IND VS SL : भारत विरुद्ध श्रीलंका (India VS Sri Lanka) यांच्यात महिला संघात पाच सामन्यांची टी 20 सीरिज खेळवली जात असून यातील चौथा सामना हा रविवारी खेळवला गेला. तिरुअनंतपुरम येथील स्टेडियमवर हा सामना खेळवला जात असून यात टीम इंडियाला (Team India) प्रथम फलंदाजीसाठी मैदानात यावं लागलं. तेव्हा टीम इंडियाच्या फलंदाजांनी जबरदस्त फलंदाजी करून 2 विकेट गमावून 221 धावांचा डोंगर उभा केला. विजयासाठी 222 धावांचं आव्हान दिलेलं असताना श्रीलंकेचा संघ अवघ्या 191 धावा करू शकला. त्यामुळे टीम इंडियाचा 30 धावांनी विजय झाला. यासह टीम इंडियाने सीरिजमध्ये 4-0 ने आघाडी घेतली.
T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारत आणि श्रीलंका संघाचा हा पहिला स्कोअर आहे. धावांचा पाऊस पडणाऱ्या या सामन्यात असं काही झालं जे अजून महिला टी 20 क्रिकेटच्या इतिहासात कधीच झालं नव्हतं. श्रीलंकेने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला, त्यामुळे टीम इंडिया फलंदाजी करता मैदानात आली. यावेळी सलामीवीर फलंदाज स्मृती मंधानाने 48 बॉलमध्ये 80 धावा केल्या. यात त्याने 11 चौकार आणि 3 षटकार लगावले. श्रीलंकेविरुद्ध 27 धावांची खेळी करताच स्मृतीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10000 धावा पूर्ण केल्या. तर शेफाली वर्माने 79 धावा केल्या आणि ऋचा घोषने 16 बॉलमध्ये 40 धावा केल्या. टीम इंडियाने विजयासाठी श्रीलंकेच्या संघाला 222 धावांचं आव्हान दिलं होतं. श्रीलंकेच्या संघाने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 191 धावा केल्या.
असं पहिल्यांदाच घडलं :
महिला टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यादाच झालं जेव्हा दोन्ही संघाच्या खेळाडूंनी मिळून एकूण 412 धावा केल्या. पण या सामन्यात एकाही फलंदाजाने शतक लगावलं नाही. भारत विरुद्ध श्रीलंका महिला सामन्यात, स्मृती मानधना आणि शफाली वर्मा त्यांच्या शतकांच्या जवळ बाद झाल्या. श्रीलंकेची कर्णधार चामारी अथापथुने सर्वाधिक 52 धावा केल्या.
विजयाचं लक्ष पूर्ण करताना श्रीलंकेचा संघ शेवटपर्यंत लढला. कर्णधार चमारी अथापथ्थु सर्वात जास्त 52 धावा केल्या पण ती पुढे शतक लगावू शकली नाही आणि बाद झाली. श्रीलंकेने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावून 191 धावा केल्या, महिला टी20 मधील त्यांची हा सर्वोच्च धावसंख्या होती, परंतु तरीही त्यांना 30 धावांनी पराभव पत्करावा लागला.
मंधानाने केल्या सर्वात वेगवान 10000 धावा :
स्मृती मंधानाने सर्वात कमी इनिंगमध्ये 10000 धावांचा आकडा पूर्ण करून इतिहास रचला आहे. यासह तिने मिताली राजचा रेकॉर्ड मोडला. मिताली आणि मानधना व्यतिरिक्त, चार्लोट एडवर्ड्सने 316 इनिंगमध्ये 10000 आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण केल्या, तर सुझी बेट्सने 343 इनिंगमध्ये हा आकडा गाठला.






























