Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्र हिवाळी अधिवेशन 2025 cm देवेंद्र फडणवीस समारोपीय भाषण मुंबईबद्दल बोलतात

महाराष्ट्र हिवाळी अधिवेशन 2025 cm देवेंद्र फडणवीस समारोपीय भाषण मुंबईबद्दल बोलतात


महाराष्ट्र हिवाळी अधिवेशनाचे समारोपीय भाषण देवेंद्र फडणवीस: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याचा उल्लेख केला. या वर्षभरामध्ये सरकारसमोर अनेक आव्हानं आली. मात्र ती आव्हान आम्ही पूर्ण केली असं फडणवीस म्हणाले. तसेच सरकारमधील तिन्ही प्रमुख पक्षांचे नेते एकत्रितपणे निर्णय घेतात हे ही सांगायला फडणवीस विसरले नाहीत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होतील असं फडणवीसांनी स्पष्ट केलं.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

या सगळ्या गोष्टी विसरून जायच्या…

“अनेक वर्ष निवडणुका न झाल्याने कार्यकर्त्यांच्या मनात दुःख होते, पण आता निवडणुका सुरु झाल्यात. आम्ही कोर्टाच्या आदेशाच्या अंमलबजावणीचा प्रयत्न सातत्याने करतो. नगरपालिका निवडणुका झाल्या आता महापालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुका होतील. अनेक वर्षे निवडणूक न झाल्याने स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये दु:ख होते. आता लोकशाही खालच्या स्तरापर्यंत पोहोचण्यास महाराष्ट्र गतीने काम करेल. मध्यंतरी महाराष्ट्राला भोगावे लागले. या सगळ्या गोष्टी विसरून जायच्या कारण महाराष्ट्र आता थांबणार नाही. सकारात्मकतेने पुढे जायचा आमचा विचार आहे. विकासाचा अजेंडाच आम्ही निवडणुकीत मांडणार,” असं फडणवीस म्हणाले. यावरुन विरोधकांनी घोषणाबाजी सुरु केल्यानंतर फडणवीसांनी, “कुठेही टीका केली नाही. सगळ्या गोष्टींमध्ये राजकारण नको,” असा सल्ला दिला.

दोन्ही बाजूच्या नेत्यांना आवाहन

“अमृतमहोत्सवी महाराष्ट्र घडविण्यासाठी वाटचाल करायची आहे. सभागृहातील दोन्ही बाजूच्या नेत्यांना आवाहन आहे. रचनात्मक कार्यातून महाराष्ट्राला पुढे नेऊ शकतो. आपण सारे लोक हिताचा विचार करणारे आहोत. महाराष्ट्राला पुढे नेण्याचा विचार करूया,” असं आवाहन फडणवीसांनी केलं.

…तोपर्यंत मुंबई महाराष्ट्रातच राहील!

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचा डाव असल्याची टीका वारंवार समोर येत असतानाच यावरही फडणवीसांनी आपल्या भाषणादरम्यान भाष्य केलं. जोपर्यंत सूर्य, चंद्र आहे तोपर्यंत मुंबई महाराष्ट्रातच राहणार, असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर विकास कामांना गती आल्याचं पाहायला मिळेल असंही फडणवीस यांनी आपल्या भाषणामध्ये स्पष्ट केलं.

“106 हुतात्म्यांनी तयार केलेला महाराष्ट्र आहे. मुंबई तोडली जाईल असा विचार करू नये. निवडणूक आली की अशा टीका होतात. सभागृहात सांगतोय, मुंबई कालही महाराष्ट्राची होती आणि जोपर्यंत चंद्र-सूर्य आहे तोपर्यंत राहील,” असं फडणवीस म्हणाले. तसेच पुढे बोलताना, “आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी जो मार्ग दाखवला त्या तत्वाने महाराष्ट्र चालत राहील. महाराष्ट्राला हे तत्त्व मान्य होते. पण देशपातळीवर अनेक संभ्रम होते म्हणून सीबीएससी पुस्तकात यापूर्वी मराठा साम्राज्य व छत्रपती एक पॅरापुरता होता तर मुघलांचा 17 पानांचा. आता शिवरायांचा 21 पानांचा अभ्यास सीबीएससीने पुस्तकात घेतला आहे. शौर्याचा इतिहास केंद्राने घेतला त्याबाबत आभार मानतो,” असं फडणवीस म्हणाले.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...

0
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...
spot_img

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
error: Content is protected !!