Homeमनोरंजनकुस्तीपटू विनेश फोगटने निवृत्तीतून यू टर्न घेतला आणि 2028 ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचे ध्येय...

कुस्तीपटू विनेश फोगटने निवृत्तीतून यू टर्न घेतला आणि 2028 ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचे ध्येय ठेवले


विनेश फोगट: भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगाटने (Vinesh Phogat) अचानक एक मोठा निर्णय सर्वांना हैराण केलंय. विनेशने 2024 ऑलम्पिकमध्ये झालेल्या प्रकारानंतर कुस्तीमधून निवृत्तीची घोषणा केली होती. मात्र आता विनेशने अचानकपणे तिच्या निवृत्तीच्या निर्णयावरून यू-टर्न घेतला आहे. विनेश मागच्यावर्षी पॅरिस ऑलम्पिकमध्ये 50 किलो वजनी फ्रीस्टाइल कुस्तीच्या फायनलमधून डिसक्वालिफाय झाली होती. जवळपास 100 ग्रॅम वजन जास्त असल्याने तिला फायनलमधून डिसक्वालिफाय करण्यात आलं होतं, त्यामुळे विनेश पदकाच्या एवढ्या जवळ पोहोचून सुद्धा रिकाम्या हाताने भारतात परतावं लागलं होतं. त्यानंतर विनेशने आपण कुस्तीतून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली होती.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

अचानक घेतला मोठा निर्णय :

विनेश फोगाटने लिहिले की, ‘लोक विचारत राहिले की पॅरिस हा शेवट आहे का. बराच काळ माझ्याकडे याचं उत्तर नव्हते. मला चटई, दबाव, अपेक्षा, अगदी माझ्या स्वप्नांपासूनही दूर जायचे होते. वर्षानुवर्षे पहिल्यांदाच मी स्वतःला श्वास घेऊ दिला. माझ्या प्रवासातील ओझे हाताळण्यासाठी मी वेळ काढला: चढ-उतार, हृदयविकार, त्याग आणि जगाने कधीही न पाहिलेले माझे पैलू, आणि त्या प्रतिबिंबात कुठेतरी मला सत्य सापडले. मला अजूनही हा खेळ आवडतो. मला अजूनही स्पर्धा करायची आहे’.

आग कधीही विझली नाही :

विनेश फोगाटने लिहिले की, ‘त्या शांततेत, मला काहीतरी असे मिळाले जे मी विसरले होते. आग कधीच विझत नाही. ती फक्त थकवा आणि आवाजाखाली दबलेली होती. शिस्त, संघर्ष, हे सर्व माझ्या दिनचर्येत आहे. मी कितीही दूर गेले तरी, माझ्यातील एक भाग नेहमीच मॅटवर राहतो’. विनेश फोगटने लॉस एंजेलिस ऑलिंपिकसाठी आपला दावा मांडताना लिहिले की, ‘तर मी येथे आहे, निर्भय हृदय आणि झुकण्यास नकार देणाऱ्या आत्म्यासह लॉस एंजेलिस ऑलिंपिक 2028 कडे जात आहे आणि आता मी एकटी चालत नाहीये तर माझा मुलगा माझ्या टीममध्ये सामील झालाय. माझी सर्वात मोठी प्रेरणा लॉस एंजेलिस ऑलिंपिक 2028 च्या रस्त्यात माझा छोटा चिअरलिडर’.

हेही वाचा : टीमच्या पराभवानंतर फॅन्सने स्टेडियमला लावली आग, सगळं एका झटक्यात राख झालं Video

विनेशने 2025 मध्ये दिला बाळाला जन्म :

विनेश फोगाटने जुलै 2025 मध्ये बाळाला जन्म दिला. तिला पुत्ररत्न झाले. विनेश फोगाट ही टॉप इंडियन एथलीट्सच्या लिस्टपैकी एक आहे ज्या बाळ झाल्यावर सुद्धा स्पर्धेत परतल्या. विनेश फोगाटचं लग्न हे कुस्तीपटू रेसलर सोमवीर राठी सोबत झालं होतं. विनेश फोगटने तिच्या शानदार कारकिर्दीत दोन जागतिक अजिंक्यपद कांस्यपदके (2019 आणि 2022), एक आशियाई क्रीडा सुवर्ण (2018) आणि एक कांस्यपदक (2014) आणि तीन राष्ट्रकुल क्रीडा सुवर्णपदके (2014, 2018, 2022) जिंकली आहेत. 2021 च्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेतही ती सुवर्णपदक विजेती होती आणि तिने कॉन्टिनेंटल लेव्हलवर रौप्य आणि कांस्यपदके जिंकली आहेत.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न:

विनेश फोगाटने कुस्तीमधून निवृत्तीची घोषणा कधी केली होती?
उत्तर: विनेश फोगाटने २०२४ पॅरिस ऑलम्पिकमध्ये ५० किलो वजनी फ्रीस्टाइल कुस्तीच्या फायनलमधून डिसक्वालिफाय झाल्यानंतर कुस्तीमधून निवृत्तीची घोषणा केली होती.

विनेश फोगाटला ऑलम्पिक फायनलमधून डिसक्वालिफाय का करण्यात आले?
उत्तर: जवळपास १०० ग्रॅम वजन जास्त असल्याने तिला फायनलमधून डिसक्वालिफाय करण्यात आले, त्यामुळे ती पदकाच्या जवळ पोहोचूनही रिकाम्या हाताने परतली.

विनेश फोगाटने निवृत्तीच्या निर्णयावरून यू-टर्न का घेतला?
उत्तर: तिने लिहिले की, तिला अजूनही खेळ आवडतो आणि स्पर्धा करायची आहे. वर्षानुवर्षे पहिल्यांदाच तिने स्वतःला श्वास घेऊ दिला आणि प्रतिबिंबात सत्य सापडले की आग कधीच विझली नाही.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...

0
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...
spot_img

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
error: Content is protected !!