Homeमनोरंजनऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लीश ऍशेस मालिका जो रूटच्या शतकाने मॅथ्यू हेडनची पेच वाचवली

ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लीश ऍशेस मालिका जो रूटच्या शतकाने मॅथ्यू हेडनची पेच वाचवली


ऍशेस कसोटी मालिका: ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात एशेज 2025 चा दुसरा टेस्ट सामना खेळवला जातोय. पिंक बॉलने खेळवण्यात येणाऱ्या या डे नाईट टेस्ट सामन्याच्या पहिल्या दिवशी इंग्लंडचा फलंदाज जो रूट ऐतिहासिक कामगिरी करत ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर त्याचं पहिलं शतक लागावलं आणि स्टंप्सपर्यंत नाबाद राहिला. ऑस्ट्रेलियाच्या धरतीवरील रूटचं पहिलं तर टेस्ट क्रिकेटमधील त्याचं हे 40 वं शतक होतं. रूटच्या या शतकाने ऑस्ट्रेलियाची धाकधूक वाढली, मात्र ऑस्ट्रेलियाचे माजी फलंदाज मॅथ्यू हेडनने मात्र सुटकेचा श्वास घेतला.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

नेमकं काय प्रकरण?

ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर फलंदाज मॅथ्यू हेडनने एशेज टेस्ट सीरिजच्या सुरुवातीला म्हटले होते की जर इंग्लंडचा फलंदाज जो रूटने 2025-26 एशेज दरम्यान शतक लगावलं नाही तर ते मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर कपडे न घालता नग्न धावतील. एशेज 2025 च्या दुसऱ्या टेस्ट सामन्यादरम्यान जो रूटने अखेर शतक ठोकलं, त्यामुळे मॅथ्यू हेडनची लाज वाचली. रूटच्या शतकानंतर हेडनने एक्सवर पोस्ट करत लिहिले की, ‘जो रूट, अभिनंदन मित्रा. तुला थोडा वेळ लागला. दहा अर्धशतके आणि शेवटी एक शतक, शाब्बास मित्रा, एक उत्तम खेळी’.

मॅथ्यूने लावली होती पैज :

गेल्या आठवड्यात, हेडनने ऑल ओव्हर द क्रिकेट पॉडकास्टवर रूटला पॅनलिस्टच्या ऑल-टाइम अ‍ॅशेस इलेव्हनमध्ये समाविष्ट केले गेले नाही यावर अविश्वास व्यक्त केला. राग आणि दिखाऊपणात, त्याने जर रूटने या अ‍ॅशेसमध्ये शतक केले नाही तर मी मेलबर्नमध्ये नग्न फिरेन अशी पैज लावली होती.  हेडनचे हे विधान चर्चेचा विषय बनले होते.

ऑस्ट्रेलियात खेळलेल्या मागील 15 टेस्टमध्ये त्याने एकही शतक ठोकले नव्हते. मात्र 16 व्या टेस्ट सामन्यात त्याने जबरदस्त शतक लगावले. गाबा जिथे फलंदाजी करणं खूप कठीण असतं अशा ठिकाणी त्याने पहिल्या दिवशी रूटने नाबाद 135 धावा केल्या. त्याच्या शतकाच्या जोरावर इंग्लंडने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 9 विकेटच्या मोबदल्यात 325 धावा केल्या आहेत.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न:

एशेज २०२५ च्या दुसऱ्या टेस्ट सामन्यात जो रूटने काय कामगिरी केली?

जो रूटने ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर त्याचे पहिले शतक लगावले आणि स्टंप्सपर्यंत नाबाद १३५ धावा केल्या. हे त्याचे टेस्ट क्रिकेटमधील ४० वे शतक होते.

मॅथ्यू हेडनने जो रूटबाबत कोणती पैज लावली होती?

मॅथ्यू हेडनने म्हटले होते की, जर जो रूटने २०२५-२६ एशेज सीरिजमध्ये शतक लगावले नाही तर ते मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर नग्न धावतील.

ऑस्ट्रेलियात जो रूटने किती टेस्ट खेळून शतक लगावले?

ऑस्ट्रेलियात खेळलेल्या मागील १५ टेस्टमध्ये त्याने एकही शतक ठोकले नव्हते, मात्र १६ व्या टेस्ट सामन्यात त्याने शतक लगावले.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...

0
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...
spot_img

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
error: Content is protected !!