HomeमनोरंजनNot only from T20 Word Cup 2026 Shubman Gill dropped from T20I...

Not only from T20 Word Cup 2026 Shubman Gill dropped from T20I squad for New Zealand series | Shubman Gill: शुभमन गिलला BCCI चा डबल दणका! केवळ वर्ल्ड कपच नाही तर ‘इथूनही’ डच्चू


शुभमन गिल T20I संघातून वगळला : मुंबईतील बीसीसीआय मुख्यालयात भारतीय निवड समितीचे माजी खेळाडू प्रज्ञान ओझा आणि आरपी सिंग आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी मिळून एक मिटिंग घेतली. या २० डिसेंबरच्या मिटिंगनंतर संघाची घोषणा करण्यात आली आहे. टी-२० वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर केल्यावर त्यात अनेक धक्कदायक नावे दिसली तर काही गायब होती. या संघातून शुभमन गिलला वगळण्यात आलं आहे.  विशेष म्हणजे, नुकत्याच पार पडलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत उपकर्णधाराची जबाबदारी सांभाळणाऱ्या गिलसाठी हा एक धक्कादायक निर्णय असू शकतो. यातच बीसीसीसायने अजून एक धक्का शुभमन गिलला दिला आहे.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

‘इथूनही’ गिलला डच्चू

केवळ वर्ल्ड कपच नाही अजून एका ठिकाणहून गिलला डच्चू मिळाला आहे. न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या आगामी टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला असून, या संघातूनही शुभमन गिलला वगळण्यात आलं आहे. नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत उपकर्णधाराची जबाबदारी सांभाळणाऱ्या शुभमन गिलसाठी हा धक्का आहे. यासोबतच तो टी-२० विश्वचषक संघाचाही भाग राहिलेला नाही.

हे ही वाचा: Shubman Gill: टी-20 विश्वचषक संघातून शुभमन गिलला का वगळण्यात आले? निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकरांनी केलं स्पष्ट

मुंबईतील बीसीसीआय मुख्यालयात झालेल्या निवड समितीच्या बैठकीनंतर हा संघ जाहीर करण्यात आला. या बैठकीला मुख्य निवडकर्ता अजित आगरकर, बीसीसीआय सचिव देवजीत सैकिया, माजी क्रिकेटपटू प्रज्ञान ओझा आणि आर.पी. सिंग यांच्यासह भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव उपस्थित होता.

शुभमन गिलच्या अनुपस्थितीत कोणावर जबाबदारी?

शुभमन गिलच्या अनुपस्थितीत अक्षर पटेलला उपकर्णधार म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. संघनिवडीबाबत बोलताना अजित आगरकर यांनी स्पष्ट केलं की, “हा निर्णय संघाच्या संयोजनावर आधारित आहे. जेव्हा 15 खेळाडू निवडायचे असतात, तेव्हा कुणाला तरी बाहेर राहावंच लागतं. दुर्दैवाने यावेळी शुभमन गिलला डावलावं लागलं.”

दरम्यान, इशान किशन आणि रिंकू सिंग यांचा संघात समावेश झाल्यामुळे जितेश शर्मा यालाही संघाबाहेर ठेवण्यात आलं आहे.

हे ही वाचा: India Squad: टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा! कोणत्या खेळाडूंना मिळाली जागा? बघा संपूर्ण संघ

कर्णधार सूर्यकुमार यादव काय म्हणाला?

कर्णधार सूर्यकुमार यादवने  गिलवर भाष्य करताना सांगितलं की, हा निर्णय त्याच्या कामगिरीपेक्षा संघाची मधली फळी अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने घेण्यात आला आहे. “वॉशिंग्टन सुंदर किंवा रिंकू सिंगसारख्या खेळाडूंमुळे मधल्या क्रमांकाला स्थैर्य मिळतं,” असं सूर्यानं नमूद केलं.

इशान किशनच्या निवडीबाबत आगरकर म्हणाले, “इशान पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये सलामीला फलंदाजी करतो आणि तो चांगल्या फॉर्ममध्ये आहे. वरच्या फळीत यष्टिरक्षक असल्याने आम्हाला अधिक पर्याय मिळतात.”

संघाबद्दल समाधान व्यक्त करताना सूर्यकुमार यादव म्हणाला, “हा संघ खूप संतुलित वाटतो. सर्व जागा योग्य प्रकारे भरल्या आहेत आणि आमच्याकडे वेगवेगळ्या संयोजनांचे पर्याय उपलब्ध आहेत.”

