Homeमनोरंजनt20 विश्वचषक 2026 लाइव्ह स्ट्रीमिंग मीडिया राइट्स करार जिओस्टारसोबत राहील

t20 विश्वचषक 2026 लाइव्ह स्ट्रीमिंग मीडिया राइट्स करार जिओस्टारसोबत राहील


T20 विश्वचषक 2026 : आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2026 सुरु होण्यासाठी आता काही दिवस शिल्लक आहेत. यंदा ही स्पर्धा भारत आणि श्रीलंका या देशांमध्ये खेळवली जाणार असून 7 फेब्रुवारीला या स्पर्धेला सुरुवात होईल. तर अहमदाबाद येथे स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाईल. काही दिवसांपूर्वी अशी बातमी समोर आली होती की मोठ्या रक्कमेची मागणी केल्याने जियोस्टारने टी20 वर्ल्ड कप 2026 ची (T20 World Cup 2026) लाईव्ह स्ट्रीमिंग करण्यास नकार दिला आहे. ज्यामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये एकच खळबळ उडाली. आता आयसीसीने सुद्धा या मुद्द्यावर प्रेस रिलीज जाहीर केली असून यात सांगण्यात आलंय की प्रेक्षक आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2026 चे सामने मोबाईलवर कोणत्या अ‍ॅपवर पाहू शकतात.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउंसिल आणि जिओस्टारने मागील काही दिवसांपासून समोर येत असलेल्या रिपोर्ट्सला पूर्णविराम लावला असून याप्रकरणी त्यांनी संयुक्त स्टेटमेंट जाहीर केले आहेत. आयसीसी आणि जिओस्टारने त्यांच्या मीडिया भागीदारीच्या स्थितीबद्दलच्या अफवा फेटाळून लावल्या आहेत. आयसीसी आणि जिओस्टारने स्पष्ट केले की त्यांचा विद्यमान करार पूर्णपणे प्रभावी राहील आणि जिओस्टारकडेच भारतात आयसीसीच्या प्रसारणाचे अधिकृत मीडिया हक्क असतील.

आयसीसीने काय म्हटले?

आयसीसीने मीडिया रिलीजमध्ये लिहिले की, ‘आयसीसी आणि जिओस्टारने भारतातील आयसीसीच्या मीडिया हक्क करारांच्या स्थितीबाबत अलिकडच्या मीडिया रिपोर्ट्सची नोंद घेतली आहे. हे रिपोर्ट्स कोणत्याही संघटनेची भूमिका प्रतिबिंबित करत नाहीत. आयसीसी आणि जिओस्टारमधील विद्यमान करार पूर्णपणे लागू आणि प्रभावी राहील आणि जिओस्टार भारतात आयसीसीचा अधिकृत मीडिया राईट्स पार्टनर राहील. जिओस्टारने या करारातून माघार घेतली आहे असे म्हणणे चुकीचे आहे’.

वर्ल्ड क्लास कव्हरेजवर लक्ष :

आयसीसीने रिलीजमध्ये पुढे म्हटले की, ‘जिओस्टार त्यांच्या कराराच्या अटी पूर्ण करण्यासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे. दोन्ही संस्था भारतातील चाहत्यांना आगामी आयसीसी स्पर्धांचे अखंड, जागतिक दर्जाचे कव्हरेज प्रदान करण्यावर लक्ष केंद्रित करतात. आयसीसी पुरुष टी20 वर्ल्ड कपसह, हा खेळातील सर्वात प्रलंबीत जागतिक स्पर्धांपैकी एक आहे. या कार्यक्रमांची तयारी नियोजनाप्रमाणेच सुरू आहे आणि प्रेक्षक, जाहिरातदार किंवा उद्योग भागीदारांवर कोणताही परिणाम होत नाही. आयसीसी आणि जिओस्टार, दीर्घकालीन व्यावसायिक भागीदार म्हणून, ऑपरेशनल, कमर्शियल आणि स्ट्रॅटेजिक बाबींवर नियमित चर्चा करतात, खेळाच्या वाढीमध्ये ही भागीदारी काय भूमिका बजावू शकते यावर लक्ष केंद्रित करतात.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न:

आयसीसी टी२० वर्ल्ड कप २०२६ कधी सुरू होणार आहे?
उत्तर: आयसीसी टी२० वर्ल्ड कप २०२६ ही स्पर्धा ७ फेब्रुवारीला सुरू होईल.

आयसीसी टी२० वर्ल्ड कप २०२६ कोणत्या देशांमध्ये खेळवली जाणार आहे?
उत्तर: ही स्पर्धा भारत आणि श्रीलंका या देशांमध्ये खेळवली जाणार आहे.

आयसीसी आणि जियोस्टारने या अफवांबाबत काय म्हटले आहे?
उत्तर: आयसीसी आणि जियोस्टारने संयुक्त स्टेटमेंट जाहीर करून मीडिया रिपोर्ट्सच्या अफवा फेटाळून लावल्या असून, त्यांचा विद्यमान करार पूर्णपणे प्रभावी राहील आणि जियोस्टार भारतात आयसीसीच्या प्रसारणाचे अधिकृत मीडिया हक्क धारक राहील.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...

0
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...
spot_img

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
error: Content is protected !!