरीही या कारची मागणी मात्र थांबलेली नाही. यामागे काही महत्त्वाचे घटक कारणीभूत आहेत. त्यापैकी एक कारण म्हणजे कारचं मायलेज. इतकंच नव्हे तर कारचं परफॉर्मन्स, लांबच्या प्रवासात कमी इंधनखर्च यासुद्धा डिझेल वाहवनांच्या जमोच्या बाजू.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

दैनंदिन प्रवास करणाऱ्यांसाठी आणि महामार्गांवर अधिकाधिक प्रवास करणाऱ्यांसाठी डिझेल कार हा एक किफायतशीर आणि उत्तम पर्याय आहे. त्यातही डिझेल एसयुव्ही एक फायदेशीर निवड. पण, यातही नेमक्या कोणत्या कार निवडायच्या? हा प्रश्न तुमच्या मनात घर करत असेल तर पाहा खालील निवडक पर्याय…

किआ सोनेट डिझेल

एसयुव्ही खरेदीदारांमध्य किआ सॉनेट (Kia Sonet Diesel) ही कार बरीच लोकप्रिय आहे. यामध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक असे दोन्ही वर्जन उपलब्ध होतात. राहिला मुद्दा मायलेजचा, तर ही कार प्रति लीटर डिझेलमध्ये 18.6 ते 22.3 किमी इतकं मायलेज देते. या कारची किंमत 8.98 लाख ते टॉप व्हेरिएंट 14.09 लाख रुपये इतकी आहे.

महिंद्रा XUV 3XO

महिंद्राची ही सर्वात स्वस्त एसयुव्ही. 1.5 लीटर डिझेल इंजिन असणारी ही कारसुद्धा मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक वर्जनमध्ये मिळते. ही एसयुव्ही 20.6 ते 21.2 किमी प्रति लीटर डिझेल इतकं मायलेज देते. या कारची किंमत 8.95 ते 13.43 लाख रुपये इतकी आहे.

टाटा नेक्सॉन डिझेल

भारतात सर्वाधिक विकली जाणारी कॉम्पॅक्ट एसयुव्ही म्हणून टाटा नेक्सॉनची ओळख. या कारचं डिझेल वर्जन 1.5 लीटर इंजिनसह विक्रीस उपलब्ध असून यामध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्स मिळतो. या कारचं ऑटोमॅटिक वर्जन 24.08 किमी प्रति लीटर, तर मॅन्युअल वर्जन 23.23 किमी प्रति लीटर इतकं मायलेज देत असून 9.01 लाख (एक्स शोरुम) ते 14.05 लाख रुपये इतक्या किमतीत ही कार उपलब्ध आहे.

Hyundai ठिकाण डिझेल, Kia Syros डिझेल

Hyundai Venue ही डिझेल कार 17.9 ते 20.99 किमी प्रति लीटर इतकं मायलेज देते. ज्या कारची किंमत 9.70 लाख ते 15.69 लाख रुपये इतकी आहे. डिझेल एसयुव्हीमध्ये Kia Syros Diesel हासुद्धा चांगला पर्याय असून ही कार 17.65 ते 20.75 किमी प्रति लीटर इतकं मायलेज देते. कारच्या मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक वर्जननुसार हे मायलेज बदलतं. या कारची किंमत 10.14 लाख ते 15.94 लाख रुपये इतकी आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

अमृतसरमध्ये बॉयफ्रेंडला जिवंत जाळले:ब्रेकअपनंतर भेटायला आला होता, गर्लफ्रेंड आणि तिचा चुलत भाऊही भाजले, दोघांना...

0
अमृतसरमध्ये गर्लफ्रेंडने चुलत भावासोबत मिळून बॉयफ्रेंडला जिवंत जाळले. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. आग लागल्यावर संतापलेल्या बॉयफ्रेंडने दोघांनाही आपल्याकडे ओढले. त्यामुळे गर्लफ्रेंड आणि तिचा...

पुणे शहरात विविध अपघातांत 3 जणांचा मृत्यू:कात्रज बाह्यवळण मार्ग, मांजरी, लोणीकंद परिसरात घटना

0
पुणे शहरात झालेल्या वेगवेगळ्या अपघातांमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे. कात्रज बाह्यवळण मार्ग, मांजरी आणि पुणे-अहमदनगर रस्त्यावरील लोणीकंद परिसरात या अपघाताच्या घटना घडल्या...

स्वामी अवधेशानंदजी गिरी यांचे जीवनसूत्र:आपले विचार सकारात्मक, वाणी मधुर आणि संयमित असावी, सर्व लोकांशी...

0
मराठी बातम्याजीवन मंत्रधर्मअवधेशानंद गिरी महाराज जीवन धडा. ज्ञान सत्य प्रकट करते; आपले विचार सकारात्मक असले पाहिजेत, आपले बोलणे दयाळू आणि आदरयुक्त असले पाहिजे...

इंग्लंडविरुद्ध भारत सलग चौथी वनडे मालिका जिंकण्यासाठी मैदानात उतरेल:दुसरा सामना आज; कार्डिफमध्ये 15 वर्षांपासून...

0
भारताला इंग्लंडविरुद्ध सलग चौथी वनडे मालिका जिंकण्याची संधी आहे. टीम इंडियाने 2021 मध्ये घरच्या मैदानावर 2-1 ने, 2022 मध्ये इंग्लंडमध्ये 2-1 ने आणि...
spot_img

इंग्लंडविरुद्ध भारत सलग चौथी वनडे मालिका जिंकण्यासाठी मैदानात उतरेल:दुसरा सामना आज; कार्डिफमध्ये 15 वर्षांपासून...

0
भारताला इंग्लंडविरुद्ध सलग चौथी वनडे मालिका जिंकण्याची संधी आहे. टीम इंडियाने 2021 मध्ये घरच्या मैदानावर 2-1 ने, 2022 मध्ये इंग्लंडमध्ये 2-1 ने आणि...

वनडे व टी-20 विश्वचषक नव्या फॉरमॅटमध्ये होईल:वनडेत सुपर-7 द्वारे सेमीफायनलिस्ट, टी-20 मध्ये सुपर-10 ने...

0
ICC ने पुरुष एकदिवसीय आणि टी-20 विश्वचषकाच्या फॉरमॅटमध्ये बदलांना मंजुरी दिली आहे. एकदिवसीय विश्वचषकात 14 संघांसह नवीन थ्री-स्टेज फॉरमॅट लागू होईल, ज्यात पहिल्यांदाच...

जगन्नाथ रथयात्रा पुरी 2026

0
1 दिवसापूर्वीलिंक कॉपी कराभगवान जगन्नाथांची रथयात्रा १६ जुलै रोजी सुरू होईल आणि २४ जुलैपर्यंत चालेल. हा सर्वात मोठ्या धार्मिक उत्सवांपैकी एक आहे. दरवर्षी...

आमिर खानची लव्ह जिहादची प्रतिक्रिया; गौरी स्प्रेट विवाह पंक्ती

0
37 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करातिसरं लग्न केल्यानंतर अभिनेता आमिर खानला सोशल मीडियावर लव्ह जिहादचा ब्रँड ॲम्बेसेडर म्हटलं जात आहे. आमिरने या आरोपांवर स्पष्टीकरण दिलं...
error: Content is protected !!