Homeमनोरंजनऑटो न्यूज मारुती हायब्रिड एसयूव्ही फ्रॉन्क्स बजेट कारची किंमत आणि वैशिष्ट्ये

ऑटो न्यूज मारुती हायब्रिड एसयूव्ही फ्रॉन्क्स बजेट कारची किंमत आणि वैशिष्ट्ये


मारुती फ्रॉन्क्स हायब्रीड कार: भारतीय ऑटो क्षेत्रांमध्ये काही कार कंपन्यांचे विविध मॉडेल कारप्रेमींसाठी एक नवी पर्वणी ठरतात. पण, त्यातही काही कारचे मॉडेल कारप्रेमींची विशेष पसंती मिळवताना दिसतात. यामागे कारचे फिचर असो किंवा मायलेज असतो, एखादीतरी जमेची बाजू असतेच. काही कार या त्यांच्या परवडणाऱ्या किमतीमुळंसुद्धा अनेकांच्याच पसंतीस उतरतात. अशा कारच्या यादीत मारुतीच्या अनेक Car चा समावेश असून, त्यातील एक बहुप्रतिक्षित मॉडेल लवकरच लाँच होणार आहे.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

Maruti Fronx Hybrid असं या बहुप्रतिक्षित कारचं नाव असून, ती 2027 मध्ये लाँच होऊ शकते असं म्हटलं जात आहे. पेट्रोल मॉडेलहून ही कार काहीशी महाग असेल असा प्राथमिक अंदाज आहे. या किमतीत साधारण 2 ते अडीच लाखांचा फरक पडेल. सध्या विक्रीसाठी उपलब्ध असणारी मारुति फ्रॉन्क्स ही कार 7.59 लाखांपासून 12.95 लाख (एक्स शोरुम) इतक्या किमतीला उपलब्ध आहे. ज्यामुळं तिचं हायब्रिड वर्जन 8 लाख ते 15 लाख रुपये (एक्स शोरुम) इतक्या किमतीत उपलब्ध असेल असं म्हटलं जात आहे. ज्यामुळं नव्या तंत्रज्ञानासह ही हायब्रि़ड एसयुव्ही मध्यमवर्गीय ग्राहकांसाठी एक परवडणारा आणि तितकाच उत्तम पर्याय म्हणून अधोरेखित होईल असं अनेकांचच मत.

मायलेज आणि फिचर काय?

Maruti Fronx Hybrid कारमध्ये 1.2-लीटर Z12E थ्री-सिलेंडर पेट्रोल इंजिन असून, ते नव्या आणि मजबूत हायब्रिड सिस्टीमसह काम करेल. फ्रॉन्क्सची ही हायब्रिड सीरिज असून, यामध्ये पेट्रोल इंजिन बॅटरीला चार्ज करेल, तर इलेक्ट्रीक मोटर असणाऱ्या कारच्या चाकांनाही यामुळं पॉवर मिळणार आहे. या नव्या तंत्रज्ञानाच्या मगतीनं Fronx Hybrid 30-35 किमी/लीटर इतकं मायलेज देऊ शकते. ज्यामुळं या श्रेणीत ही कार उजवी ठरणार आहे. सध्या कारचं पेट्रोल वर्जन (20.01–22.89 किमी/लीटर) आणि  CNG वेरिएंट (28.51 किमी/किग्रा) इतकं मायलेज देत आहे. त्यामुळं प्रत्यक्षात हायब्रिड मॉडेलचं ऑनरोड मायलेज पाहणंही महत्त्वाचं असेल.

प्रिमियम फिचरमुळं कार देणार, दिमाखदार वाहनाचा Feel…

फ्रॉन्क्सच्या या हायब्रिड मॉडेलमध्ये 9-इंच टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टीम,  360-डिग्री कॅमेरा, वायरलेस चार्जिंग, हेड-अप डिस्प्ले (HUD), वेंटिलेटेड फ्रंट सीट्स  आणि सनरुफसुद्धा दिलं जाणार आहे. कारच्या टॉप मॉडेलमध्ये लेवल-1 ADAS चं फिचर असून, त्यामुळं वाहन चालनाचा उत्तम आणि सुरक्षित अनुभव मिळणार आहे. सुरक्षिततेच्या बाबतीत मारुतिनं कायमच कारप्रेमींची मनं जिंकली आहेत. हीच बाब इथंही पाहायला मिळाली असून, 6 एअरबॅग, ABS आणि ईबीडी, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्राम (ESP), हिल होल्ड असिस्ट, रिवर्स पार्किंग सेंसर, कॅमेरा, ISOFIX चाइल्ड सीट माउंट्ससह टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीमची यंत्रणासुद्धा दिली जाणार आहे. त्यामुळं नवं तंत्रज्ञान आणि सुरक्षितता असा उत्तम मेळ, शिवाय दमदार मायलेज असं कमाल पॅकेज ही कार देणार आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