हे ही वाचा: IND vs SA: ‘तो कुठेतरी हरवला होता…’ मालिका जिंकल्यानंतर सूर्याचं मोठं विधान, आपल्या फॉर्मवर केलं भाष्य

भारताच्या सामन्यांचे वेळापत्रक

  • भारत विरुद्ध अमेरिका – 7 फेब्रुवारी, मुंबई
  • भारत विरुद्ध नामिबिया – 12 फेब्रुवारी, दिल्ली
  • भारत विरुद्ध पाकिस्तान – 15 फेब्रुवारी, कोलंबो
  • भारत विरुद्ध नेदरलँड्स – 18 फेब्रुवारी, अहमदाबाद

न्यूझीलंडविरुद्ध भारताचा टी-२० संघ:

सूर्यकुमार यादव (कर्णधार), अक्षर पटेल (उपकर्णधार), तिलक वर्मा, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, हर्षित राणा, संजू सॅमसन (यष्टिरक्षक), अभिषेक शर्मा, इशान किशन (यष्टिरक्षक), अर्शदीप सिंग, रिंकू सिंग, कुलदीप यादव.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

मेंटल हेल्थ- पती खूप पझेसिव्ह:प्रत्येक सेकंदाला विचारतो– ‘कुठे आहेस’; खूप श्वास गुदमरतो, वाटते हे...

0
प्रश्न– माझा पार्टनर (पती) माझ्यावर खूप प्रेम करतो, पण तो खूप पझेसिव्ह (अधिकार गाजवणारा) देखील आहे. प्रत्येक वेळी त्याला हे जाणून घ्यायचे असते...

जनाब उद्धव ठाकरे रामरक्षा नव्हे, पक्षरक्षा करत आहेत:रामरक्षा आंदोलनावरून नवनीत राणांची टीका, 18 जुलैला...

0
अयोध्येतील राम मंदिराच्या देणगी पेटीत झालेल्या कथित चोरीच्या प्रकरणावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आता नागपुरात १८ जुलै रोजी 'रामरक्षा...

विकी कौशलने कतरिना कैफसोबतचा वाढदिवसाचा फोटो शेअर केला आहे

0
4 तासांपूर्वीलिंक कॉपी कराअभिनेत्री कतरिना कैफने गुरुवारी आई झाल्यानंतर आपला पहिला वाढदिवस साजरा केला. या निमित्ताने तिचे पती आणि अभिनेता विकी कौशलने सोशल...

पंतप्रधानांच्या चंदीगड दौऱ्याचे मोमेंट्स:मोदींच्या स्टेजवर काँग्रेस खासदार; उद्घाटन शिलालेखावर मुख्यमंत्री मान यांचे नाव; मुलाच्या...

0
हरियाणातील जिंद येथे देशातील पहिल्या हायड्रोजन ट्रेनला हिरवा झेंडा दाखवून पंतप्रधान नरेंद्र मोदी चंदीगड आणि पंजाब दौऱ्यावर पोहोचले. चंदीगडमध्ये पंतप्रधानांनी 4700 कोटी रुपयांच्या...
spot_img

मेंटल हेल्थ- पती खूप पझेसिव्ह:प्रत्येक सेकंदाला विचारतो– ‘कुठे आहेस’; खूप श्वास गुदमरतो, वाटते हे...

0
प्रश्न– माझा पार्टनर (पती) माझ्यावर खूप प्रेम करतो, पण तो खूप पझेसिव्ह (अधिकार गाजवणारा) देखील आहे. प्रत्येक वेळी त्याला हे जाणून घ्यायचे असते...

विकी कौशलने कतरिना कैफसोबतचा वाढदिवसाचा फोटो शेअर केला आहे

0
4 तासांपूर्वीलिंक कॉपी कराअभिनेत्री कतरिना कैफने गुरुवारी आई झाल्यानंतर आपला पहिला वाढदिवस साजरा केला. या निमित्ताने तिचे पती आणि अभिनेता विकी कौशलने सोशल...

चायना मूनशॉट AI किमी K3 लाँच

0
4 तासांपूर्वीलिंक कॉपी कराचीनी कंपनी मूनशॉट एआयने (AI ने) आपले नवीन एआय मॉडेल किमी K3 सादर केले आहे. कंपनीचा दावा आहे की हे...

देशात लवकरच प्लास्टिक नोटा चलनात येतील, आरबीआयIने निविदा जारी केली:₹10 आणि ₹20 च्या नोटांपासून...

0
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया लवकरच देशात प्लास्टिक म्हणजेच पॉलिमरपासून बनवलेल्या नोटांचा पहिला पायलट प्रोजेक्ट सुरू करणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, देशात नवीन पिढीचे चलन...
error: Content is protected !!