Homeदेश-विदेशरशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन भारत भेट россия विमानावर लिहिले आहे म्हणजे ५०...

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन भारत भेट россия विमानावर लिहिले आहे म्हणजे ५० देश ही लिपी वापरतात

पुतिन भारतात: जवळपास 4 वर्षांनंतर रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) भारत दौऱ्यावर आले आहेत. दोन दिवसांच्या या दौऱ्यादरम्यान भारतासह रशियाचे अनेक करार होणार असून, पुतिन आणि मोदी यांच्यात काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर धोरणात्मक चर्चा होणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळं अमेरिकेसह इतर बड्या देशांचंही लक्ष या भेटीकडे लागलं आहे. दरम्यान पुतिन भारतात आले, त्या क्षणी कडोकोट सुरक्षा व्यवस्थेमध्ये त्यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देशात स्वागत केलं.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

पुतिन यांचा हा दौरा चर्चेत असणं यात दुमत नाही, पण आणखी एका गोष्टीनंसुद्धा या चर्चांमध्ये लक्ष वेधलं. ती गोष्ट म्हणजे पुतिन ज्या विमानानं भारतात आले त्या विमानावर लिहिण्यात आलेला एक शब्द. एखाद्या इंग्रजी शब्दाला उलट लिहिलं असता तो कसा दिसेल, अशी काहीशी अक्षरं लिहत तयार झालेला शब्द अगदी ठळक दिसेल अशा रितीनं रशियन राष्ट्रपतींच्या विमानावर लिहिण्यात आला होता.

खास विमान अन् ते खास शब्द… अर्थ काय?

पुतिन यांच्या विमानावरील हा शब्द Code Name तर नाही? असाही प्रश्न अनेकांच्या मनात घर करून गेला. पण, तसं नाहीय. ज्या विमानानं रशियाचे राष्ट्रपती भारतात आले त्या विमानाचं नाव आहे इल्यूशिन-96 (IL96) आणि त्यावर लिहिण्यात आलेल्या россия चा अर्थ काय आहे माहितीये? हा एक रशियन शब्द असून, त्याचा अर्थ आहे ‘रशिया’. तो सिरिलिक (Cyrillic) लिपीमध्ये लिहिण्यात आला आहे. ही लिपी प्रामुख्यानं पूर्व युरोप, मध्य आशिया इथं वापरली जाते. यामध्ये रशिया, बल्गेरिया, सर्बिया आणि युक्रेनचा समावेश आहे.

ग्रीक वर्णमाला ही या लिपीचं मूळ असून, 9 व्या शतकामध्ये संत सिरिल आणि मेथोडियस यांच्या अनुयायांनी या लिपीचा विकास केला. जवळपास 50 देशांमध्ये या लिपीचा वापर केला जात असून, तिला अज्बुका असंही म्हटलं जातं. 9 व्या शतकात प्रारंभिक बल्गेरियाई साम्राज्यात या लिपीचा विकास झाला, जी प्रामुख्यानं स्लाव्ह भाषांसाठी तयार करण्यात आली होती. या लिपीचा वापर बल्गेरियायी, सर्बियायी, मॅसेडोनियायी, उज्बेक, कजाख आणि मंगोलियायी भाषांसाठी केला जातो. 24 मे हा दिवस या वर्णमालेसाठी अतिशय खास असून, तो सिरिलिक वर्णमाला दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस मुख्यत्वे बल्गेरियातील संस्कृती आणि शिक्षणाला समर्पिक आहे. युपोपीय संघात अधिकृत मान्यताप्राप्त लिपीमध्ये या लिपीचाही समावेश होतो.

Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्राद्धविधीमुळे श्राद्धकर्ता आणि त्याचे पूर्वज यांना आध्यात्मिक लाभ होतो का ?

0
गोवा - पिढ्यानपिढ्या, पितृपक्ष हा पूर्वजांचे (पितरांचे) स्मरण करण्याचा आणि त्यांच्यासाठी श्राद्धविधी करण्याचा काळ म्हणून ओळखला जातो. पूर्वजांच्या आध्यात्मिक कल्याणासाठी आणि सद्गतीसाठी केला जाणारा...
spot_img

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...
error: Content is protected !!