HomeमनोरंजनPolitician Shashi Tharoor backs teen prodigy Vaibhav Suryavanshi for India call-up said...

Politician Shashi Tharoor backs teen prodigy Vaibhav Suryavanshi for India call-up said Like Sachin at 14 | Vaibhav Suryavanshi: शशी थरूरांनी केली वैभव सूर्यवंशीची सचिनसोबत तुलना! वक्तव्यामुळे खळबळ; निवडकर्त्यांना विचारला थेट प्रश्न


वैभव सूर्यवंशी यांच्यावर शशी थरूर: भारतीय क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा एका खळबळ माजवली आहे. काही अल्पवयीन खेळाडूने स्वतःविषयी प्रचंड चर्चा निर्माण करायला भाग पाडलं आहे. गेल्या काही काळापासून वैभव सूर्यवंशी हे नाव खूप कौतुक मिळवत आहे. त्याची खूप चर्चा आहे कारण तो असा खेळ दाखवत आहे की त्याची दखल घेणे भाग पाडत आहे. बिहारचा अवघा 14 वर्षीय वैभव सूर्यवंशी याने विजय हजारे ट्रॉफीत केलेल्या ऐतिहासिक खेळीमुळे संपूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे. या कामगिरीनंतर काँग्रेस खासदार आणि क्रिकेटप्रेमी शशी थरूर यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमुळे मोठा वाद आणि उत्सुकता निर्माण झाली आहे. थरूर यांनी थेट वैभवची तुलना सचिन तेंडुलकरांशी करत निवडकर्त्यांनाच सवाल केला आहे.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

14 व्या वर्षी इतिहास रचणारी खेळी

विजय हजारे ट्रॉफीतील पहिल्याच सामन्यात वैभव सूर्यवंशीने अरुणाचल प्रदेशविरुद्ध अवघ्या 84 चेंडूंमध्ये 190 धावांची तुफानी खेळी केली. या अविश्वसनीय इनिंगच्या जोरावर बिहारने 6 गडी गमावत 574 धावा फटकावल्या, जो विजय हजारे ट्रॉफी आणि लिस्ट-ए क्रिकेटमधील आतापर्यंतचा सर्वोच्च संघ स्कोअर ठरला.

टीकांना दिले सडेतोड उत्तर

ही खेळी अशा वेळी आली आहे, जेव्हा काही दिवसांपूर्वी अंडर-19 आशिया कप फायनलमधील अपयशानंतर वैभवच्या मानसिक ताकदीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. मात्र या सामन्यात त्याने जबरदस्त टायमिंग, अफाट ताकद आणि परिस्थितीची उत्तम जाण दाखवत आपण वयाच्या कितीतरी पुढचे क्रिकेट खेळतो, हे सिद्ध करून दाखवले.

शशी थरूर यांचे खळबळजनक वक्तव्य

वैभवच्या या ऐतिहासिक खेळीने शशी थरूरही भारावून गेले. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ (माजी ट्विटर) वर त्यांनी लिहिले, “मागच्या वेळी जेव्हा एखाद्या 14 वर्षांच्या मुलाने अशी विलक्षण आणि असामान्य प्रतिभा दाखवली होती, तेव्हा तो सचिन तेंडुलकर होता. निवडकर्ते नेमकं कशाची वाट पाहत आहेत?” या विधानानंतर क्रिकेट वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

आकाश चोप्रांचीही सहमती

माजी भारतीय सलामीवीर आकाश चोप्रा यांनीही वैभवची ही खेळी ‘असाधारण’ असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या मते, जर वैभवने अशीच कामगिरी इंडियन प्रीमियर लीगमध्येही केली, तर भारतीय संघात त्याला संधी मिळणे थांबवणे निवडकर्त्यांसाठी कठीण ठरेल.

