Homeमनोरंजनसुनील गावसकर यांनी पिच रेटिंग ऑस वि इंग्लीश ऍशेस चाचणीबद्दल त्यांच्या दुहेरी...

सुनील गावसकर यांनी पिच रेटिंग ऑस वि इंग्लीश ऍशेस चाचणीबद्दल त्यांच्या दुहेरी मानकांसाठी आयसीसीची निंदा केली


सुनील गावस्कर आयसीसीवर: ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (Australia VS England) यांच्यात अ‍ॅशेज 2025-26 टेस्ट सीरिज खेळवली जात असून यातील चौथा सामना हा मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर पार पडला. या सामन्यात गोलंदाजांचा दबदबा पाहायला मिळाला आणि फक्त 2 दिवसात इंग्लंडने 4 विकेटने सामना जिंकला. याच सोबत इंग्लंडने सीरिजमध्ये पहिला विजय मिळवला आणि 14 वर्षांपासून विजयाची प्रतीक्षा संपवली. मात्र ऑस्ट्रेलियाने यापूर्वीच सीरिजमधील सुरुवातीचे तीनही सामने जिंकून अ‍ॅशेज सीरिजमध्ये विजयी आघाडी घेतलेली आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या टेस्ट सीरिजमधील चार टेस्ट सामने हे फक्त 13 दिवसात संपले आणि त्यानंतर पिचबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

दोन दिवसात संपला टेस्ट सामना :

भारताचे माजी क्रिकेटर सुनील गावसकर यांनी आयसीसीवर पिच रेटिंगबाबत दुटप्पेपणाची भूमिका घेतल्याचा आरोप केला आहे. गावसकर म्हणाले की मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळवण्यात आलेली चौथी अ‍ॅशेज टेस्ट ही केवळ दोन दिवसात संपली, मात्र तरीही एमसीजीच्या पिचला ‘गुड’ रेटिंग देण्यात आली. मेलबर्न टेस्टमधील पहिल्या दिवशी 20 विकेट  पडलयं, जे ऑस्ट्रेलियामध्ये 1951 नंतर पहिल्यांदाच घडलं. दुसऱ्या दिवशी सुद्धा 16 विकेट पडल्या आणि संपूर्ण टेस्ट फक्त 142 ओव्हरमध्ये संपली. गावसकरने आठवण करून दिली की अ‍ॅशेज सीरिजचा पहिला टेस्ट सामना सुद्धा दोन दिवसात संपला, मात्र तरीही आयसीसीने त्या पिचला ‘व्हेरी गुड’ अशी रेटिंग दिली.

सुनील गावसकर काय म्हणाले?

मेलबर्न कसोटीत नवीन सामनाधिकारी जेफ क्रो यांच्या उपस्थितीमुळे रेटिंगमध्ये बदल होऊ शकतो, असे सुनील गावस्कर यांनी उपहासात्मकपणे म्हटले. स्टार स्पोर्ट्सच्या कॉलममध्ये सुनील गावसकर यांनी म्हटले की, ‘पर्थ टेस्टमध्ये 32 विकेट पडल्या होत्या आणि रंजन मदुगलेने पिचला ‘व्हेरी गुड’ अशी रेटिंग दिली. मेलबर्नमध्ये 36 विकेट पडल्या, त्यामुळे होऊ शकतं की जेफ क्रोने ‘व्हेरी’ शब्द हटवला आणि पिचला फक्त ‘गुड’ अशी रेटिंग दिली.

सुनील गावसकरने भारतीय पिच क्यूरेटर्सबाबत आयसीसी अधिकाऱ्यांच्या वागणुकीवर टीका केली आहे. गावसकर यांनी टीका करताना लिहिले की, ‘भारतीय मैदानावरील खेळाडूंना असे दाखवले जाते की जणू ते फलंदाजांना धावा करू देऊ इच्छित नाहीत, तर परदेशी खेळपट्ट्यांवरही चुका माणसांकडून होतात’.

मेलबर्न टेस्ट सामन्यात ऑस्ट्रेलियामध्ये गोलंदाजीच्या दृष्टीने पाहायला गेल्यास तिसरा सर्वात छोटा टेस्ट सामना राहिला. ज्यात फक्त 852 बॉल फेकले गेले. फक्त अलीकडील खेळवला गेलेला पर्थ टेस्ट (८४७ चेंडू) आणि १९३२ चा ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिका सामना (६५६ चेंडू) यापेक्षा लहान होता. सामन्यानंतर, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि इंग्लिश कर्णधार बेन स्टोक्स या दोघांनीही खेळपट्टीवर टीका केली आणि म्हटले की पिच ती गोलंदाजांच्या बाजूने खूप उपयुक्त होती.

