Homeमहाराष्ट्रपुणे जमीन प्रकरणात अंजली दमानिया यांनी आणखी काही कागदपत्रे सादर करून मोठा...

पुणे जमीन प्रकरणात अंजली दमानिया यांनी आणखी काही कागदपत्रे सादर करून मोठा खुलासा केला आहे


अंजली दमानिया : राज्यात सध्या गाजत असलेल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणात एकामागून एक नवे खुलासे समोर येत असून, या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. 2021 मध्ये शितल तेजवानी आणि पार्थ पवार यांच्यात झालेल्या पॉवर ऑफ अॅटॉर्नी व्यवहाराशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे आता समोर आली आहेत. विशेष म्हणजे, या पॉवर ऑफ अॅटॉर्नीवर दोन्ही पक्षांच्या सह्या असल्याची माहिती समोर येत आहे.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

या प्रकरणात आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे, संबंधित कागदपत्रे स्वतः दिग्विजय पाटील आणि शितल तेजवानी यांचे वकील असलेल्या वकील तृप्ता ठाकुर यांनीच बाहेर काढली आहेत. त्यांनी ही कागदपत्रे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना पाठवल्याची माहिती समोर आली असून यामागील कारणही आता उघड होत आहे.

‘पार्थ पवारांना झुकतं माप दिलं जातंय’

या प्रकरणात पार्थ पवार यांचे नाव वारंवार समोर येत असतानाही त्यांच्यावर कोणतीही थेट कारवाई होत नसल्याची भावना संबंधित वकिलांमध्ये असल्याचे बोलले जात आहे. दिग्विजय पाटील आणि शितल तेजवानी यांनाच सातत्याने चौकशी व त्रासाला सामोरे जावे लागत असून, पार्थ पवार मात्र गोत्यात येत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. याच भावनेतून वकील तृप्ता ठाकुर यांनी पार्थ पवारांविरोधातील कागदपत्रे समोर आणल्याचे अंजली दमानिया यांनी सांगितले आहे.

सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, शितल तेजवानी यांनी 2021 मध्ये पार्थ पवार यांना सर्व व्यवहारांचे अधिकार पॉवर ऑफ अॅटॉर्नीद्वारे दिले होते. या संदर्भातील सर्व माहिती आणि कागदपत्रे पोलिसांकडे आधीपासूनच उपलब्ध असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. मात्र, तरीही कारवाई होत नसल्यामुळे संशय अधिक बळावत आहे.

व्हॉट्सअ‍ॅप चॅटमुळे वाद अधिक गडद

या प्रकरणाला आणखी वेगळे वळण मिळाले असून, अजित पवारांचे पीए संतोष हिंगणे, राम चौबे आणि अ‍ॅडवोकेट तृप्ता ठाकूर यांच्यातील व्हॉट्सअ‍ॅप चॅट समोर आले आहेत. या चॅटमध्ये पार्थ पवारांच्या बंगल्याचे लोकेशन शेअर केल्याचा उल्लेख असल्याने प्रकरण अधिक संवेदनशील बनले आहे. विशेष म्हणजे, अजित पवारांचे तीन ओएसडी या संवादात सहभागी असल्याचा दावाही करण्यात येत आहे.

या सर्व घडामोडींनंतर पार्थ पवार यांच्यावर एफआयआर दाखल करण्याच्या मागणीसाठी उद्या पुणे पोलिसांची भेट घेण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या मागणीमुळे हे प्रकरण आता कायदेशीर पातळीवर आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...

0
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...
spot_img

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
error: Content is protected !!