IPL आणि पुढचा प्रवास

राजस्थान रॉयल्सने रिटेन केलेल्या वैभव सूर्यवंशीसाठी येणारा IPL हंगाम अत्यंत निर्णायक ठरणार आहे. मोठ्या व्यासपीठावरही तो असाच निर्भय खेळ दाखवतो का, की त्याला शिकण्याच्या प्रक्रियेतून जावे लागते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र एवढे नक्की, की वैभव सूर्यवंशीने भारतीय क्रिकेटला एक नवा सुपरस्टार मिळण्याची चाहूल दिली आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

पैठणमध्ये स्वाभिमानीचे शोले स्टाईल आंदोलन:साखर कारखान्याच्या 19 कोटी 50 लाखांच्या एफआरपीसाठी टाकीवर चढून आंदोलन

0
संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याने 2025-26 च्या हंगामातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची तब्बल 19 कोटी 50 लाख रुपयांची एफआरपी (FRP) थकविल्याच्या निषेधार्थ आज पैठणमध्ये...

17 ऑगस्टपर्यंत सूर्य कर्क राशीत:वृषभ राशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढेल, प्रवासात लाभ होईल, कन्या राशीसाठी...

0
सूर्य मिथुन राशीतून बाहेर पडून कर्क राशीत आला आहे. सूर्याच्या राशी बदलाला संक्रांती म्हणतात. काही हिंदी पंचांगानुसार कर्क संक्रांतीची तारीख 16 जुलै तर...

तिसरा वनडे- न्यूझीलंडने वेस्ट इंडिजला 6 गडी राखून हरवले:मालिकेत 2-1 ची आघाडी; लेनोक्सने 4...

0
न्यूझीलंडने गयाना येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा 6 गडी राखून पराभव केला. या विजयासह किवी संघाने 5 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत...

भगवंत मान म्हणाले- काँग्रेसमध्ये 500 कोटींमध्ये मुख्यमंत्री बनतो:मजीठियावरही निशाणा, म्हणाले- जामिनावर बाहेर आले, किल्ला...

0
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आज पंजाबमधील २८०० डेपो धारकांना नवीन परवाने सुपूर्द केले. यावेळी मोहाली येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते....
spot_img

तिसरा वनडे- न्यूझीलंडने वेस्ट इंडिजला 6 गडी राखून हरवले:मालिकेत 2-1 ची आघाडी; लेनोक्सने 4...

0
न्यूझीलंडने गयाना येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा 6 गडी राखून पराभव केला. या विजयासह किवी संघाने 5 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत...

फिफा विश्वचषक चाहत्यांच्या परंपरा

0
मराठी बातम्याखेळफिफा विश्वचषक चाहत्यांच्या परंपरा | नॉर्वे वायकिंग चांट आणि जपान स्वच्छताबोस्टन8 तासांपूर्वीलिंक कॉपी कराकाही दिवसांपूर्वी बोस्टनच्या एका गजबजलेल्या रेल्वे स्थानकावर असे दृश्य...

पावसाळ्यामध्ये वाढतात फूड पॉयझनिंगचे रुग्ण:ही 7 लक्षणे दुर्लक्षित करू नका, डॉक्टरांकडून जाणून घ्या बचावासाठीच्या...

0
पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रता वाढते. यामुळे खाण्यापिण्याच्या वस्तूंमध्ये बॅक्टेरिया आणि व्हायरस लवकर वाढतात. हेच कारण आहे की, या हंगामात फूड पॉयझनिंगचे प्रमाण जास्त असते....

‘प्रहार, द उज्ज्वल निकम स्टोरी’ लवकरच प्रदर्शित होणार:निकम म्हणाले- राजकुमारने माझी नक्कल केली नाही,...

0
राजकुमार राव अभिनीत 'प्रहार: द उज्ज्वल निकम स्टोरी' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होईल. या चित्रपटाच्या तयारीबद्दल आणि राजकुमारच्या मेथड ॲक्टिंगबद्दल स्वतः ज्येष्ठ वकील...
error: Content is protected !!