Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्र हवामान बातम्या 3 जानेवारी 2026 हवामान अपडेट जम्मू काश्मीरमध्ये थंडीची लाट...

महाराष्ट्र हवामान बातम्या 3 जानेवारी 2026 हवामान अपडेट जम्मू काश्मीरमध्ये थंडीची लाट हिमवर्षाव मराठवाडा विदर्भ मुंबईच्या तापमानावर परिणाम करेल


महाराष्ट्र हवामान बातम्या: महाराष्ट्रात पुढील 48 तासांमध्ये तापमानात चढ-उतार अपेक्षित असल्याचा इशारा हवामान विभागानं जारी केला आहे. राज्याच्या काही भागांमध्ये असणाऱ्या ढगाळ वातावरणामुळं ही स्थिती निर्माण होत असून त्यावर उत्तरेकडे झालेली तामपानातील घटसुद्धा परिणाम करताना दिसणार असल्यानं गारठा राज्यात मोठया मुक्कामी असेल असा प्राथमिक अंदाज आहे.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात पारा 10 ते 12 अंशांदरम्यान असेल. तर, ही सरासरी आकडेवारी वगळता निफाड, परभणी इथं रात्रीच्या तापमानात आणखी घट होऊ शकते. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये तापमानात काहीसे चढ- उतार अपेक्षित असून पुढील 24 तासांमध्ये सूर्य डोक्यावर येताच उन्हाचा तडाखा बसणार आहे, तर दुपारनंतर मात्र तापमानात किंचित घट अपेक्षित आहे. कोकणातही हवामानाचं असंच चित्र अपेक्षित असून पहाटे आणि रात्री तापमानात घट होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान राज्यात सरसरट किंचित तापमानवाढ अपेक्षित असून, उत्तर महाराष्ट्रात मात्र पारा 1 ते 2 अंशांनी घसरेल, तर दाट धुक्यामुळं दृश्यमानता कमी होणार असून त्याचा परिणाम रस्ते, रेल्वे आणि हवाई वाहतुकीवर होताना दिसेल असा अंदाज आहे.

देशभरात धुक्याचा कहर आणि थंडीची लहर!

केंद्रीय हवामानशास्त्र विभाग अर्थात आयएमडीनं वर्तवलेल्या अंदाजानुसार उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, लडाख आणि जम्मू काश्मीरसारख्या पर्वतीय क्षेत्रांमध्ये अतीव उंचीवर ढगाळ वातावरण असल्या कारणानं काही भागाना पावसाचा तर, काही भागांना बर्फवृष्टीचा इशारा जारी करण्यात आला आहे. काश्मीरमध्ये सुरू असणाऱ्या चिल्ला ए कलांमुळं तापमानात हे बदल होत असल्याचं सांगण्यात येत आहे. तर, उत्तर भारतात थंडीच्या लाटेमुळं अडचणी वाढणार आहेत. 3 ते 5 जानेवारीदरम्यान दिल्ली, राजस्थान, हरियाणा, पंजाब, युपी, बिहार, मध्य प्रदेश इथं भीषण धुक्याची लाट दिसून येईल. ज्यामुळं या भागांना धुक्याचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, दक्षिण भारतात विजांच्या कडकडाटासह किनारपट्टी भागांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

धुक्याचा यलो अलर्ट असल्या कारणानं रेल्वे आणि हवाई वाहतूकीसह रस्ते वाहतुकीवरही याचा परिणाम होणार आहे. ज्यामुळं काही रेल्वे रद्द किंवा उशिरानं धावतील. प्रामुख्यानं उतर भारतातून महाराष्ट्र आणि देशाच्या इतर भागांमध्ये जाणाऱ्या रेल्वेसेवांवर याचा अधिक परिणाम दिसेल. त्यामुळं प्रवाशांनी पूर्वकल्पनेसह प्रवास करत वेळोवेळीची माहिती हाताशी ठेवावी असंही आवाहन करण्यात येत आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...

0
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...
spot_img

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
error: Content is protected !!