NEET-UG 2026 निकाल घोषित: 11.21 लाख विद्यार्थी पात्र

0
नवी दिल्ली52 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करानॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने गुरुवारी NEET-UG 2026 चा निकाल जाहीर केला आहे. या वर्षी देश-विदेशातील 551 शहरांमधील 5,440...

जगन्नाथ रथयात्रा:87 दिवसांत 220 कारागीर तीन रथ बनवतात, यात्रेनंतर एक चाक 3 लाखांपर्यंत विकले...

0
ओडिशातील पुरी येथे आज भगवान जगन्नाथाची रथयात्रा काढण्यात येत आहे. भगवान जगन्नाथ आपले मोठे बंधू बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांच्यासह वेगवेगळ्या रथांमध्ये स्वार...

फिफा विश्वचषक चाहत्यांच्या परंपरा

0
मराठी बातम्याखेळफिफा विश्वचषक चाहत्यांच्या परंपरा | नॉर्वे वायकिंग चांट आणि जपान स्वच्छताबोस्टन8 तासांपूर्वीलिंक कॉपी कराकाही दिवसांपूर्वी बोस्टनच्या एका गजबजलेल्या रेल्वे स्थानकावर असे दृश्य...

पावसाळ्यामध्ये वाढतात फूड पॉयझनिंगचे रुग्ण:ही 7 लक्षणे दुर्लक्षित करू नका, डॉक्टरांकडून जाणून घ्या बचावासाठीच्या...

0
पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रता वाढते. यामुळे खाण्यापिण्याच्या वस्तूंमध्ये बॅक्टेरिया आणि व्हायरस लवकर वाढतात. हेच कारण आहे की, या हंगामात फूड पॉयझनिंगचे प्रमाण जास्त असते....
spot_img

फिफा विश्वचषक चाहत्यांच्या परंपरा

0
मराठी बातम्याखेळफिफा विश्वचषक चाहत्यांच्या परंपरा | नॉर्वे वायकिंग चांट आणि जपान स्वच्छताबोस्टन8 तासांपूर्वीलिंक कॉपी कराकाही दिवसांपूर्वी बोस्टनच्या एका गजबजलेल्या रेल्वे स्थानकावर असे दृश्य...

पावसाळ्यामध्ये वाढतात फूड पॉयझनिंगचे रुग्ण:ही 7 लक्षणे दुर्लक्षित करू नका, डॉक्टरांकडून जाणून घ्या बचावासाठीच्या...

0
पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रता वाढते. यामुळे खाण्यापिण्याच्या वस्तूंमध्ये बॅक्टेरिया आणि व्हायरस लवकर वाढतात. हेच कारण आहे की, या हंगामात फूड पॉयझनिंगचे प्रमाण जास्त असते....

‘प्रहार, द उज्ज्वल निकम स्टोरी’ लवकरच प्रदर्शित होणार:निकम म्हणाले- राजकुमारने माझी नक्कल केली नाही,...

0
राजकुमार राव अभिनीत 'प्रहार: द उज्ज्वल निकम स्टोरी' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होईल. या चित्रपटाच्या तयारीबद्दल आणि राजकुमारच्या मेथड ॲक्टिंगबद्दल स्वतः ज्येष्ठ वकील...

MG नवीन हायब्रिड व EV तंत्रज्ञान उद्या सादर करेल:SUV 69.2kWh बॅटरी पॅकसह 530 किमीची...

0
एमजी मोटर्स 16 जुलै रोजी भारतात आपली नवीन 'न्यू एनर्जी व्हेईकल' टेक्नॉलॉजी सादर करणार आहे. कंपनी या कार्यक्रमात आपली नवीन प्लग-इन हायब्रिड किंवा...
error: Content is protected !!