हेही वाचा : सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये ‘या’ क्रिकेटर्सचं होणार प्रमोशन, तर रोहित विराट सह 3 दिग्गजांना बाहेरचा रास्ता दाखवला जाणार? मोठी अपडेट समोर

2 दिवस सुद्धा नाही चालली बॉक्सिंग डे :

मेलबर्न क्रिकेट ग्राउंडच्या पिचवरील जवळपास 10 मिलीमीटरचं गवत हे गोलंदाजांसाठी मदतीशीर ठरलं. इंग्लंडने या सामन्यात टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि तो योग्य ठरला. ऑस्ट्रेलियाची पहिली इनिंग फक्त 152 धावांवर संपली. या दरम्यान मायकल नेसरीने सर्वाधिक 35 धावा केल्या, शिवाय कोणताही फलंदाज 30 धावांचा आकडा नाही गाठू शकला. इंग्लंडकडून जोश टोंगने सर्वाधिक 5 विकेट घेतल्या. तर गस अ‍ॅटकिन्सननेही 2 विकेट घेतल्या.

ऑस्ट्रेलियाची फलंदाजी चांगली झाली नाहीच मात्र इंग्लंडची फलंदाजी सुद्धा खास ठरली नाही. ऑस्ट्रेलियाने त्यांना 110 धावांवर ऑल आउट केले. ज्यामुळे ऑस्ट्रेलियाला 42 धावांची आघाडी घेतली होती. दरम्यान हॅरी ब्रूकने सर्वात जास्त 41 धावा ठोकल्या. तो या इनिंगमध्ये 30 पेक्षा अधिक धावा करणारा एकमेव फलंदाज ठरला. तर दुसरीकडे माइकल नेसर ने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. स्कॉट बोलँडनेही तीन विकेट्स घेतल्या, तर मिचेल स्टार्कनेही दोन विकेट्स घेतल्या आहेत.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

Maharashtra Government Stops Free Saree Scheme; Eknath Shinde Policy Halted

0
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'तून पडताळणीदरम्यान ९२ लाख महिलांचे अर्ज बाद झाल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली असतानाच, आता राज्यातील गरीब आणि गरजू महिलांना...

NEET-UG 2026 निकाल घोषित: 11.21 लाख विद्यार्थी पात्र

0
नवी दिल्ली52 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करानॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने गुरुवारी NEET-UG 2026 चा निकाल जाहीर केला आहे. या वर्षी देश-विदेशातील 551 शहरांमधील 5,440...

जगन्नाथ रथयात्रा:87 दिवसांत 220 कारागीर तीन रथ बनवतात, यात्रेनंतर एक चाक 3 लाखांपर्यंत विकले...

0
ओडिशातील पुरी येथे आज भगवान जगन्नाथाची रथयात्रा काढण्यात येत आहे. भगवान जगन्नाथ आपले मोठे बंधू बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांच्यासह वेगवेगळ्या रथांमध्ये स्वार...

फिफा विश्वचषक चाहत्यांच्या परंपरा

0
मराठी बातम्याखेळफिफा विश्वचषक चाहत्यांच्या परंपरा | नॉर्वे वायकिंग चांट आणि जपान स्वच्छताबोस्टन8 तासांपूर्वीलिंक कॉपी कराकाही दिवसांपूर्वी बोस्टनच्या एका गजबजलेल्या रेल्वे स्थानकावर असे दृश्य...
spot_img

फिफा विश्वचषक चाहत्यांच्या परंपरा

0
मराठी बातम्याखेळफिफा विश्वचषक चाहत्यांच्या परंपरा | नॉर्वे वायकिंग चांट आणि जपान स्वच्छताबोस्टन8 तासांपूर्वीलिंक कॉपी कराकाही दिवसांपूर्वी बोस्टनच्या एका गजबजलेल्या रेल्वे स्थानकावर असे दृश्य...

पावसाळ्यामध्ये वाढतात फूड पॉयझनिंगचे रुग्ण:ही 7 लक्षणे दुर्लक्षित करू नका, डॉक्टरांकडून जाणून घ्या बचावासाठीच्या...

0
पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रता वाढते. यामुळे खाण्यापिण्याच्या वस्तूंमध्ये बॅक्टेरिया आणि व्हायरस लवकर वाढतात. हेच कारण आहे की, या हंगामात फूड पॉयझनिंगचे प्रमाण जास्त असते....

‘प्रहार, द उज्ज्वल निकम स्टोरी’ लवकरच प्रदर्शित होणार:निकम म्हणाले- राजकुमारने माझी नक्कल केली नाही,...

0
राजकुमार राव अभिनीत 'प्रहार: द उज्ज्वल निकम स्टोरी' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होईल. या चित्रपटाच्या तयारीबद्दल आणि राजकुमारच्या मेथड ॲक्टिंगबद्दल स्वतः ज्येष्ठ वकील...

MG नवीन हायब्रिड व EV तंत्रज्ञान उद्या सादर करेल:SUV 69.2kWh बॅटरी पॅकसह 530 किमीची...

0
एमजी मोटर्स 16 जुलै रोजी भारतात आपली नवीन 'न्यू एनर्जी व्हेईकल' टेक्नॉलॉजी सादर करणार आहे. कंपनी या कार्यक्रमात आपली नवीन प्लग-इन हायब्रिड किंवा...
error: Content is protected !!