HomeमनोरंजनActress Khushi Mukherjee on Suryakumar Yadav says There was no such thing...

Actress Khushi Mukherjee on Suryakumar Yadav says There was no such thing as romantic relationship | ‘प्रेमसंबंध असे काही…,’ खुशी मुखर्जी सूर्यकुमार यादवसोबतच्या नात्याबद्दल दिले स्पष्टीकरण


खुशी Mukharjee on Suryakumar Yadav: बॉलिवूड आणि टीव्ही अभिनेत्री खुशी मुखर्जीने अलीकडेच भारताचा क्रिकेटर सूर्यकुमार यादव बद्दल एक विधान केलं होतं. यामध्ये तिने सांगितलं होतं की, मला सूर्यकुमार यादव इंस्टाग्रामवर मेसेज करायचा. आता अखेर याबद्दल  NDTV शी संवाद साधत भारतीय टी-20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव यांच्याबाबत दिलेल्या विधानावर खुलासा केला आहे. “मित्रासारखं बोलणं म्हणजे काही गैर आहे का?” असा सवाल तिने उपस्थित केला. खुशीचं हे स्पष्टीकरण सूर्यकुमार यादवचे चाहते आणि भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी मोठा दिलासा मानला जात आहे. एक दिवस आधी खुशीच्या एका वक्तव्यामुळे क्रिकेटविश्वात मोठी खळबळ उडाली होती. दीड महिन्यांत सुरू होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपसाठी सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाची घोषणा झाली आहे. अशा पार्श्वभूमीवर खुशीच्या विधानाचे जे अर्थ काढले जात होते, ते क्रिकेटसाठी आणि संघाच्या वातावरणासाठी योग्य नव्हते. अशा वादग्रस्त बातम्या संघाच्या तयारीसाठी हानिकारक ठरू शकतात.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

काय स्पष्टीकरण दिले खुशीची भूमिका?

NDTV ला दिलेल्या टेलिफोनिक मुलाखतीत खुशी मुखर्जीने स्पष्ट केलं की सूर्यकुमार यादवसोबत तिचं कोणतंही ‘रोमँटिक नातं’ नाही. तिचं म्हणणं आहे की तिच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावण्यात आला.  संदर्भाशिवाय हे वाक्य वाढवण्यात आलं. तिने हेही सांगितलं की तिचं इंस्टाग्राम अकाउंट हॅक झालं होतं. खुशीने सांगितलं की पूर्वी सूर्यकुमार यादवसोबत तिचं बोलणं फक्त मित्र म्हणून होत होता, मात्र आता तसं काहीही नाही. या वादानंतरही दोघांमध्ये कोणताही संवाद झालेला नाही, असं तिने स्पष्ट केलं. तिने टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाला आणि कर्णधार सूर्यकुमार यादवला शुभेच्छाही दिल्या.

हे ही वाचा: सूर्यकुमार यादववर केलेल्या आरोपांमुळे चर्चेत आलेली खुशी मुखर्जी आहे तरी कोण? अनेकदा होते ट्रोल

खुशीच्या मते, एका सामन्यातील पराभवानंतर सूर्यकुमार यादवने मित्र म्हणून तिच्याशी संवाद साधला होता. मात्र माध्यमांनी त्या गोष्टीला अतिशयोक्त स्वरूप देत वाद निर्माण केला, याबद्दल तिने नाराजी व्यक्त केली.

नेमकं कोणत्या विधानावरून वाद झाला?

अलीकडेच एका कार्यक्रमात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना खुशी मुखर्जीचं वक्तव्य चर्चेत आलं होतं. तिने म्हटलं होतं, “मला कोणत्याही क्रिकेटरला डेट करायचं नाही. अनेक क्रिकेटर माझ्या मागे आहेत. सूर्यकुमार यादव मला खूप मेसेज करायचे. आता आमच्यात फारसं बोलणं होत नाही. माझं नाव कोणासोबत जोडलं जावं, असं मला वाटत नाही. माझ्याशी संबंधित लिंक-अपच्या बातम्या मला आवडत नाहीत.”

कोण आहे खुशी?

खुशी मुखर्जीने MTV चे शो  ‘कहत हनुमान जय श्रीराम’, ‘बालवीर रिटर्न्स’ आणि MTV लव्ह स्कूल यांसारख्या टीव्ही शोमध्ये काम केलं आहे. याशिवाय तिने तमिळ आणि तेलुगू चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या आहेत. याआधीही तिने आपण कोणत्याही क्रिकेटरला डेट करू इच्छित नसल्याचं स्पष्ट केलं होतं.

