HomeमनोरंजनKnow how Eating Wheat can cause of diabetes and weight gain |...

Know how Eating Wheat can cause of diabetes and weight gain | तुम्ही सुद्धा मधुमेह, वजन वाढेल म्हणून भात खाणे टाळून गव्हाची चपाती खाताय? खूप मोठी चूक करताय…


गहू खाल्ल्याने मधुमेह आणि वजन वाढू शकते: भारतात प्रत्येक घरातील जेवणाचे ताट गव्हाच्या चपातीशिवाय पूर्ण होत नाही. आपल्या सर्वांच्या आहारात रोजच गव्हापासून बनलेल्या पदार्थांचा समावेशा असतो. गव्हाचे सेवन आरोग्यासाठी अधिक फायदेशीर मानले जाते. बऱ्याचवेळा मधुमेहाच्या समस्या उद्भवल्यास किंवा वजन कमी करायचे असल्यासही चपाती खाण्याचा सल्ला दिला जातो. जर तुम्ही सुद्धा तुमच्या रोजच्या आहारात चपातीच्या सेवनाचे प्रमाण वाढवले असेल तर, हे ऐकून नक्कीच थक्क व्हाल.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

तज्ज्ञ सांगतात की, चपातीचे सेवन वाढवल्यास मधुमेह नियंत्रित राहत नाही तर वाढतो, वजन कमी होत नाही तर वाढते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, आरोग्यास फायदेशीर असलेले धान्य मधुमेह आणि वजन वाढण्यास कसे कारणीभूत ठरू शकते. चला तर मग या लेखातून यामागचे खरे कारण जाणून घेऊया.

गव्हाच्या सेवन मधुमेह आणि वजन वाढीस कसे कारणीभूत ठरते?

तज्ज्ञांच्या मते पूर्वीच्या काळात मिळणाऱ्या गव्हामध्ये आणि आत्ताच्या काळात मिळणाऱ्या गव्हाच्या गुणवत्तेमध्ये मोठा फरक आहे. पूर्वीच्या काळाच मिळणारे गहू फायबर, मिनरल्स आणि प्रोटीनने भरपूर असायचे. यामुळे पोटाचे आरोग्य सुरळीत राहायचे  तसेच शरीरालाही योग्य पोषण मिळायचे. कारण या गव्हांवर कोणत्याही प्रकारची कृत्रिम प्रक्रिया केली जात नव्हत, पूर्णपणे शुद्ध गव्हाचे सेवन केले जायचे.

पण आत्ताच्या काळात मिळणारे गहू हायब्रिड आणि रिफाइंड गहू असतात. ज्यामध्ये प्रक्रिये दरम्यान गव्हांमधील फायबर, झिंक, मॅग्नेशियम आणि आवश्यक व्हिटॅमिन असे सर्व नैसर्गिक पोषक घटक निघून जातात. यामुळे गव्हांमध्ये ग्लुटेनचे प्रमाण वाढते. म्हणूनच आत्ताच्या काळात मिळणारे गहू रक्तातील साखर वाढवण्यास, वजन वाढवण्यास, थकवा आणि मधुमेहास कारणीभूत ठरतात.

आहारात गव्हाचा समावेश कसा टाळता येईल?

प्रक्रिया केलेले आणि ग्लूटेनयुक्त गहू खाल्ल्याने शारीरिक आरोग्यावर मोठा परिणाम होण्याची शक्यता असते. चपातीचे सेवन वाढल्याने शरीरात ग्लूटेनचे प्रमाणही वाढते. ज्यामुळे पोट फुगणे किंवा ब्लोटिंग होणे, अॅसिडिटी, गॅस, पोटात जडपणा किंवा अपचनाच्या समस्या उद्भवण्याची शक्यता वाढते. म्हणूनच तुम्हाला निरोगी आणि फिट रहायचे असेल तर, आत्ताच गव्हाचे सेवन कमी किंवा पूर्णपणे बंद करा.

चपातीवर पर्याय म्हणून तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात बाजरी, नाचणी किंवा तांदूळ अशा पौष्टिक धान्यांपासून बनलेल्या भाकरीचा समावेश करू शकता. यामुळे पचनसंस्थाही सुरळीत राहते तसेच रक्तातील साखरेची पातळही नियंत्रणात राहते. शिवाय तुम्ही वजन कमी करण्यासाठी डाएटिंग करत असाल तर बाजरीची किंवा नाचणीची भाकरी एक सर्वोत्तम पर्याय आहे. तसेच जर तुम्हाला चपाती जेवणात रोज चपाती खाण्याची सवय असेल तर चपाती बनवण्यासाठी ग्लूटेन असलेले गहू वापरणे टाळा, ग्लूटेन फ्री गव्हाचा वापर करा.

भाकरी शिवाय बाजरी किंवा नाचणीचा तुमच्या आहारात असा समावेश करू शकता?

बाजरी:

1. बाजरीचा उपमा : भाज्या आणि नट्स घालून बाजरीच्या पीठाचा उपमा बनवू शकता.

