HomeमनोरंजनNatural Home Remedies for tooth pain relief | दात दुखीवर रामबाण ठरतील...

Natural Home Remedies for tooth pain relief | दात दुखीवर रामबाण ठरतील ‘हे’ घरगुती उपाय!


तोंडी काळजी टिप्स: “इतर कोणतेही दुखणे परवडले पण हे दाताचे दुखणे नको रे बाबा!” दात दुखत असल्यावर तुमच्याही मनात असाच काहीसा विचार येत असेल. कारण दाताचे दुखणे इतके तीव्र असते की, कधी कधी असह्य होते. यावर उपाय म्हणून पेन किलरचे औषध घेतले जाते, पण त्याने फक्त काही काळच आराम मिळतो. नंतर पुन्हा दुखणे सुरू होते. दात कीडल्यामुळे किंवा दाढेला सूज आली असल्यास दात दुखण्याची समस्या उद्भवते. पण तुम्ही काही घरगुती उपाय वापरू शकता. जे दाताचे दुखणे कमी करण्यास झटपट पटापट मदत करू शकता.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

प्राचीन आयुर्वेदात प्रत्येक आजारावर उपाय सांगितले गेले आहेत. आजही अनेक आधुनिक डॉक्टर उपचारासाठी आयुर्वेदाचा आधार घेत असतात. आपल्या रोजच्या आहारातील असे अनेक पदार्थ आहेत ज्यांमध्ये औषधी गुणधर्म आहेत. आयुर्वेदात कोणत्या आजारावर उपाय म्हणून कोणते पदार्थ का आणि कसे वापरावेत याबाबत सविस्तर माहिती दिली गेली आहे. त्यातील काही उपाय आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.

लवंगचे तेल

दात दुखीसाठी लवंगचे तेल वापरणे अधिक फायदेशीर ठरते. यामध्ये असलेला युजेनॉल नावाचा घटक दुखणाऱ्या दातावर नैसर्गिक भूल देण्याचे काम करतो, यामुळे वेदनांचे प्रमाण कमी होऊन त्वरीत आराम मिळतो. तसेच यातील जंतुनाशक गुणधर्म दाताला कीड लागण्यास कारणीभूत असलेल्या जीवाणूंशी लढतात. काहीवेळा दंतवैद्य झिंक ऑक्साईडमध्ये लवंग तेलाचा वापर करतात. ज्यामुळे संवेदनशील मज्जातंतूना शांत करते.

लसूण पेस्ट

लसूणमध्ये ऍलिसिन नावाचे घटक असते जो वेदना कमी करण्यास मदत करतो. यामधील अँटीबॅक्टेरीयल गुणधर्म दातांचे आणि हिरड्यांचे संसर्गापासून संरक्षण करते. यातील अँटी-दाहक गुणधर्मांमुळे सूज आणि जळजळ कमी होण्यास मदत होते. दात दुखीवर लसूण पेस्ट वापरणे हा एक नैसर्गिक आणि प्रभावी घरगुती उपाय आहे.

कांद्याचा रस

दात दुखत असल्यास कांद्याचा लहान तुकडा तोंडात ठेवा आणि चघळा. यामुळे तुकड्यातून निघणारा रस दुखणाऱ्या दाताला प्रभावित करेल. कांद्यामध्ये असलेले अँटीसेप्टीक गुणधर्म दातांच्या आजूबाजूचे जंतू नष्ट करतात. कांद्यामध्ये असलेले गुणधर्म नैसर्गिकरित्या वेदना कमी करण्यास मदत करतात. यामुळे सूजही कमी होते.

जास्वंदाची मिळविण्यासाठी

जास्वंदाच्या पानांमध्ये अँटी दाहक गुणधर्म असतात. जे हिरड्यांची सूज कमी करण्यास मदत करतात. तुम्ही जास्वंदाची पाने गरम पाण्यात उकळवून, त्या पाण्याने गुळण्या करू शकता. ज्यामुळे दात दुखीवर त्वरीत आराम मिळतो.

या सर्व घरगुती उपायांसह नेहमीच दातांची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. दातांची नियमित आणि योग्य स्वच्छता करणे आवश्यक आहे. तसेच दाताच्या दुखीची तीव्रता अधिक जास्त असेल तर अशावेळी दंतवैद्यांचा सल्ला घेणे अधिक महत्त्वाचे ठरते.

(अस्वीकरण: वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...

0
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...
spot_img

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
error: Content is protected !!