Homeमनोरंजनऑटो न्यूज टाटा पंच EV किंमत सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक SUV भारत वैशिष्ट्ये...

ऑटो न्यूज टाटा पंच EV किंमत सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक SUV भारत वैशिष्ट्ये आणि तपशील


ऑटो बातम्या: कोणतंही वाहन खरेदी करायचं म्हटलं की, अनेकदा पेट्रोल आणि डिझेलचे दर वाहन खरेदीपूर्वीच अनेकांना घाम फोडतात. मात्र आता ईवी वाहनांच्या उपलब्धतेमुळं ही चिंतासुद्धा काहीशी मिटत असून, आपल्याला हवी ती कार खरेदी करण्याचं धाडस अगदी मध्यमवर्गीय कुटुंबसुद्धा करताना दिसत आहेत. खिशाला परवडणारी, कुटुंबाला सामावून घेणारी आणि चांगलं मायलेज देणारी कार, असे निकष ठेवून ही मंडळी कार खरेदी करतात. अशा साऱ्यांपुढं टाटा कंपनीच्या एका कमाल कारचा पर्याय सध्या फायदेशीर Deal ठरत आहे.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

टाटाची कोणती कार मिळवतेय पसंती?

Tata Punch EV ही कार सध्या भारतात सर्वाधिक कमी किमतीची इलेक्ट्रीक कार ठरत असून, मध्यमवर्यी आणि पाचजणांच्या कुटुंबासाठी ही कार एक उत्तम पर्याय आहे. SUV सारखा भक्कम लूक, टाटा कंपनीवर ग्राहकांचा असणारा विश्वास आणि इंधनासाठी येणारा किमान यामुळं या कारला अनेकांचीच पसंती आहे.

ही कार आणायची म्हणजे किती किंमत मोजावी लागणार?

Tata Punch EVची एक्स शोरुम किंमत 9.99 लाख रुपयांपासून सुरू होत असून, हीच किंमत या कारच्या बेस व्हेरिएंट Smart MRची सुद्धा आहे. या कारच्या टॉप मॉडेलची विक्री 14.99 लाख रुपयांना केली जाते. सध्या कंपनीकडून कार खरेदीवर आकर्षक ऑफर दिल्या जात असून, यामध्ये 100 टक्के ऑन रोड फायनान्सिंग आणि 1.20 लाख रुपयांपर्यंतचा फायदा मिळतो. Punch Ev ला तुम्ही फक्त 8,099 रुपये इतक्या EMI वर खरेदी करता येत असल्यानं कार मध्यमवर्गीयांच्याही खिशाला परवडत आहे.

बॅटरी आणि चार्जिंग…

Tata Punch EV दोन बॅटरी पर्यायांमध्ये येते, यामध्ये पहिला बॅकअप 25 kWh असून तो 315 किलोमीटर इतकी रेंज देतो. तर, 35 kWh बॅटरी एका चार्जिंगमध्ये 421 किलोमीटर इतकी रेंज देते. DC फास्ट चार्जर मुळं 10 ते 80 टक्के चार्ज होण्यासाठी ही बॅटरी 56 मिनिटांचा वेळ घेते असा दावा कंपनी करते.

टाटा Punch EV मध्ये मोठी टचस्क्रीन सिस्टीम, वायरलेस Android Auto, Apple CarPlay, डिजिटल डिस्प्ले, 360-डिग्री कॅमेरा, क्रूझ कंट्रोल, इलेक्ट्रिक सनरूफ असे फिचर मिळतात. हाय ग्राऊंड क्लिअरन्स ही या कारची जमेची बाजू असून, भारतीय रस्त्यांवर कार चावण्याचा उत्तम अनुभव यामुळं मिळतो. फक्त फिचर नव्हे, तर सुरक्षेच्या बाबतीतही कंपनीनं कार निर्मितीत उत्तम काम केलं असून त्यात 6 एअरबॅग देण्यात आल्या आहेत. ABS, EBD, हिल होल्ड कंट्रोल या कारमध्ये मिळते. त्यामुळं 10 लाखांच्या बजेटमध्ये एखादी चांगली कार शोधत असाल तर हा एक उत्तम पर्याय आहे असं म्हटलं जात आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

भगवंत मान म्हणाले- काँग्रेसमध्ये 500 कोटींमध्ये मुख्यमंत्री बनतो:मजीठियावरही निशाणा, म्हणाले- जामिनावर बाहेर आले, किल्ला...

0
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आज पंजाबमधील २८०० डेपो धारकांना नवीन परवाने सुपूर्द केले. यावेळी मोहाली येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते....

Maharashtra Government Stops Free Saree Scheme; Eknath Shinde Policy Halted

0
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'तून पडताळणीदरम्यान ९२ लाख महिलांचे अर्ज बाद झाल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली असतानाच, आता राज्यातील गरीब आणि गरजू महिलांना...

NEET-UG 2026 निकाल घोषित: 11.21 लाख विद्यार्थी पात्र

0
नवी दिल्ली52 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करानॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने गुरुवारी NEET-UG 2026 चा निकाल जाहीर केला आहे. या वर्षी देश-विदेशातील 551 शहरांमधील 5,440...

जगन्नाथ रथयात्रा:87 दिवसांत 220 कारागीर तीन रथ बनवतात, यात्रेनंतर एक चाक 3 लाखांपर्यंत विकले...

0
ओडिशातील पुरी येथे आज भगवान जगन्नाथाची रथयात्रा काढण्यात येत आहे. भगवान जगन्नाथ आपले मोठे बंधू बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांच्यासह वेगवेगळ्या रथांमध्ये स्वार...
spot_img

फिफा विश्वचषक चाहत्यांच्या परंपरा

0
मराठी बातम्याखेळफिफा विश्वचषक चाहत्यांच्या परंपरा | नॉर्वे वायकिंग चांट आणि जपान स्वच्छताबोस्टन8 तासांपूर्वीलिंक कॉपी कराकाही दिवसांपूर्वी बोस्टनच्या एका गजबजलेल्या रेल्वे स्थानकावर असे दृश्य...

पावसाळ्यामध्ये वाढतात फूड पॉयझनिंगचे रुग्ण:ही 7 लक्षणे दुर्लक्षित करू नका, डॉक्टरांकडून जाणून घ्या बचावासाठीच्या...

0
पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रता वाढते. यामुळे खाण्यापिण्याच्या वस्तूंमध्ये बॅक्टेरिया आणि व्हायरस लवकर वाढतात. हेच कारण आहे की, या हंगामात फूड पॉयझनिंगचे प्रमाण जास्त असते....

‘प्रहार, द उज्ज्वल निकम स्टोरी’ लवकरच प्रदर्शित होणार:निकम म्हणाले- राजकुमारने माझी नक्कल केली नाही,...

0
राजकुमार राव अभिनीत 'प्रहार: द उज्ज्वल निकम स्टोरी' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होईल. या चित्रपटाच्या तयारीबद्दल आणि राजकुमारच्या मेथड ॲक्टिंगबद्दल स्वतः ज्येष्ठ वकील...

MG नवीन हायब्रिड व EV तंत्रज्ञान उद्या सादर करेल:SUV 69.2kWh बॅटरी पॅकसह 530 किमीची...

0
एमजी मोटर्स 16 जुलै रोजी भारतात आपली नवीन 'न्यू एनर्जी व्हेईकल' टेक्नॉलॉजी सादर करणार आहे. कंपनी या कार्यक्रमात आपली नवीन प्लग-इन हायब्रिड किंवा...
error: Content is protected !!