Homeमनोरंजनभारतातील अल्कोहोल सेवनाने दिवसाला फक्त एक पेय 50 टक्के जास्त तोंडाच्या कर्करोगाच्या...

भारतातील अल्कोहोल सेवनाने दिवसाला फक्त एक पेय 50 टक्के जास्त तोंडाच्या कर्करोगाच्या जोखमीशी जोडलेले आहे


अल्कोहोलच्या सेवनाने तोंडाच्या कर्करोगाचा धोका: थोडी प्यायल्याने काही होत नाही रे, असं म्हणणाऱ्या तळीरामांना धक्का देणारं संशोधन समोर आलं आहे. रोज फक्त एक पेग मद्य प्यायलं तरी कॅन्सरचा धोका 50 टक्क्यांनी वाढतो असं एका संशोधनामधून समोर आलं आहे. मुंबईतील टाटा मेमोरियल सेंटरच्या खारघरच्या सेंटर फॉर कॅन्सर एपिडेमिओलॉजीने केलेल्या अभ्यासामध्ये ही माहिती समोर आली आहे. दारुचे कमी प्रमाणात नियमित सेवन केले तरी तोंडाच्या कर्करोगाचा धोका वाढतो, असा निष्कर्ष मुंबईतील टाटा मेमोरियल सेंटरच्या खारघरच्या सेंटर फॉर कॅन्सर एपिडेमिओलॉजीने (अॅक्ट्रेक) एका अभ्यासातून काढला आहे. ओपन अॅक्सेस जर्नल बीएमजे ग्लोबल हेल्थमध्ये प्रकाशित अभ्यासानुसार, थोड्या प्रमाणात रोज मद्यपान केलं तरी तोंडाच्या, विशेषतः बक्कल म्यूकोसा (गालांच्या आतल्या भागातील) कर्करोगाचा धोका सुमारे 50 टक्क्यांनी वाढतो. यामध्ये महुआ, ताडी, देशी दारू या मद्यांचा धोका सर्वाधिक असल्याचे स्पष्ट झाले.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

तंबाखू सेवन, मद्यपानामुळे कर्करोगाचा धोका चार पट वाढतो

तंबाखू सेवन आणि मद्यपानची सवय एकत्र असतील तर कर्करोगाचा धोका अधिक वाढतो असंही अभ्यासात म्हटलं आहे. 2010 ते 2021 या कालावधीत बक्कल म्युकोसा कर्करोग निदान झालेल्या 1803 रुग्णांची तुलना 1903 निरोगी व्यक्तींशी करण्यात आली. अभ्यासात 11 आंतरराष्ट्रीय व 30 स्थानिक मद्यप्रकारांचा समावेश होता. अभ्यासातून असेही स्पष्ट झाले की, तंबाखू सेवन आणि मद्यपान या दोन्ही सवयी एकत्र असतील, तर तोंडाच्या कर्करोगाचा धोका चार पटीने वाढतो.

अभ्यासातून काय अधोरेखित झाले?

मद्यपेयांना आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘गट-1 कर्करोगकारक’ म्हणून वर्गीकृत केले आहे, असं टाटा मेमोरियल सेंटरचे संचालक डॉ. सुदीप गुप्ता यांनी सांगितले. अॅक्ट्रेकचे संचालक डॉ. पंकज चतुर्वेदी यांनी देशी मद्याच्या बाजारपेठेवर नियंत्रण नसल्याकडे लक्ष वेधले. सेंटर फॉर कॅन्सर एपिडेमिओलॉजीचे संचालक डॉ. राजेश दीक्षित यांच्या मते, भारतातील बक्कल म्युकोसा कर्करोगाच्या सुमारे 11.5 टक्के प्रकरणे थेट मद्यपानाशी संबंधित आहेत.