हे ही वाचा: “सूर्यकुमार यादव मला खूप मेसेज करायचा…” अभिनेत्रीचा धक्कादायक दावा! नेमकं प्रकरण जाणून घ्या

तिरुपतीला दर्शनासाठी गेला होता सूर्यकुमार

2025 मध्ये सूर्यकुमार यादवने भारताला आशिया कप जिंकून दिला असला, तरी मागील काही सामन्यांत त्याच्या बॅटमधून धावा न निघणं ही चिंतेची बाब ठरली होती. त्यातच अभिनेत्री खुशी मुखर्जीच्या एका वक्तव्यामुळे आणखी गदारोळ निर्माण झाला. विशेष म्हणजे, खुशीचं ते विधान समोर आलं त्याच वेळी सूर्यकुमार यादव पत्नी देविशासोबत तिरुपतीमध्ये दर्शनासाठी गेले होते. या संपूर्ण प्रकरणावर सूर्य कडून अद्याप कोणतंही अधिकृत वक्तव्य आलेलं नाही.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

जगन्नाथ रथयात्रा:87 दिवसांत 220 कारागीर तीन रथ बनवतात, यात्रेनंतर एक चाक 3 लाखांपर्यंत विकले...

0
ओडिशातील पुरी येथे आज भगवान जगन्नाथाची रथयात्रा काढण्यात येत आहे. भगवान जगन्नाथ आपले मोठे बंधू बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांच्यासह वेगवेगळ्या रथांमध्ये स्वार...

फिफा विश्वचषक चाहत्यांच्या परंपरा

0
मराठी बातम्याखेळफिफा विश्वचषक चाहत्यांच्या परंपरा | नॉर्वे वायकिंग चांट आणि जपान स्वच्छताबोस्टन8 तासांपूर्वीलिंक कॉपी कराकाही दिवसांपूर्वी बोस्टनच्या एका गजबजलेल्या रेल्वे स्थानकावर असे दृश्य...

पावसाळ्यामध्ये वाढतात फूड पॉयझनिंगचे रुग्ण:ही 7 लक्षणे दुर्लक्षित करू नका, डॉक्टरांकडून जाणून घ्या बचावासाठीच्या...

0
पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रता वाढते. यामुळे खाण्यापिण्याच्या वस्तूंमध्ये बॅक्टेरिया आणि व्हायरस लवकर वाढतात. हेच कारण आहे की, या हंगामात फूड पॉयझनिंगचे प्रमाण जास्त असते....

‘इठा’ चित्रपटात इतिहासाची तोडफोड:विठाबाई नारायणगावकर कुटुंबीयांचा गंभीर आरोप, वादग्रस्त बाबींचा फेरविचार करण्याची मागणी

0
पुणे: 'इठा' चित्रपटाच्या टीझरमध्ये तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या मूळ इतिहासाची तोडफोड करून चुकीची माहिती दाखवल्याचा गंभीर आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. विठाबाईंचे...
spot_img

फिफा विश्वचषक चाहत्यांच्या परंपरा

0
मराठी बातम्याखेळफिफा विश्वचषक चाहत्यांच्या परंपरा | नॉर्वे वायकिंग चांट आणि जपान स्वच्छताबोस्टन8 तासांपूर्वीलिंक कॉपी कराकाही दिवसांपूर्वी बोस्टनच्या एका गजबजलेल्या रेल्वे स्थानकावर असे दृश्य...

पावसाळ्यामध्ये वाढतात फूड पॉयझनिंगचे रुग्ण:ही 7 लक्षणे दुर्लक्षित करू नका, डॉक्टरांकडून जाणून घ्या बचावासाठीच्या...

0
पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रता वाढते. यामुळे खाण्यापिण्याच्या वस्तूंमध्ये बॅक्टेरिया आणि व्हायरस लवकर वाढतात. हेच कारण आहे की, या हंगामात फूड पॉयझनिंगचे प्रमाण जास्त असते....

‘प्रहार, द उज्ज्वल निकम स्टोरी’ लवकरच प्रदर्शित होणार:निकम म्हणाले- राजकुमारने माझी नक्कल केली नाही,...

0
राजकुमार राव अभिनीत 'प्रहार: द उज्ज्वल निकम स्टोरी' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होईल. या चित्रपटाच्या तयारीबद्दल आणि राजकुमारच्या मेथड ॲक्टिंगबद्दल स्वतः ज्येष्ठ वकील...

MG नवीन हायब्रिड व EV तंत्रज्ञान उद्या सादर करेल:SUV 69.2kWh बॅटरी पॅकसह 530 किमीची...

0
एमजी मोटर्स 16 जुलै रोजी भारतात आपली नवीन 'न्यू एनर्जी व्हेईकल' टेक्नॉलॉजी सादर करणार आहे. कंपनी या कार्यक्रमात आपली नवीन प्लग-इन हायब्रिड किंवा...
error: Content is protected !!