Homeमनोरंजनराजीनाम्यानंतर पाकिस्तानचे माजी प्रशिक्षक जेसन गिलेस्पी यांनी उघड केले मोहसीन नक्वीबद्दल धक्कादायक...

राजीनाम्यानंतर पाकिस्तानचे माजी प्रशिक्षक जेसन गिलेस्पी यांनी उघड केले मोहसीन नक्वीबद्दल धक्कादायक सत्य


जेसन गिलेस्पी: ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटर जेसन गिलेस्पीने ( Jason Gillespie) पुन्हा एकदा पाकिस्तान क्रिकेटची (Pakistan Cricket) काळी बाजू सर्वांसमोर आणली आहे. गिलेस्पी 2024 मध्ये पाकिस्तानचा कोच बनला होता. पण 8 महिन्यांचा कालावधी पूर्ण केल्याशिवाय त्यांनी राजीनामा दिला. कोचिंग सोडल्यावर गिलेस्पीने पाकिस्तान क्रिकेटमधील आतील गोष्टींविषयी खुलासा केलाय ज्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची आंतरराष्ट्रीय पातळीवर बदनामी झाली. खासकरून जेसन गिलेस्पीने पीसीबीमधील मोहसीन नक्वीच्या हुकूमशाहीबद्दल आश्चर्यकारक गोष्टी सांगितल्या.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

जेसन गिलेस्पीने केला खुलासा :

जेसन गिलेस्पीने एका प्रश्न उत्तरांच्या सेशनमध्ये पाकिस्तान क्रिकेट संघात त्याला दिलेल्या वागणुकीबाबत खुलासा केला. त्याने म्हटले की, ‘माझ्या कार्यकाळात, गॅरी कर्स्टन यांनी टीम कनेक्शन कॅम्पची कल्पना मांडली. त्या बैठकीत पाकिस्तानी क्रिकेट संघातील प्रत्येकाने आपले अनुभव सांगितले. मी ऑस्ट्रेलियाहून आलो, गॅरी दक्षिण आफ्रिकेहून आला, पण अध्यक्ष मोहसीन नक्वी झूम कॉलद्वारे कनेक्ट झाले. ते लाहोरमध्ये राहतात, पण तरीही आले नाहीत. दरम्यान, गॅरी आफ्रिकेहून आला होता. अध्यक्षांना 20 मिनिटे गाडी चालवून येत आले नाही हे पाहून आम्हाला विचित्र वाटलं’.

कोच म्हणून योग्य सन्मान मिळाला नाही :

पाकिस्तान संघाचा कोच म्हणून गिलेस्पीच्या कार्यकाळाची सुरुवात अडचणीच्या भरलेली होती. बांगलादेशविरुद्धच्या दोन सामन्यांच्या टेस्ट मालिकेत पाकिस्तानने 2-0 असा पराभव पत्करल्यानंतर, खराब फॉर्ममुळे बाबर आझमला प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आले. त्यांच्या कोचिंग आव्हाने आणि राजीनाम्याबद्दल गिलेस्पी म्हणाले, ‘मी पाकिस्तान टेस्ट संघाचा प्रशिक्षक होतो. पीसीबीने माझ्याशी न बोलताच आमच्या वरिष्ठ सहाय्यक प्रशिक्षकाला काढून टाकले. मुख्य प्रशिक्षक म्हणून मला ते अजिबात योग्य वाटले नाही’.

हेही वाचा : टीम मधला पहिला मुस्लिम क्रिकेटर आणि 5 मोठे वाद, कधी फिलिस्तीनचं समर्थन तर कधी पिच विषयी नाराजी

जेसन गिलेस्पीने म्हटले की, ‘अशा अनेक गोष्टी होत्या ज्यामुळे मला अपमानित झाल्यासारखं वाटलं. संघात एक प्रकारची मनमानी होती. व्यवस्थापन प्रशिक्षकाला समजून घेत नव्हते. मला तिथे राहणे योग्य वाटले नाही आणि म्हणून मी राजीनामा दिला’. पाकिस्तानच्या क्रिकेट संघात कोचिंग स्टाफवरून अनेक वाद झाले होते. मागच्या काही काळात संगीत खुर्ची प्रमाणे पाकिस्तान क्रिकेट संघाचे कोच बदलत आहेत.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

जगन्नाथ रथयात्रा:87 दिवसांत 220 कारागीर तीन रथ बनवतात, यात्रेनंतर एक चाक 3 लाखांपर्यंत विकले...