बक्कल म्युकोसाचे प्रमाण लक्षणीय

भारतामध्ये तोंडाचा कर्करोग हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक आढळणारा कर्करोग आहे. संशोधकांच्या मते दरवर्षी अंदाजे 1 लाख 43 हजार 759 नवीन रुग्ण आढळतात व 79,979 मृत्यू या आजारामुळे होतात. भारतीय पुरुषांमध्ये दर एक लाखांमागे सुमारे १५ इतका त्याचा प्रसार आहे. भारतात तोंडाच्या कर्करोगाचा प्रमुख प्रकार हा गालांच्या व ओठांच्या आतल्या मऊ गुलाबी आवरणाचा (बक्कल म्युकोसा) कर्करोग आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

पैठणमध्ये स्वाभिमानीचे शोले स्टाईल आंदोलन:साखर कारखान्याच्या 19 कोटी 50 लाखांच्या एफआरपीसाठी टाकीवर चढून आंदोलन

0
संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याने 2025-26 च्या हंगामातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची तब्बल 19 कोटी 50 लाख रुपयांची एफआरपी (FRP) थकविल्याच्या निषेधार्थ आज पैठणमध्ये...

17 ऑगस्टपर्यंत सूर्य कर्क राशीत:वृषभ राशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढेल, प्रवासात लाभ होईल, कन्या राशीसाठी...

0
सूर्य मिथुन राशीतून बाहेर पडून कर्क राशीत आला आहे. सूर्याच्या राशी बदलाला संक्रांती म्हणतात. काही हिंदी पंचांगानुसार कर्क संक्रांतीची तारीख 16 जुलै तर...

तिसरा वनडे- न्यूझीलंडने वेस्ट इंडिजला 6 गडी राखून हरवले:मालिकेत 2-1 ची आघाडी; लेनोक्सने 4...

0
न्यूझीलंडने गयाना येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा 6 गडी राखून पराभव केला. या विजयासह किवी संघाने 5 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत...

भगवंत मान म्हणाले- काँग्रेसमध्ये 500 कोटींमध्ये मुख्यमंत्री बनतो:मजीठियावरही निशाणा, म्हणाले- जामिनावर बाहेर आले, किल्ला...

0
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आज पंजाबमधील २८०० डेपो धारकांना नवीन परवाने सुपूर्द केले. यावेळी मोहाली येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते....
spot_img

तिसरा वनडे- न्यूझीलंडने वेस्ट इंडिजला 6 गडी राखून हरवले:मालिकेत 2-1 ची आघाडी; लेनोक्सने 4...

0
न्यूझीलंडने गयाना येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा 6 गडी राखून पराभव केला. या विजयासह किवी संघाने 5 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत...

फिफा विश्वचषक चाहत्यांच्या परंपरा

0
मराठी बातम्याखेळफिफा विश्वचषक चाहत्यांच्या परंपरा | नॉर्वे वायकिंग चांट आणि जपान स्वच्छताबोस्टन8 तासांपूर्वीलिंक कॉपी कराकाही दिवसांपूर्वी बोस्टनच्या एका गजबजलेल्या रेल्वे स्थानकावर असे दृश्य...

पावसाळ्यामध्ये वाढतात फूड पॉयझनिंगचे रुग्ण:ही 7 लक्षणे दुर्लक्षित करू नका, डॉक्टरांकडून जाणून घ्या बचावासाठीच्या...

0
पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रता वाढते. यामुळे खाण्यापिण्याच्या वस्तूंमध्ये बॅक्टेरिया आणि व्हायरस लवकर वाढतात. हेच कारण आहे की, या हंगामात फूड पॉयझनिंगचे प्रमाण जास्त असते....

‘प्रहार, द उज्ज्वल निकम स्टोरी’ लवकरच प्रदर्शित होणार:निकम म्हणाले- राजकुमारने माझी नक्कल केली नाही,...

0
राजकुमार राव अभिनीत 'प्रहार: द उज्ज्वल निकम स्टोरी' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होईल. या चित्रपटाच्या तयारीबद्दल आणि राजकुमारच्या मेथड ॲक्टिंगबद्दल स्वतः ज्येष्ठ वकील...
error: Content is protected !!