Homeमनोरंजनश्रेयस अय्यरचे आरोग्य अपडेट 6 किलो वजन कमी झाल्यामुळे त्याचे परत येण्यास...

श्रेयस अय्यरचे आरोग्य अपडेट 6 किलो वजन कमी झाल्यामुळे त्याचे परत येण्यास उशीर होऊ शकतो


श्रेयस अय्यर: भारत विरुद्ध न्यूझीलंड (India VS Newzealand) यांच्यात 11 जानेवारी पासून वनडे सीरिजला सुरुवात होणार आहे. मात्र त्यापूर्वीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला असून वनडे संघाचा उपकर्णधार श्रेयस अय्यर याला टीम इंडियात पुनरागमन करण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे. कारण त्याला बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सीलेंसमधून खेळण्याची परवानगी मिळालेली नाही.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

फिटनेसबाबत काय अपडेट?

30 डिसेंबर पर्यंत श्रेयस अय्यर हा पूर्णपणे फिट होईल अशी शक्यता वर्तवली जात होती मात्र त्याला खेळण्याची संधी मिळणार नाही. श्रेयस अय्यरला कमीत कमी अजून एक आठवडा सेंटर ऑफ एक्सीलेंसमध्ये घालवावा लागेल.  तो कोणत्याही अडचणीशिवाय फलंदाजी करतोय मात्र वजन कमी करण्याच्या कारणाने श्रेयसच्या शरीरातील ताकद कमी झाली आहे. पुढील एक आठवडा त्याच्या फिटनेसकडे खास करून लक्ष दिलं जाईल.

श्रेयस अय्यरला कशी झाली दुखापत?

श्रेयस अय्यरला ऑस्ट्रेलिया विरुद्ध सिडनी वनडे सामन्यात कॅच पकडताना दुखापत झाली होती. रिपोर्ट्समधून माहिती समोर येतेय की त्याचं जवळपास ६ किलो वजन कमी झालं आहे. श्रेयसने सेंटर ऑफ एक्सीलेंसमध्ये असताना काही प्रमाणात वजन वाढवलं, मात्र त्याच्या मसल मासमध्ये घट झाल्याने त्याची ताकद कमी झाली आहे.

हेही वाचा : 2026 मध्ये रोहित- विराट किती सामने खेळणार? पाहा टीम इंडियाच्या वनडे सामन्यांचं संपूर्ण शेड्युल

मेडिकल रिपोर्टमध्ये काय?

टाइम्स ऑफ इंडियाच्या माहितीनुसार BCCI च्या एका सूत्राने सांगितले की, मेडिकल टीम श्रेयस अय्यरबाबत कोणताही निष्काळजीपणा करत नाहीये, कारण श्रेयस हा संघाचा महत्वाचा खेळाडू आहे. सूत्राने सांगितले की, श्रेयसने पूर्णपणे फिट होणं हे सर्वात प्राथमिकता आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी भारतीय संघ जाहीर होण्यापूर्वी व्यवस्थापन आणि निवडकर्त्यांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे.

माहिती मिळतेय की श्रेयस अय्यर हा विजय हजारे ट्रॉफीमधील 3 आणि  6 जानेवारी रोजी होणारे सामने खेळू शकतो. मात्र फिटनेसबाबत नवीन रिपोर्ट समोर आल्यावर त्याचं या स्पर्धेत खेळणं सुद्धा अवघड मानलं जातंय.

श्रेयस अय्यरची कारकीर्द :

श्रेयस अय्यर हा भारताचा स्टार फलंदाज असून त्याने आतापर्यंत 51 टी 20, 73 वनडे आणि 14 टेस्ट सामने खेळले आहेत. यात टी 20 सामन्यांमध्ये श्रेयसने  1104 धावा, वनडे क्रिकेटमध्ये 2917 धावा आणि टेस्ट क्रिकेटमध्ये 811 धावा केल्या आहेत. श्रेयस अय्यरने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत कर्णधार असताना कोलकाता नाईट रायडर्सला 2024 चं विजेतेपद जिंकवून दिलं. श्रेयसने आतापर्यंत 132 आयपीएल सामन्यात 3731 धावा खेळल्या आहेत.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

NEET-UG 2026 निकाल घोषित: 11.21 लाख विद्यार्थी पात्र

0
नवी दिल्ली52 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करानॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने गुरुवारी NEET-UG 2026 चा निकाल जाहीर केला आहे. या वर्षी देश-विदेशातील 551 शहरांमधील 5,440...

