Homeमहाराष्ट्रनागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपने चौथ्यांदा बाजी मारली आहे

नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपने चौथ्यांदा बाजी मारली आहे


नागपूर महानगरपालिका: नागपूर महापालिका ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे या भाजपाच्या दिग्गज नेत्यांची होमपीच आहे. एकेकाळी काँग्रेसचा वरचष्मा राहिलेली नागपूर महानगरपालिकेवर गेल्या तीन टर्म पासून भाजपाचं वर्चस्व आहे. यंदाही पुन्हा एकदा नागपूर महानगरपालिका काबीज करण्याकरता जोमात कामाला लागलेली आहे. मात्र यंदा काँग्रेसमध्येही बरीच सुसूत्रता दिसून आली त्यामुळे भाजपाला चांगली टक्कर देणार असल्याची चिन्ह आहे.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

नागपूर महानगरपालिकेच्या 151 जागांसाठी 992 उमेदवार रणांगणात आहे. भाजपान यंदा 60 पेक्षा जास्त माजी नगरसेवकांना थांबवत तरुण रक्ताला संधी दिलीय. मात्र बंडखोरांनी भाजपच्या काही प्रमाणात अडचणी वाढवल्या आहे. महापालिकेत भाजप- शिवसेना युती मिळून पुढे जात असताना भाजप 143 जागांवर तर शिवसेना 8 जागावर लढत आहे. गेल्या वेळेस भाजपाने 108 जागा जिंकल्या होत्या यंदा त्यापेक्षा जास्त जागी विजय मिळवण्याचा मानस भाजपचा आहे.

दुसरीकडे यंदा काँग्रेस तिकीट वाटपापासून, बंडखोरी क्षमवण्यामध्ये बऱ्यापैकी यशस्वी झालीये. यंदा पक्षांतर्गत वादविवादापासून दूर राहत काँग्रेसने उमेदवारी दिलीय. मात्र बसपा, वंचित, MIM उमेदवार काँग्रेससाठी डोकेदुखी ठरणार आहे. काँग्रेसचे काही चांगले उमेदवार ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपाकडे गेले असले तरी यंदा महापालिकेत 151 जागा लढणारा काँग्रेस एकमेव पक्ष आहे. गेल्या वेळेसच्या तुलनेत यंदा काँग्रेस यंदा मोठी झेप घेण्याच्या तयारीत असल्याचा दावा पक्षाचे नेते करत आहे.

हेही वाचा : जालना मनपा निवडणुकीत बिहारचा मुद्दा, हिजाबवरून इम्तियाज जलील आक्रमक

नागपूर महापालिकेत गेल्या वेळेस बसपची चांगलीच ताकद दिसून आली होती. 2017 मध्ये तब्बल दहा जागा बसपने जिंकल्या होत्या तर 22 जागांवर बसपाचे उमेदवार दुसऱ्या स्थानावर राहिले होते.  यंदाही सत्तेचे समीकरण आमच्या सभोवतालाच फिरतील असा दावा बसप कडून करण्यात येतोय. उत्तर नागपूरातील प्रभागामधील बसपाच्या कामगिरीकडे सगळ्यांचाच लक्ष राहणार आहे.

राज्याच्या उपराजधानीत भाजपला यंदा काँग्रेस कडून कडवाआव्हान उभ करण्यात आल आहे. काँग्रेसकडे पारंपारिक वोट बँक आहे. तर भाजपकडे कार्यकर्त्यांची फळी आणि संघटन शक्ती पुन्हा एकदा पक्षाला महापालिकेत सत्तेच बळ देण्यास पुरेस ठरतं का? हे 16 तारखेला स्पष्ट होईल.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...

0
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...
spot_img

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
error: Content is protected !!