बीसीसीआय केंद्रीय करार अद्यतने: वर्ष 2025 संपून नवीन वर्षाची सुरुवात होण्यासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच भारत विरुद्ध न्यूझीलंड (India VS Newzealand) यांच्यात वनडे सीरिज खेळवली जाणार आहे. या सीरिजला 11 जानेवारी पासून सुरुवात होणार असून त्यापूर्वी बीसीसीआय सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट (BCCI Central Contract) बाबत समोर आलेल्या अपडेट्समुळे विराट आणि रोहितच्या फॅन्सना आश्चर्य वाटेल. दरवर्षी फेब्रुवारी – मार्च महिन्यात बीसीसीआयच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टची घोषणा करण्यात आली होती, मात्र यंदा वर्ल्ड कप 2026 ला फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सुरुवात होणार असल्याने बीसीसीआय नववर्षाच्या सुरुवातीलाच 2026 च्या वार्षिक सेंट्रल कॉन्ट्रॅक्टची घोषणा करण्याची शक्यता आहे.
कोणाचं डिमोशन?
स्पोर्ट्स तकच्या एका रिपोर्टमध्ये सूत्रांच्या हवाल्याने सांगण्यात आलंय की टेस्ट क्रिकेट आणि टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना यंदाच्या बीसीसीआय सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये झटका बसू शकतो. मागच्यावर्षीच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये दोघे A+ ग्रेडमध्ये सामील होते, मात्र यंदा या दोघांना खालच्या ग्रेडमध्ये स्थान दिले जाऊ शकते. यांच्या सोबतच जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांच्या ग्रेडमध्ये सुद्धा बदल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
कोणाचं प्रमोशन?
टीम इंडियासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळणाऱ्या शुभमन गिलला बीसीसीआयच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये प्रमोशन मिळू शकते. तो सध्या ग्रेड ए मध्ये सामील आहे. 2025 मध्ये बीसीसीआयने त्याला भारताच्या टेस्ट आणि वनडे संघाचं कर्णधार बनवलंय. त्यामुळे आता 2026 च्या बीसीसीआय कॉन्ट्रॅक्टमध्ये त्याला A+ ग्रेडमध्ये प्रमोट केलं जाईल. ज्यामुळे त्याला वर्षाला 7 कोटी रुपये मिळतील. विराट कोहली हे एकमेव खेळाडू आहेत जे 2018 च्या सुरुवातीपासूनच या एलीट ग्रुपचा भाग आहेत.
हेही वाचा : हेड कोच गौतम गंभीरची नोकरी जाणार? BCCI चा मोठा खुलासा, समोर आली अपडेट
2 खेळाडूंना दाखवणार बाहेरचा रस्ता?
नव्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि मुकेश कुमार यांना बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. स्टार गोलंदाज मोहम्मद शमी हा मागील अनेक वर्षांपासून टीम इंडियाच्या बाहेर आहे तर मुकेश कुमार हा सुद्धा अनेक दिवसांपासून टीम इंडियात संधी मिळालेली नाही.
‘या’ खेळाडूंना प्रमोशन देण्याची तयारी :
यंदा बीसीसीआय सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये काही युवा स्टार खेळाडूंना प्रमोशन देण्याची शक्यता आहे. तिलक वर्मा, अर्शदीप सिंह, प्रसिद्ध कृष्णा, ध्रुव जुरेल आणि हर्षित राणा सारख्या खेळाडूंना प्रमोट करू शकते. अनेक संघ हे लिमिटेड ओव्हर सह टीम इंडियाच्या टेस्ट संघाचा सुद्धा भाग आहेत. नव्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये ईशान किशनला कायम ठेवलं जाण्याची शक्यता आहे. त्याचं देशांतर्गत क्रिकेटमधील दमदार प्रदर्शन पाहता टी 20 वर्ल्ड कप 2027 साठी टीम इंडियात त्याची निवड होऊ शकते.






