जगन्नाथ रथयात्रा:87 दिवसांत 220 कारागीर तीन रथ बनवतात, यात्रेनंतर एक चाक 3 लाखांपर्यंत विकले...

0
ओडिशातील पुरी येथे आज भगवान जगन्नाथाची रथयात्रा काढण्यात येत आहे. भगवान जगन्नाथ आपले मोठे बंधू बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांच्यासह वेगवेगळ्या रथांमध्ये स्वार...

फिफा विश्वचषक चाहत्यांच्या परंपरा

0
मराठी बातम्याखेळफिफा विश्वचषक चाहत्यांच्या परंपरा | नॉर्वे वायकिंग चांट आणि जपान स्वच्छताबोस्टन8 तासांपूर्वीलिंक कॉपी कराकाही दिवसांपूर्वी बोस्टनच्या एका गजबजलेल्या रेल्वे स्थानकावर असे दृश्य...

पावसाळ्यामध्ये वाढतात फूड पॉयझनिंगचे रुग्ण:ही 7 लक्षणे दुर्लक्षित करू नका, डॉक्टरांकडून जाणून घ्या बचावासाठीच्या...

0
पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रता वाढते. यामुळे खाण्यापिण्याच्या वस्तूंमध्ये बॅक्टेरिया आणि व्हायरस लवकर वाढतात. हेच कारण आहे की, या हंगामात फूड पॉयझनिंगचे प्रमाण जास्त असते....
spot_img

फिफा विश्वचषक चाहत्यांच्या परंपरा

0
मराठी बातम्याखेळफिफा विश्वचषक चाहत्यांच्या परंपरा | नॉर्वे वायकिंग चांट आणि जपान स्वच्छताबोस्टन8 तासांपूर्वीलिंक कॉपी कराकाही दिवसांपूर्वी बोस्टनच्या एका गजबजलेल्या रेल्वे स्थानकावर असे दृश्य...

पावसाळ्यामध्ये वाढतात फूड पॉयझनिंगचे रुग्ण:ही 7 लक्षणे दुर्लक्षित करू नका, डॉक्टरांकडून जाणून घ्या बचावासाठीच्या...

0
पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रता वाढते. यामुळे खाण्यापिण्याच्या वस्तूंमध्ये बॅक्टेरिया आणि व्हायरस लवकर वाढतात. हेच कारण आहे की, या हंगामात फूड पॉयझनिंगचे प्रमाण जास्त असते....

‘प्रहार, द उज्ज्वल निकम स्टोरी’ लवकरच प्रदर्शित होणार:निकम म्हणाले- राजकुमारने माझी नक्कल केली नाही,...

0
राजकुमार राव अभिनीत 'प्रहार: द उज्ज्वल निकम स्टोरी' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होईल. या चित्रपटाच्या तयारीबद्दल आणि राजकुमारच्या मेथड ॲक्टिंगबद्दल स्वतः ज्येष्ठ वकील...

MG नवीन हायब्रिड व EV तंत्रज्ञान उद्या सादर करेल:SUV 69.2kWh बॅटरी पॅकसह 530 किमीची...

0
एमजी मोटर्स 16 जुलै रोजी भारतात आपली नवीन 'न्यू एनर्जी व्हेईकल' टेक्नॉलॉजी सादर करणार आहे. कंपनी या कार्यक्रमात आपली नवीन प्लग-इन हायब्रिड किंवा...
error: Content is protected !!