दक्षिणात्य सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रीं पैकी एक आहे. अलीकडे तिचा एक आपत्तीजनक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. अनेकांनी त्यावर विचित्र कमेंट्स केल्या असून श्रीलिलाने यावर नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यानच तिने एक लांबलचक पोस्ट शेअर केली असून या पोस्टी सगळीकडेच चर्चा आहे.
बरेच सिनेकलाकार ट्रोलिंग, बनावट फोटो किंवा त्यांच्या गोपनीयतेच्याबाबतीत खूप चिंतेत असतात. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री श्रीलीलाचा एक एआयने तयार केलेला बनावट फोटो व्हायरल झाला होता. काहींनी हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले तर काहींनी यावर कमेंट्स केल्या. या घटनेवर आता अभिनेत्रीने प्रतिक्रिया दिली आहे. अभिनेत्री रश्मिका मंदानानंतर आता पुष्पा टू फेम अभिनेत्रीला एआय वापरून तयार केलेले बनावट फोटोचा सामना करावा लागला. यावेळी दक्षिणेकडील अभिनेत्री श्रीलीलाचे बाथरुममधील अश्लील फोटोंना तयार केले होते. अभिनेत्रीने कित्येक वेळा स्पष्ट केले की हे फोटो तिचे नाहीत पण तरी या फोटोंची शेअरीग सुरुच होती.
अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून हे उघड केले आहे. श्रीलीलाने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘मी हे तुमच्या सर्वांसमोर हात जोडून सांगत आहे आणि प्रत्येक सोशल मीडिया युझरला सांगू इच्छिते की एआयने तयार केलेल्या कोणत्याही प्रकारच्या बनावट फोटोंचे समर्थन करू नका.”
तंत्रज्ञानाचा गैरवापर करू नका
पुढे अभिनेत्री म्हणाली “वापर आणि गैरवापर यात खूप फरक आहे. जर तंत्रज्ञान प्रगती करत असेल तर ते जीवन सोपे करण्यासाठी आहे, ते उद्ध्वस्त करण्यासाठी नाही, असे माझे मत आहे. मी कोणाची तरी मुलगी आहे, बहिण आहे. मीच काय, जगातील प्रत्येक मुलगी ही कोणाची तरी मुलगी, नात, बहीण, मैत्रीण किंवा जोडीदार असते. जरी मी अभिनय क्षेत्र हा व्यवसाय म्हणून निवडला तरीही मी काही सामाजिक बाब नाही.”
“एआयने बनलेल्या कोणत्याही फोटोवर किंवा कंटेटवर प्रतिक्रिया देऊ नका. या कंटेटकडे दुर्लक्ष करा. ते व्हायरल करू नका. महिलांचा मान सन्मान राखा. त्यांच्या मान सन्मानाला ठेच पोहोचू देऊ नका. अशा कंटेटमुळे केवळ त्रासच होत नाही, तर मानसिक आरोग्यावर त्याचा खोल परिणाम होतो.”
“माझं शेड्यूल अत्यंत बिझी असल्यामुळे मी या गोष्टींवर लक्ष देऊ शकत नाही. सोशल मीडियावर तुम्ही आमच्याविषयी काहीही करता. ज्यांनी या प्रकरणावर सविस्तर माहिती दिली काय खरे आहे आणि काय बनावट आहे हे सांगितले त्या शुभचिंतकांचे आभार. पण या सर्व गोष्टी खूप वेदनादायी आहे. अशा प्रकारचे फोटो व्हायरल केल्याने मानसिक त्रास होतोय. माझ्या इतर सहकाऱ्यांनाही मी या त्रासातून जाताना पाहत आहे. महिलांचा सन्मान करा. एखाद्या महिलेच्या चारित्र्याचे धिंडवडे काढू नका” असं सांगतानाच तिने या प्रकरणी थेट कोर्टात जाणार असल्याचंही म्हटलंय.






