0
ओडिशातील पुरी येथे आज भगवान जगन्नाथाची रथयात्रा काढण्यात येत आहे. भगवान जगन्नाथ आपले मोठे बंधू बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांच्यासह वेगवेगळ्या रथांमध्ये स्वार...

फिफा विश्वचषक चाहत्यांच्या परंपरा

0
मराठी बातम्याखेळफिफा विश्वचषक चाहत्यांच्या परंपरा | नॉर्वे वायकिंग चांट आणि जपान स्वच्छताबोस्टन8 तासांपूर्वीलिंक कॉपी कराकाही दिवसांपूर्वी बोस्टनच्या एका गजबजलेल्या रेल्वे स्थानकावर असे दृश्य...

पावसाळ्यामध्ये वाढतात फूड पॉयझनिंगचे रुग्ण:ही 7 लक्षणे दुर्लक्षित करू नका, डॉक्टरांकडून जाणून घ्या बचावासाठीच्या...

0
पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रता वाढते. यामुळे खाण्यापिण्याच्या वस्तूंमध्ये बॅक्टेरिया आणि व्हायरस लवकर वाढतात. हेच कारण आहे की, या हंगामात फूड पॉयझनिंगचे प्रमाण जास्त असते....

‘इठा’ चित्रपटात इतिहासाची तोडफोड:विठाबाई नारायणगावकर कुटुंबीयांचा गंभीर आरोप, वादग्रस्त बाबींचा फेरविचार करण्याची मागणी

0
पुणे: 'इठा' चित्रपटाच्या टीझरमध्ये तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या मूळ इतिहासाची तोडफोड करून चुकीची माहिती दाखवल्याचा गंभीर आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. विठाबाईंचे...
spot_img

फिफा विश्वचषक चाहत्यांच्या परंपरा

0
मराठी बातम्याखेळफिफा विश्वचषक चाहत्यांच्या परंपरा | नॉर्वे वायकिंग चांट आणि जपान स्वच्छताबोस्टन8 तासांपूर्वीलिंक कॉपी कराकाही दिवसांपूर्वी बोस्टनच्या एका गजबजलेल्या रेल्वे स्थानकावर असे दृश्य...

पावसाळ्यामध्ये वाढतात फूड पॉयझनिंगचे रुग्ण:ही 7 लक्षणे दुर्लक्षित करू नका, डॉक्टरांकडून जाणून घ्या बचावासाठीच्या...

0
पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रता वाढते. यामुळे खाण्यापिण्याच्या वस्तूंमध्ये बॅक्टेरिया आणि व्हायरस लवकर वाढतात. हेच कारण आहे की, या हंगामात फूड पॉयझनिंगचे प्रमाण जास्त असते....

‘प्रहार, द उज्ज्वल निकम स्टोरी’ लवकरच प्रदर्शित होणार:निकम म्हणाले- राजकुमारने माझी नक्कल केली नाही,...

0
राजकुमार राव अभिनीत 'प्रहार: द उज्ज्वल निकम स्टोरी' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होईल. या चित्रपटाच्या तयारीबद्दल आणि राजकुमारच्या मेथड ॲक्टिंगबद्दल स्वतः ज्येष्ठ वकील...

MG नवीन हायब्रिड व EV तंत्रज्ञान उद्या सादर करेल:SUV 69.2kWh बॅटरी पॅकसह 530 किमीची...

0
एमजी मोटर्स 16 जुलै रोजी भारतात आपली नवीन 'न्यू एनर्जी व्हेईकल' टेक्नॉलॉजी सादर करणार आहे. कंपनी या कार्यक्रमात आपली नवीन प्लग-इन हायब्रिड किंवा...
error: Content is protected !!