Homeमहाराष्ट्रपुणे ते गोवा मुंबई ते गोवा महाराष्ट्रात मध्य रेल्वेच्या ७६ विशेष गाड्या

पुणे ते गोवा मुंबई ते गोवा महाराष्ट्रात मध्य रेल्वेच्या ७६ विशेष गाड्या


महाराष्ट्रातील हिवाळ्यातील विशेष डाग: नाताळ, नववर्ष आणि हिवाळ्याच्या सुट्टीमध्ये वाढणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने विविध मार्गावर 76 हिवाळी विशेष रेल्वेचालवण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष रेल्वेगाड्या मुंबई ते करमळी, नागपूर, मंगळुरू, तिरुवनंतपुरम्, तसेच पुणे ते नागपूर, अमरावती, सांगानेर दरम्यान चालविण्यात येणार आहेत.  मुंबई-पुणे ते गोवा, केरळ, नागपूर, अमरावती आणि राजस्थानमधील सांगानेर येथे धावतील. यापैकी मुंबई-गोवा मार्गावर सर्वाधिक सेवा असतील,

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, सीएसएमटी – करमळी – सीएसएमटी दरम्यान दैनिक विशेष ३६ रेल्वेगाड्या धावतील. गाडी क्रमांक सीएसएमटी ते करमळी विशेष रेल्वेगाडी १९ डिसेंबर ते ५ जानेवारी या कालावधीत दररोज रात्री १२.२० वाजता सीएसएमटी येथून सुटेल आणि करमळी येथे त्याच दिवशी दुपारी १.१० वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०११५२ करमळी ते सीएसएमटी विशेष रेल्वेगाडी १९ डिसेंबर ते ५ जानेवारी या कालावधीत दररोज दुपारी २.१५ वाजता करमळी येथून सुटेल आणि सीएसएमटी येथे पुढील दिवशी रात्री ३.४५ वाजता पोहोचेल.एलटीटी – तिरुवनंतपुरम् – एलटीटी साप्ताहिक विशेष ८ रेल्वेगाड्या धावतील. गाडी क्रमांक ०११७१ एलटीटी ते तिरुवनंतपुरम् विशेष रेल्वेगाडी १८ डिसेंबर ते ८ जानेवारी या कालावधीत प्रत्येक गुरुवारी दुपारी ४ वाजता एलटीटी येथून सुटेल आणि तिरुवनंतपुरम् येथे दुसऱ्या दिवशी रात्री ११.३० वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०११७२ तिरुवनंतपुरम् ते एलटीटी विशेष रेल्वेगाडी २० डिसेंबर ते १० जानेवारी या कालावधीत प्रत्येक शनिवारी दुपारी ४.२० वाजता तिरुवनंतपुरम् येथून सुटेल आणि एलटीटी येथे तिसऱ्या दिवशी रात्री १ वाजता पोहोचेल.

एलटीटी – मंगळुरू – एलटीटी साप्ताहिक विशेष रेल्वेगाडीच्या ८ फेऱ्या धावतील. गाडी क्रमांक ०११८५ एलटीटी ते मंगळुरू विशेष रेल्वेगाडी १६ डिसेंबर ते ६ जानेवारी या कालावधीत प्रत्येक मंगळवारी दुपारी ४ वाजता एलटीटी येथून सुटेल आणि मंगळुरू येथे दुसऱ्या दिवशी १०.०५ वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०११८६ मंगळुरू ते एलटीटी विशेष रेल्वेगाडी १७ डिसेंबर ते ७ जानेवारी या कालावधीत प्रत्येक बुधवारी दुपारी १ वाजता मंगळुरू येथून सुटेल आणि एलटीटी येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ६.५० वाजता पोहोचेल.

सीएसएमटी – नागपूर – सीएसएमटी साप्ताहिक विशेष ६ रेल्वेगाड्या धावतील. गाडी क्रमांक ०१००५ सीएसएमटी – नागपूर विशेष रेल्वेगाडी २० डिसेंबर ते ३ जानेवारी या कालावधीत प्रत्येक शनिवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रात्री १२.३० वाजता सुटेल आणि नागपूर येथे त्याच दिवशी दुपारी ३.३० वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०१००६ नागपूर – सीएसएमटी विशेष रेल्वेगाडी २० डिसेंबर ते ३ जानेवारी या कालावधीत प्रत्येक शनिवारी सायंकाळी ६.१० वाजता नागपूर येथून सुटेल आणि सीएसएमटी येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ८.२५ वाजता पोहोचेल.

पुणे – नागपूर – पुणे साप्ताहिक विशेष ६ रेल्वेगाड्या, पुणे – सांगानेर – पुणे साप्ताहिक अतिजलद विशेष ६ रेल्वेगाड्या आणि पुणे – अमरावती – पुणे साप्ताहिक विशेष ६ रेल्वेगाड्या धावतील. या विशेष रेल्वेगाड्यांचे आरक्षण १० डिसेंबर रोजीपासून सुरू होईल. सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर तसेच आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर तिकीट काढता येईल.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...

0
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...
spot_img

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
error: Content is protected !!