HomeमनोरंजनTRAI च्या कडक उपाययोजनांमुळे प्रति तास फक्त 12 मिनिटांच्या जाहिरातींना परवानगी आहे...

TRAI च्या कडक उपाययोजनांमुळे प्रति तास फक्त 12 मिनिटांच्या जाहिरातींना परवानगी आहे मराठी बातम्या


TRAI नियम: आपण टीव्हीवर एखादी सिरियल, सिनेमा पाहत असू तर वारंवार येणाऱ्या जाहिरातींचा कंटाळा तुम्हालाही कधी ना कधी आला असेल. जाहिराती किती असाव्या, यावर नियम बनवायला हवेत, अशा चर्चा आपण केल्या असतील. पण आता काळजी करण्याची गरज नाही. कारण भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजे ट्राय (TRAI) ने यासंदर्भात महत्वाचे निर्देश दिले आहेत. काय घडलंय नेमकं? सविस्तर जाणून घेऊया.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

काय नेमकं प्रकरण?

ट्रायची ही नियमावली 2012 आणि 2013 मधील जाहिरात नियंत्रण आणि सेवा गुणवत्ता नियमांवर आधारित आहे. यात 10 मिनिटे व्यावसायिक जाहिराती आणि 2 मिनिटे चॅनेलच्या स्वतःच्या प्रचाराला परवानगी आहे. सध्या या मर्यादेला न्यायालयात आव्हान देण्यात आलंय. असे असले तरी अंतिम निर्णय येईपर्यंत नियम लागू राहील आणि चॅनेल्सना त्याचे पालन करणेच बंधनकारक आहे, असं ट्रायने म्हटलंय. नुकताच 18 नोव्हेंबर 2025 रोजी कारणे दाखवा नोटिसा दिल्यानंतर ट्रायने बैठक घेऊन हा नियम पुन्हा अधोरेखित केलाय. यानुसार टीव्ही चॅनेल्सना प्रति तास फक्त 12 मिनिटेच जाहिराती दाखवण्याची मर्यादा कठोरपणे पाळण्याचे आदेश दिले आहेत.

टीव्ही प्रसारकांना मोठा फटका

ट्रायच्या या निर्णयामुळे आधीच आर्थिक अडचणींमध्ये सापडलेल्या टीव्ही प्रसारकांना मोठा फटका बसू शकतो. 2025 च्या पहिल्या नऊ महिन्यांत जाहिरातींच्या प्रमाणात 10 टक्के घट झाली आहे. चॅनेल्स चालवण्याचा खर्च वाढतोय तर सदस्यता शुल्क आणि जाहिरातीतून येणारे उत्पन्न दोन्ही कमी होतय. डिजिटल प्लॅटफॉर्म्सशी स्पर्धा वाढलीय. जिथे जाहिरातींवर कोणतीही मर्यादा नाही. हा जुना नियम आजच्या बाजारपेठेशी जुळत नाही आणि त्यामुळे त्यांचे नुकसान होईल, असे प्रसारकांचे म्हणणे आहे.

अन्यथा भविष्यात कारवाई

दिल्ली उच्च न्यायालयाने या नियमावर दंडात्मक कारवाई करण्यावर तात्पुरती थांबवलीय. पण नियम पूर्णपणे स्थगित केलेला नाही. ट्रायने प्रसारकांना कारणे दाखवा नोटिसा पाठवल्या होत्या आणि त्यांच्या उत्तरांचे मूल्यांकन केले जात आहे. न्यायालयाचा अंतिम निकाल येईपर्यंत ट्राय नियम लागू ठेवण्यावर ठाम आहे. यामुळे प्रसारकांना सावध राहावे लागेल आणि जाहिरातींचे नियोजन काळजीपूर्वक करावे लागेल, अन्यथा भविष्यात कारवाई होऊ शकते, असे स्पष्ट करण्यात आलंय.

नवा नियम दर्शकांसाठी फायदेशीर

जास्त जाहिरातींमुळे कार्यक्रमात व्यत्यय येतो आणि पाहण्याचा आनंद कमी होतो. त्यामुळे हा नियम दर्शकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. कार्यक्रमांची गुणवत्ता टिकवणे आणि दर्शकांना चांगला अनुभव देणे हा ट्रायचा उद्देश आहे. मात्र प्रसारकांना याचा आर्थिक फटका बसतो. कारण जाहिराती हे त्यांचे मुख्य उत्पन्नाचे स्रोत आहे. वाढत्या खर्चात आणि कमी होणाऱ्या कमाईत अशी अतिरिक्त बंधने सहन करणे कठीण आहे, असे  उद्योगातील ज्येष्ठ अधिकारी म्हणतात.

