Homeमहाराष्ट्रतपोवन संवर्धन म्हणजे श्री राम आदित्य ठाकरे यांचे नाशिक दौऱ्यावर भाषण

तपोवन संवर्धन म्हणजे श्री राम आदित्य ठाकरे यांचे नाशिक दौऱ्यावर भाषण


आदित्य ठाकरे: मागील महिनाभरापासून गाजणार कुंभमेळ्यासाठी तपोवनात (Tapovan) संभाव्य वृक्षतोडीचा विषय यावेळी नाशिक महापालिका निवडणुकीत कळीचा मुद्दा बनला आहे. शनिवार २७ डिसेंबर रोजी महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना UBT पक्षाचे आमदार आणि माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी तपोवनाला भेट देऊन वृक्षप्रेमींशी चर्चा केली. यावेळी त्यांनी ‘तपोवन वाचलं पाहिजे रामाची भूमिका होती. मी आश्वासन देतो आमचा पक्ष प्रतिज्ञापत्र देईल… तसेच खासदारांनी संसदेत हा मुद्दा मांडला’ असं देखील आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

आदित्य ठाकरे यांनी तपोवनात संभाव्य वृक्षतोडीला विरोध करणाऱ्या वृक्षप्रेमींशी चर्चा केली आणि त्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिला. यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, ‘तपोवन वाचवा किंवा इतर सामाजिक प्रश्नांसंदर्भात नागरिकांनी पुढ आलं पाहिजे. तसेच राजकीय पक्षातील लोकांनी सुद्धा आपले झेंडे पट्टे बाजूला ठेऊन इथं आलं पाहिजे. मुंबईतील आरे कारशेड ला आम्ही विरोध केला. सत्तेत असताना आम्हीही पैसे कमवू शकलो असतो, पण तसं केलं नाही. वडाचे झाड तोडणार होते, तुम्ही मला ट्विट केलं मी लगेचच त्या नोटीस पर्यावरण मंत्री म्हणून फाडल्या होत्या. कंदिवनची जागा आम्ही वाचवली. तिथे रेल्वेची जागा आहे काही ठिकणी पण आता तिथं जंगल झालंय. झाडे नष्ट केली तर आपण जगणार कसे तसेच विनाश करून विकास कशाला?’ अशी भूमिका आदित्य ठाकरे यांनी यावेळी घेतली.

आदित्य ठाकरे यांनी बोलताना वेताळ टेकडीचं सुद्धा उदाहरण दिलं. ते बोलताना म्हणाले की, ‘पुण्यातील वेताळ टेकडीच्या तिथं विकासाच्या नावाखाली विनाश होणार होता. पण आमचं सरकार आल्यावर त्याला रद्द केल. तिथंही नागरिकांनी आंदोलन सुरू केलं होतं, वेताळ टेकडीला राजकिय लोकांनी पाठिंबा दिला तसेच तपोवन मध्ये करा’.

हेही वाचा : ‘भाजपला ठाण्यात शिंदेंचा पराभव करायचाय’; राऊतांचा आणखी एक शाब्दिक धमाका!

तपोवनाला रिझर्व्ह फॉरेस्ट घोषित करण्याची मागणी :

आदित्य ठाकरे यांनी तपोवनात वृक्षप्रेमींशी बोलताना तपोवनाला रिझर्व्ह फॉरेस्ट घोषित करण्याची मागणी केली. ते म्हणाले की, ‘आचारसंहिता उठल्यावर रिझर्व्ह फॉरेस्ट घोषित केले पाहिजे. टीडीआर जनरेट करायचा असेल तर मुख्यमंत्री करू शकतील. तपोवन सारख्या 10 जागा झाल्या पाहिजे. अर्बन फॉरेस्ट कमी कमी होत चालले आहे. बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टर खिशात पैसे आल्यावर पळून जातील. पंतप्रधान एक पेंड मा के नाम सांगतात त्यांचीच लोक झाडे तोडत आहे. कुंभमेळा होतच आला आहे, आपला विरोध कुंभमेळ्याला नाही’.

तपोवन वाचलं पाहिजे रामाची भूमिका – आदित्य ठाकरे :

आदित्य ठाकरे म्हणाले की, ‘संपूर्ण महाराष्ट्रात वृक्षतोड सुरू आहे. आपला विरोध कुंभाला नाही, तपोवन वाचलं पाहिजे रामाची भूमिका होती. तपोवनबाबत प्रतिज्ञापत्र घ्या. मी आश्वासन देतो आमचा पक्ष प्रतिज्ञापत्र देईल. आपल्या खासदारांनी संसदेत हा मुद्दा मांडला आहे. आम्ही प्रतिज्ञापत्र लिहून दयायला तयार आहोत. सगळ्याच राजकिय पक्षांना सांगा आणि प्रतिज्ञापत्र सगळ्यांचे लिहून घ्या’.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...

0
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...
spot_img

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
error: Content is protected !!