HomeमनोरंजनAvoid wearing this color in winter Fashion and health Tips | हिवाळ्यात...

Avoid wearing this color in winter Fashion and health Tips | हिवाळ्यात ‘या’ रंगाचे कपडे घालणे टाळा, नाहीतर…


हिवाळ्यासाठी कोणते रंग चांगले आहेत हे जाणून घ्या: हिवाळ्यात थंड हवेपासून संरक्षण करण्यासाठी, लोक विविध प्रकारचे उबदार कपडे वापरतात. ज्यामध्ये लोकरीचे स्वेटर, हूडी शॉल तसेच इतर हिवाळी स्टायलिश कपड्यांचा समावेश असतो. पण सर्वच प्रकारचे हिवाळी कपडे थंडीपासून पूर्णपणे संरक्षण देतात असे नाही. हे जाणून तुम्ही थक्क व्हाल, पण हिवाळ्यात काही रंगाचे कपडे शरीराला उब देतात तर काही रंगाचे कपडे तुम्हाला थंडीपासून वाचण्यास असमर्थ ठरतात. आणि थंड वातावरणापासून शरीराचे शंरक्षण न झाल्यास सर्दी-खोकल्यासारखे आजार उद्भवण्याची शक्यता अधिक वाढते. यापासून वाचण्यासाठी हिवाळ्यात नेमके कोणत्या रंगाचे कपडे घालणे टाळावे आणि कोणत्या रंगाते कपडे घालणे फायदेशीर ठरेल हे तुम्हाला माहीत असणे अत्यावश्यक आहे.

हिवाळ्यात कोणत्या रंगाचे कपडे घालणे टाळले पाहिजेत?

बऱ्याचदा उन्हाळ्यात गडद रंगाचे कपडे घालणे टाळले जाते. कारण गडद रंगाचे कपडे अधिक उष्णचा शोषून घेतात. पण तुम्हाला माहित आहे का उन्हाळ्याप्रमाणे हिवाळ्यातही काही विशिष्ट रंगाचे कपडे घालणे टाळले पाहिजे. तज्ज्ञ सांगतात की, हिवाळ्यात फिकट रंगाचे कपडे घालणे टाळले पाहिजे. कारण उन्हाळ्यात उष्णतेपासून वाचण्यासाठी फिकट रंगाचे कपडे वापरले जातात, जेणेकरून जास्त प्रमाणात उष्णता शोषली जाणार नाही. पण हिवाळ्यात आपल्या शरीराला अधिक उष्णतेची आवश्यकता असते. ज्यामुळे शरीराला उब मिळेल आणि ऊर्जा टिकून राहील. फिकट रंगाचे कपडे उष्णता शोषून घेत नाहीत त्यामुळे पांढरे, पिवळे, किंवा कोणत्याही रंगाचे फिकट शेड्स असलेले कपडे घालणे टाळा.

हिवाळ्यात कोणत्या रंगाचे कपडे घालावेत?

गडद रंगाचे कपडे उष्णता शोषून घेतात, यामुळे हिवाळ्यात गडद आणि उबदार रंगाचे कपडे घालावेत. जसे की गडद निळे, मरून, गडद हिरवे, चारकोल ग्रे आणि तपकिरी रंग. हे रंग सूर्याची किरणे शोषून घेतात आणि शरीराला उबदार ठेवतात. डीप रेड, मस्टर्ड येलो, बेज, मरून आणि ऑलिव्ह ग्रीन यांसारखे रंग हिवाळ्यातील वातावरणाला पूरक ठरतात.

हिवाळ्यात गडद रंगाचे कपडे कसे स्टाईल कराल?

गडद रंगाचे कपडे अनेकजणांना नापसंत असतात. कारण काहीवेळा गडद रंगामुळे आपला लुक सर्वांमध्ये वेगळा आणि भडक दिसतो. तसेच सध्या फिकट रंगाचे कपडे वापरण्याचा ट्रेंड आहे. पण तुम्ही योग्य फॅशन टिप्स फॉलो केल्या तर गडद रंगाचे कपडेही तुमच्या पर्सनॅलिटीला एक जबरदस्त लुक देऊ शकतात.

फॅशन टिप्स:

1. काळ्या किंवा राखाडी रंगाच्या हिवाळी कपड्यांसोबत तेजस्वी रंगाचे स्कार्फ किंवा टोपी स्टाईल करू शकता.

2. लोकरी, मखमली किंवा कॉरडरॉय सारख्या टेक्श्चरचे कपडे निवडा, जे स्टाईलसह उबदारपणाही देतात.

3. दिवसा बाहेर जायचे असल्यास गडद रंगांच्या कपड्यांचा वापर करा आणि संध्याकाळी चमकदार रंग वापरू शकता.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...

0
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...
spot_img

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
error: Content is protected !!