टीव्ही उद्योगासाठी आव्हानात्मक

ट्रायचा हा निर्णय टीव्ही उद्योगासाठी आव्हानात्मक आहे पण दर्शकांच्या हिताचा आहे. प्रसारकांनी न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहताना नियमांचे पालन करणे सुरक्षित राहील. डिजिटल माध्यमांवर अशी मर्यादा नसल्याने भविष्यात नियमांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. हा नियम केबल टेलीव्हिजन नेटवर्क नियम 1994 मधूनही प्रेरित आहे. प्रसारक आणि ट्राय यांच्यातील हा वाद बाजारपेठेच्या बदलत्या स्वरूपामुळे उद्भवल्याचे सांगितले जाते.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

सावरकर मानहानी प्रकरण; पणतू म्हणाले- नेहरू ब्रिटिश समर्थक होते:सावरकरांनी इंग्रजांशी समझोता केला असता तर...

0
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे पणतू सात्यकी यांनी मंगळवारी पुणे येथील विशेष न्यायालयात राहुल गांधी यांच्या विरोधात सुरू असलेल्या मानहानीच्या खटल्यात जबाब दिला....

पैठणमध्ये स्वाभिमानीचे शोले स्टाईल आंदोलन:साखर कारखान्याच्या 19 कोटी 50 लाखांच्या एफआरपीसाठी टाकीवर चढून आंदोलन

0
संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याने 2025-26 च्या हंगामातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची तब्बल 19 कोटी 50 लाख रुपयांची एफआरपी (FRP) थकविल्याच्या निषेधार्थ आज पैठणमध्ये...

17 ऑगस्टपर्यंत सूर्य कर्क राशीत:वृषभ राशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढेल, प्रवासात लाभ होईल, कन्या राशीसाठी...

0
सूर्य मिथुन राशीतून बाहेर पडून कर्क राशीत आला आहे. सूर्याच्या राशी बदलाला संक्रांती म्हणतात. काही हिंदी पंचांगानुसार कर्क संक्रांतीची तारीख 16 जुलै तर...

तिसरा वनडे- न्यूझीलंडने वेस्ट इंडिजला 6 गडी राखून हरवले:मालिकेत 2-1 ची आघाडी; लेनोक्सने 4...

0
न्यूझीलंडने गयाना येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा 6 गडी राखून पराभव केला. या विजयासह किवी संघाने 5 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत...
spot_img

तिसरा वनडे- न्यूझीलंडने वेस्ट इंडिजला 6 गडी राखून हरवले:मालिकेत 2-1 ची आघाडी; लेनोक्सने 4...

0
न्यूझीलंडने गयाना येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा 6 गडी राखून पराभव केला. या विजयासह किवी संघाने 5 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत...

फिफा विश्वचषक चाहत्यांच्या परंपरा

0
मराठी बातम्याखेळफिफा विश्वचषक चाहत्यांच्या परंपरा | नॉर्वे वायकिंग चांट आणि जपान स्वच्छताबोस्टन8 तासांपूर्वीलिंक कॉपी कराकाही दिवसांपूर्वी बोस्टनच्या एका गजबजलेल्या रेल्वे स्थानकावर असे दृश्य...

पावसाळ्यामध्ये वाढतात फूड पॉयझनिंगचे रुग्ण:ही 7 लक्षणे दुर्लक्षित करू नका, डॉक्टरांकडून जाणून घ्या बचावासाठीच्या...

0
पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रता वाढते. यामुळे खाण्यापिण्याच्या वस्तूंमध्ये बॅक्टेरिया आणि व्हायरस लवकर वाढतात. हेच कारण आहे की, या हंगामात फूड पॉयझनिंगचे प्रमाण जास्त असते....

‘प्रहार, द उज्ज्वल निकम स्टोरी’ लवकरच प्रदर्शित होणार:निकम म्हणाले- राजकुमारने माझी नक्कल केली नाही,...

0
राजकुमार राव अभिनीत 'प्रहार: द उज्ज्वल निकम स्टोरी' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होईल. या चित्रपटाच्या तयारीबद्दल आणि राजकुमारच्या मेथड ॲक्टिंगबद्दल स्वतः ज्येष्ठ वकील...
error: Content is protected !!