Homeमहाराष्ट्रपुणे मुंढवा जमीन अनियमितता पार्थ पवार प्रकरणी अंजली दमानिया यांनी सभागृहात प्रकरणाचा...

पुणे मुंढवा जमीन अनियमितता पार्थ पवार प्रकरणी अंजली दमानिया यांनी सभागृहात प्रकरणाचा उल्लेख न केल्याने विरोधकांवर टीका


पुणे मुंढवा जमीन अनियमितता पार्थ पवार प्रकरण: समाजसेविका आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ‘झी 24 तास’ने प्रकाशझोतात आणलेल्या मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणासंदर्भात मोठा आरोप केला आहे. मुंढवा जमीन रद्द करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर दमानिया यांनी आक्षेप घेतला आहे. “सरकारकडून पुणे कोर्टात मुंढवा जमीन रद्द करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून याचिका दाखल केली आहे. हा अजित पवार, पार्थ पवार, शीतल तेजवनी यांना वाचवण्याचा प्रयत्न होत आहे,” असं दामनिया यांनी म्हटलं आहे.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

पार्थ पवारांचं नाव एफआयआरमध्ये हवं

“मात्र आपण हे होऊ देणार नाही. मुख्यमंत्र्यांविरोधात आपण याचिका दाखल करणार,” असंही दमानिया यांनी म्हटलं आहे. “पार्थ पवार यांचं नाव काल एफआयआरमध्ये यायला पाहिजे. उच्च न्यायालयाने पार्थ पवार यांचं नाव का नाही हे विचारलं आहे,” अशी आठवण दमानिया यांनी करुन दिली. सरकारला इशारा देताना अंजली दमानिया यांनी, “जी फसवणूक झाली आहे त्याची शिक्षा लोकांना मिळाली पाहिजे,” असंही म्हटलं आहे.

अधिवेशनावर रोजचा कोट्यवधींचा खर्च होतो आणि आमदार…

हिवाळी अधिवेशनामध्ये जुन्नरचे आमदार शरद सोनावणे बिबट्यांसंदर्भातील प्रश्नांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी बिबट्याचा ड्रेस परिधान करुन गुरुवारी विधानसभेत दाखल झाले होते. यावरुनही दमानियांनी टोला लगावला आहे. “फॅन्सी ड्रेस ,फॅशन शो म्हणायचं का? आमदार काय ड्रेस घालून येत आहेत. अधिवेशनावर एका दिवसाचा 12 ते 13 कोटी रुपये खर्च होत आहे. हे असे ड्रेस घालून येत आहेत. आमदारांची काय बुद्धीमत्ता आहे,” असा टोला दमानियांनी लगावला.

विरोधी पक्षाने महाराष्ट्रासाठी लढलं पाहिजे

पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणाचा मुद्दा अधिवेशनात न मांडल्याबद्दलही दमानिया यांनी नाराजी व्यक्त केली. “विरोधी पक्ष नवीन विषय मांडेल असं वाटतं होतं. ते मांडत नाही. गायरान जमीन, आरोग्य, शिक्षा यावर सरकारने श्वेत पत्रिका काढावी. 2000 ते 2025 कालावधीतील श्वेतपत्रिका काढावी. महसूल विभागकडून इशारा पत्र काढावीत. अनियमितता काढावी आणि दोषींना 24 तासात बडतर्फ करण्याचा आदेश काढावा. गृहखात्याने इशारा पत्र द्यावं. विरोधी पक्षाने महाराष्ट्रासाठी लढावं,” असं दमानियांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्र्यांविरुद्ध कोर्टात जाणार

“मी कोर्टात जाणार आहे. खारगे समितीकडे तिसरं सबमिशन करणार आहे. त्यानंतर कोर्टात याचिका दाखल करणार. मुख्यमंत्र्यांना कोर्टात खेचण्याची पाळी आली आहे. 21 कोटी भरण्यास सांगितलं. 42 कोटी सांगितलं. उद्योग विभागाने एफआयआर करून गुन्हा दाखल करणे आवश्यक आहे. उदय सामंत यांच्याशी बोलणार आहे. कोर्टाची ऑर्डर आणून जप्तीची वसुली करणार,” असं दमानिया यांनी म्हटलं आहे.

“शीतल तेजवानीच्या घरावर दोन वेळ कारवाही झाली. रोख रकमेने व्यवहार झाला असावा पण ते दिसत नाही,” असंही दमानिया म्हणाल्या.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...

0
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...
spot_img

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
error: Content is protected !!