दक्षिणात्य चित्रपट सध्या त्यांचा सुवर्णकाळ अनुभवत आहेत. अशात दक्षिणेतील सुपरस्टार यश आणि दमदार अभिनेत्री नयनताराचा टॉक्सिक हा चित्रपट चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर अजून प्रदर्शित झाला नाही तरी त्यातील एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओपाहून चाहत्यांचा आनंद शिगेला पोहोचला आहे. यश आणि नयनताराचा हा लूक एकदा पहाच.
BTS व्हिडीओमुळे वाढली उत्सुकता
चित्रपटाच्या स्टारकास्टचे फर्स्ट-लूक पोस्टर्स आधीच प्रदर्शित झाले असून, आता ‘टॉक्सिक’च्या सेटवरून आलेलायश आणि नयनताराचा BTS (Behind The Scenes) व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
BTS व्हिडीओमध्ये नेमकं काय?
व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये नयनतारा एका व्यक्तीकडे जाऊन हात मिळवताना दिसते, त्यानंतर यशही त्याच व्यक्तीशी हस्तांदोलन करतो. या दृश्यात नयनतारा काळ्या गाउनमध्ये अतिशय ग्लॅमरस दिसत आहे, तर यश पांढऱ्या कपड्यांमध्ये स्टायलिश, उठावदार आणि दमदार दिसतोय. पार्श्वभूमीत अभिनेत्री हुमा कुरैशी देखील दिसते. ही छोटीशी झलक पाहून चाहते आनंदी असले तरी काही नेटकऱ्यांनी या लूकची तुलना एका फ्लॉप हिंदी चित्रपटाशी केली आहे.
काही युजर्सना या BTS क्लिपमधील विंटेज स्टाईल आणि वातावरणामुळे रणबीर कपूरच्या ‘बॉम्बे वेल्वेटची आठवण झाली. सोशल मीडियावर “बॉम्बे वेल्वेटसारखी फील येतेय” किंवा “पुन्हा बॉम्बे वेल्वेट?” अशा प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. 2015चा‘बॉम्बे वेल्वेट’ बॉक्स ऑफिसवर मोठ्या प्रमाणात अपयशी ठरला होता आणि केवळ 23.71 कोटींची कमाई करून तो गारद झाला होता. आता रिलीजनंतर या चित्रपटाला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणे औत्सुक्याचे असेल.
हुमा आणि कियाराचा हटके लुक
‘टॉक्सिक’च्या निर्मात्यांनी अलीकडेच नयनताराचा फर्स्ट-लूक पोस्टर रिलीज केला. ‘गंगा’ या भूमिकेत नयनतारा काळ्या रंगाच्या डीप नेक गाउनमध्ये, गुडघ्यापर्यंत उंच बूट्स आणि हातात बंदूक घेऊन प्रभावी दिसते. कॅप्शनमध्ये तिला “एक जहरी परी कथा” असे संबोधण्यात आले आहे. याआधी हुमा कुरैशीचा ‘एलिजाबेथ’ लूक समोर आला होता, ज्यात ती गॉथ क्वीनसारखी, काळ्या पोशाखात कब्रस्तानात उभी दिसते. तसेच कियारा आडवाणीचाही पोस्टर रिलीज करण्यात आला आहे.
जेव्हा यश आणि नयनतारा एकच फ्रेम शेअर करतात
बहीण-भावाची ऊर्जा खरी आहे #ToxicTheMovie #विषारी #यश #नयनतारा pic.twitter.com/nbgIw9SVXP— रविकिरण (@ravikirantweetz) १ जानेवारी २०२६
‘टॉक्सिक: ए फेयरीटेल फॉर ग्रोन-अप्स’ या चित्रपटाचे दिग्दर्शन गीतू मोहनदास करत असून, कथा यश आणि गीतू मोहनदास यांनी लिहिली आहे. केव्हीएन प्रोडक्शन्स आणि मॉन्स्टर माइंड क्रिएशन्स यांच्या बॅनरखाली हा चित्रपट तयार होत आहे. BTS व्हिडीओवरून मतभेद दिसत असले तरी, दमदार स्टारकास्ट, वेगळा विषय आणि यशची लोकप्रियता पाहता ‘टॉक्सिक’ ही या वर्षातील सर्वात चर्चित चित्रपटांपैकी एक ठरण्याची शक्यता नक्कीच आहे.





