2. बाजरीची खिचडी: भरपूर भाज्या आणि तुमच्या आवडत्या मसाल्यांसह बाजरीची खिचडी एक पौष्टिक पर्याय ठरेल.

3. बाजरीचे लाडू: बाजरीचे पीठात गूळ आणि तूप मिसळून लाडू बनवल्यास, विशेषतः हिवाळ्यात आरोग्यास अधिक फायदेशीर ठरतात.

नाचणी:

1. नाचणीचा डोसा किंवा चिला: नाचणीतच्या पीठाचा वापर करून डोसा किंवा चिला बनवता येतो.

2. नाचणीचा दलिया किंवा लापशी: नाचणीपासून बनलेला दलिया किंवा लापशी पोटाच्या आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरते.

3. बेक्ड स्नॅक्स: नाचणीच्या पीठ वापरून मफिन्स किंवा कुकीज बनवू शकता. जे मोठ्यासह लहान मुलांना देखील आवडतील.

(Disclaimer: वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

अमृतसरमध्ये बॉयफ्रेंडला जिवंत जाळले:ब्रेकअपनंतर भेटायला आला होता, गर्लफ्रेंड आणि तिचा चुलत भाऊही भाजले, दोघांना...

0
अमृतसरमध्ये गर्लफ्रेंडने चुलत भावासोबत मिळून बॉयफ्रेंडला जिवंत जाळले. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. आग लागल्यावर संतापलेल्या बॉयफ्रेंडने दोघांनाही आपल्याकडे ओढले. त्यामुळे गर्लफ्रेंड आणि तिचा...

पुणे शहरात विविध अपघातांत 3 जणांचा मृत्यू:कात्रज बाह्यवळण मार्ग, मांजरी, लोणीकंद परिसरात घटना

0
पुणे शहरात झालेल्या वेगवेगळ्या अपघातांमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे. कात्रज बाह्यवळण मार्ग, मांजरी आणि पुणे-अहमदनगर रस्त्यावरील लोणीकंद परिसरात या अपघाताच्या घटना घडल्या...

स्वामी अवधेशानंदजी गिरी यांचे जीवनसूत्र:आपले विचार सकारात्मक, वाणी मधुर आणि संयमित असावी, सर्व लोकांशी...

0
मराठी बातम्याजीवन मंत्रधर्मअवधेशानंद गिरी महाराज जीवन धडा. ज्ञान सत्य प्रकट करते; आपले विचार सकारात्मक असले पाहिजेत, आपले बोलणे दयाळू आणि आदरयुक्त असले पाहिजे...

इंग्लंडविरुद्ध भारत सलग चौथी वनडे मालिका जिंकण्यासाठी मैदानात उतरेल:दुसरा सामना आज; कार्डिफमध्ये 15 वर्षांपासून...

0
भारताला इंग्लंडविरुद्ध सलग चौथी वनडे मालिका जिंकण्याची संधी आहे. टीम इंडियाने 2021 मध्ये घरच्या मैदानावर 2-1 ने, 2022 मध्ये इंग्लंडमध्ये 2-1 ने आणि...
spot_img

इंग्लंडविरुद्ध भारत सलग चौथी वनडे मालिका जिंकण्यासाठी मैदानात उतरेल:दुसरा सामना आज; कार्डिफमध्ये 15 वर्षांपासून...

0
भारताला इंग्लंडविरुद्ध सलग चौथी वनडे मालिका जिंकण्याची संधी आहे. टीम इंडियाने 2021 मध्ये घरच्या मैदानावर 2-1 ने, 2022 मध्ये इंग्लंडमध्ये 2-1 ने आणि...

वनडे व टी-20 विश्वचषक नव्या फॉरमॅटमध्ये होईल:वनडेत सुपर-7 द्वारे सेमीफायनलिस्ट, टी-20 मध्ये सुपर-10 ने...

0
ICC ने पुरुष एकदिवसीय आणि टी-20 विश्वचषकाच्या फॉरमॅटमध्ये बदलांना मंजुरी दिली आहे. एकदिवसीय विश्वचषकात 14 संघांसह नवीन थ्री-स्टेज फॉरमॅट लागू होईल, ज्यात पहिल्यांदाच...

जगन्नाथ रथयात्रा पुरी 2026

0
1 दिवसापूर्वीलिंक कॉपी कराभगवान जगन्नाथांची रथयात्रा १६ जुलै रोजी सुरू होईल आणि २४ जुलैपर्यंत चालेल. हा सर्वात मोठ्या धार्मिक उत्सवांपैकी एक आहे. दरवर्षी...

आमिर खानची लव्ह जिहादची प्रतिक्रिया; गौरी स्प्रेट विवाह पंक्ती

0
37 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करातिसरं लग्न केल्यानंतर अभिनेता आमिर खानला सोशल मीडियावर लव्ह जिहादचा ब्रँड ॲम्बेसेडर म्हटलं जात आहे. आमिरने या आरोपांवर स्पष्टीकरण दिलं...
error: Content is protected !!