HomeमनोरंजनMBLIDININIINIDE dangerose SIDEDEEDEEDEEDEEDE , Lohan Moin

MBLIDININIINIDE dangerose SIDEDEEDEEDEEDEEDE , Lohan Moin


महेश बागल झी २४ तास मुंबई : पालकांनो तुम्ही तुमच्या मुलांच्या हाती जेवताना मोबाईल देत असाल तर सावधान. जेवताना मुलांच्या हाती मोबाईल दिल्यानं त्यांच्यात लठ्ठपणाची लक्षणं आढळत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. एवढंच नाहीतर सतत रिल्स पाहणा-या मुलांना मानसिक आजार जडल्याच्याही घटना समोर आल्यात. त्यामुळं मुलांच्या हाती मोबाईल देऊन त्यांना वेगवेगळ्या आजारांच्या सापळ्यात अडकवू नका.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

जेवताना मुलांच्या हातात मोबाईल देणारे पालक तुम्ही नेहमी पाहत असाल. जेवताना तुम्ही मुलांच्या हाती मोबाईल देत असाल तर पालकांनो तुम्ही मुलांचं भवितव्य धोक्यात टाकताय… कारण लहान मुलांच्या हाती जेवताना मोबाईल दिल्यास त्याचे अनेक गंभीर परिणाम मुलांच्या शरिरावर होत असल्याचे धक्कादायक निष्कर्ष समोर आलेत. पहिली आणि मोठी गंभीर समस्या म्हणजे मोबाईल पाहत जेवणारी मुलं लठ्ठ होत असल्याचं एका संशोधनात समोर आलं आहे .

मोबाईलमुळे काय होते?

मुलांना जेवणाचा आनंद घेता येत नाही
डोळे, नाक, जीभ या इंद्रियांना जेवणाचा स्वाद मिळत नाही
जबरदस्तीनं काहीतरी खाल्ल्यासारखं होतं
जेवणाची परिपूर्ण अनुभूती मुलांना मिळत नाही

मोबाईल पाहत असताना जेवताना मुलांना आपण काय खातो याची कल्पना नसते. शिवाय जेवढी भूक आहे त्या पेक्षा जास्त अन्न पोटात जातं. काही मुलं तर मोबाईल पाहायला मिळतो म्हणून प्रमाणापेक्षा जास्त जेवतात. साहजिकच त्याचे गंभीर परिणाम मुलांमध्ये पाहायला मिळतात.

मुलांना साखर देण्याचं प्रमाणही वाढलंय. गोड पदार्थ देणं मुलांना टाळाच. शिवाय चॉकलेटही देणं टाळलेलं बरं असं डॉक्टर सांगतात. मुलांच्या आहारात साखर असावी पण ती फळांच्या रुपात असावी, खजुराच्या रुपात असावी असंही तज्ज्ञ सांगतात.. मुलांच्या आहारात साखरेचं प्रमाण वाढल्यास त्याचे साईड इफेक्ट भयंकर असल्याचं तज्ज्ञ सांगतात.

लहान मुलं मोबाईलवर काय पाहतात याकडंही लक्ष द्या. लहान मुलांना रिल्सच्या नादाला लावून पालक त्यांना भयानक मानसिक स्थितीत लोटत असल्याचं वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात… लहान मुलं रिल्सच्या माध्यमातून मुलांना अभासी जगात लोटतात. त्याचा परिणाम मुलांच्या मानसिक आरोग्यावर होतो. वेळप्रसंगी मुलं मानसिक रोगाच्या विळख्यातही सापडण्याची शक्यता असते.

पालकांनीच आता मुलांच्या मोबाईलमुक्तीसाठी पुढाकार घेतला पाहिजे. एक चळवळ उभी केली पाहिजे. एका पालकानं दुस-या पालकाचं प्रबोधन केलं पाहिजे.

