Homeमनोरंजनदृष्यम 3 च्या रिलीजची तारीख निश्चित झाली आहे अजय देवगणचा चित्रपट 2...

दृष्यम 3 च्या रिलीजची तारीख निश्चित झाली आहे अजय देवगणचा चित्रपट 2 ऑक्टोबर 2026 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे


दृश्यम 3 प्रकाशन तारीख: बॉलिवूड अभिनेता अजय देवगनच्या बहुप्रतिक्षित चित्रपट ‘दृश्यम 3’ संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. अजय देवगण पुन्हा एकदा आपल्या कुटुंबाच्या रक्षणासाठी कोणत्याही थराला जाण्यास सज्ज असल्याचं या नव्या टीझरमधून स्पष्ट होत आहे. अजयने स्वतः सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत चित्रपटाची रिलीज डेटही जाहीर केली आहे.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

अजय देवगणने शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, ‘दृश्यम 3’, हा चित्रपट 2026 मध्ये रिलीज होणार आहे. कथा अजून संपलेली नाही. शेवटचा भाग बाकी आहे. ‘दृश्यम 3’ हा चित्रपट 2 ऑक्टोबर 2026 रोजी म्हणजेच गांधी जयंतीच्या दिवशी देशभरातील सिनेमागृहांत प्रदर्शित होणार आहे.

‘दृश्यम 3’च्या टीझरमध्ये काय आहे खास?

‘दृश्यम 3’च्या टीझरमध्ये अजय देवगन पुन्हा एकदा विजय साळगावकरच्या भूमिकेत दिसतो. या टीझरमध्ये पहिल्या दोन भागांमधील काही महत्त्वाचे सीन दाखवण्यात आले असून, कथानकाची तीव्रता अधिक वाढलेली जाणवते.

टीझरमध्ये अजय म्हणतो, ‘जग मला अनेक नावाने ओळखते, पण मला त्याची पर्वा नाही. गेल्या सात वर्षांत जे काही घडले आहे, मी जे काही केले आहे, त्यामुळे मला एक गोष्ट समजली आहे. या जगात प्रत्येकाचे सत्य वेगळे आहे. प्रत्येकाचा अधिकार वेगळा आहे. माझे सत्य, माझा अधिकार फक्त माझे कुटुंब आहे.

जोपर्यंत प्रत्येकजण थकत नाही, जोपर्यंत प्रत्येकाचा पराभव होत नाही, तोपर्यंत मी येथे उभा राहीन – एका चौकीदाराप्रमाणे, भिंतीप्रमाणे. कारण कथा अजून संपलेली नाही… शेवटचा भाग अजून बाकी आहे.”. या संवादांमधूनच ‘दृश्यम 3’मध्ये पुन्हा एकदा थरार, भावनिक संघर्ष आणि मेंदूला चालना देणारी कथा पाहायला मिळणार असल्याचं स्पष्ट होतं.

शक्तिशाली कलाकार

‘दृश्यम 3’मध्ये अजय देवगण मुख्य भूमिकेत असून, श्रिया सरन पुन्हा एकदा त्याच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. इशिता दत्ता त्यांची मुलगी तर तब्बू ही कणखर पोलीस अधिकारी आयजी मीरा देशमुखच्या भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक पाठक करत असून, निर्मितीची धुरा कुमार मंगत पाठक आणि आलोक जैन यांनी सांभाळली आहे.

आता ‘दृश्यम 3’च्या घोषणेमुळे चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली असून, विजय साळगावकरची ही अंतिम लढाई कशी रंगणार याकडे संपूर्ण सिनेसृष्टीचं लक्ष लागलं आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...

0
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...
spot_img

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
error: Content is protected !!