Homeमनोरंजनभारत vs टी-20 मालिका टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पहिला सामना 101 धावांनी...

भारत vs टी-20 मालिका टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पहिला सामना 101 धावांनी जिंकला


IND VS SA T20 मालिका : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India VS South Africa) यांच्यात पाच सामन्यांची टी 20 सीरिज सुरु असून यातील पहिला सामना हा ओडिसामध्ये खेळवला गेला. या सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 176 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र हे आव्हान पूर्ण करण्याच्या प्रयत्नात असताना टीम इंडियाच्या गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेला ऑल आऊट केले. त्यामुळे टीम इंडियाचा 101 धावांनी विजय झाला.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

दक्षिण आफ्रिकेने जिंकला टॉस :

ओडिशाच्या बाराबती स्टेडियमवर भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात पहिला सामना पार पडला. या सामन्यापूर्वी झालेला टॉस दक्षिण आफ्रिकेने जिंकला असून त्यांनी प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. तर टीम इंडियाला आधी फलंदाजीसाठी मैदानात यावं लागलं. यावेळी टीम इंडियाच्या टॉप ऑर्डरला स्वस्तात बाद करण्यात दक्षिण आफ्रिकेला यश आलं. 7 व्या ओव्हरला 48 धावा असताना भारताच्या तीन विकेट गेल्या होत्या. त्यानंतर सुद्धा दक्षिण आफ्रिकेला भारताचे फलंदाज बाद करण्यात यश येतच होते, मात्र त्यात तिलक वर्माने 26 धावा, अक्षर पटेलने 23 धावा केल्या. तर तब्बल 2 महिन्यांनी मैदानात परतलेल्या हार्दिक पंड्याने नाबाद 59 धावांची खेळी केली. टीम इंडियाने 6 विकेटवर 175 धावा केल्या आणि दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 176 धावांचं आव्हान दिलं.

हेही वाचा : लग्न मोडल्यानंतर स्मृती मंधाना पहिल्यांदाच देशासाठी उतरणार मैदानात, ‘या’ दिवशी खेळणार सामना

भारतीय गोलंदाजांनी उडवला धुव्वा :

टीम इंडियाने विजयासाठी दिलेलं 176 धावांचं आव्हान पूर्ण करण्याच्या प्रयत्नात दक्षिण आफ्रिकेचा संघ होता. मात्र टीम इंडियाच्या घातक गोलंदाजी समोर त्यांचा एकही फलंदाज फार काळ मैदानात टिकू शकला नाही. यात टीम इंडियाकडून सर्वाधिक प्रत्येकी 2 विकेट अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह, वरुण  चक्रवर्ती, अक्षर पटेल यांनी घेतल्या तर हार्दिक पंड्या आणि शिवम दुबे यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.  दक्षिण आफ्रिकेकडून सर्वाधिक धावा डेवॉल्ड ब्रेव्हिस (22) ने केल्या.

भारताची प्लेइंग 11:

अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्य कुमार यादव (कर्नाधर), टिळक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, जिश शर्मा (विकेट किपर), अक्षर पटेल, जसधर पटेल, जसदीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग

दक्षिण आफ्रिकेची प्लेईंग 11 :

क्विंटन डी कॉक (विकेटकीप), एडन मार्कराम (विकेटकीप), ट्रिस्टन स्टब्स, डेवाल्ड ब्रेविस, डेव्हिड मिलर, डोनोव्हन फरेरा, मार्को जॅनसेन, केशव महाराज, लुथो सिपामाला, लुंगी एनगिडी, एनरिक नॉर्टजे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...

0
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...
spot_img

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
error: Content is protected !!