कटाक्षाने टाळाल

लहान मुलांच्या हाती मोबाईल देऊ नका
मुलांना रिल्स पाहू देऊ नका
रिल्स अभासी असतात हे त्यांना पटवून सांगा
जेवणातल्या पदार्थांच्या रस,गंधाची जाणीव करुन द्या

मुलाच्या हाती मोबाईल दिला म्हणजे हुश्श सुटलो बुवा… असं अनेक पालकांना वाटतं…मुलांची किरकिर नको म्हणून पालक मोबाईल देतात. तुम्हाला एका क्षणाचा निवांतपणा मिळत असला तरी तुम्ही मुलांच्या हाती मोबाईल देऊन तुमच्या भावी पिढीशी खेळताय. त्य़ामुळं राहा खबरदार.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

सावरकर मानहानी प्रकरण; पणतू म्हणाले- नेहरू ब्रिटिश समर्थक होते:सावरकरांनी इंग्रजांशी समझोता केला असता तर...

0
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे पणतू सात्यकी यांनी मंगळवारी पुणे येथील विशेष न्यायालयात राहुल गांधी यांच्या विरोधात सुरू असलेल्या मानहानीच्या खटल्यात जबाब दिला....

पैठणमध्ये स्वाभिमानीचे शोले स्टाईल आंदोलन:साखर कारखान्याच्या 19 कोटी 50 लाखांच्या एफआरपीसाठी टाकीवर चढून आंदोलन

0
संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याने 2025-26 च्या हंगामातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची तब्बल 19 कोटी 50 लाख रुपयांची एफआरपी (FRP) थकविल्याच्या निषेधार्थ आज पैठणमध्ये...

17 ऑगस्टपर्यंत सूर्य कर्क राशीत:वृषभ राशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढेल, प्रवासात लाभ होईल, कन्या राशीसाठी...

0
सूर्य मिथुन राशीतून बाहेर पडून कर्क राशीत आला आहे. सूर्याच्या राशी बदलाला संक्रांती म्हणतात. काही हिंदी पंचांगानुसार कर्क संक्रांतीची तारीख 16 जुलै तर...

तिसरा वनडे- न्यूझीलंडने वेस्ट इंडिजला 6 गडी राखून हरवले:मालिकेत 2-1 ची आघाडी; लेनोक्सने 4...

0
न्यूझीलंडने गयाना येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा 6 गडी राखून पराभव केला. या विजयासह किवी संघाने 5 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत...
spot_img

तिसरा वनडे- न्यूझीलंडने वेस्ट इंडिजला 6 गडी राखून हरवले:मालिकेत 2-1 ची आघाडी; लेनोक्सने 4...

0
न्यूझीलंडने गयाना येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा 6 गडी राखून पराभव केला. या विजयासह किवी संघाने 5 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत...

फिफा विश्वचषक चाहत्यांच्या परंपरा

0
मराठी बातम्याखेळफिफा विश्वचषक चाहत्यांच्या परंपरा | नॉर्वे वायकिंग चांट आणि जपान स्वच्छताबोस्टन8 तासांपूर्वीलिंक कॉपी कराकाही दिवसांपूर्वी बोस्टनच्या एका गजबजलेल्या रेल्वे स्थानकावर असे दृश्य...

पावसाळ्यामध्ये वाढतात फूड पॉयझनिंगचे रुग्ण:ही 7 लक्षणे दुर्लक्षित करू नका, डॉक्टरांकडून जाणून घ्या बचावासाठीच्या...

0
पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रता वाढते. यामुळे खाण्यापिण्याच्या वस्तूंमध्ये बॅक्टेरिया आणि व्हायरस लवकर वाढतात. हेच कारण आहे की, या हंगामात फूड पॉयझनिंगचे प्रमाण जास्त असते....

‘प्रहार, द उज्ज्वल निकम स्टोरी’ लवकरच प्रदर्शित होणार:निकम म्हणाले- राजकुमारने माझी नक्कल केली नाही,...

0
राजकुमार राव अभिनीत 'प्रहार: द उज्ज्वल निकम स्टोरी' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होईल. या चित्रपटाच्या तयारीबद्दल आणि राजकुमारच्या मेथड ॲक्टिंगबद्दल स्वतः ज्येष्ठ वकील...
error: Content is protected !!