इंडिगो एअरलाइन: देशातील सर्वात मोठी आणि नावाजलेली इंडिगो एअरलाइन मोठ्या संकटात सापडली आहे. गेल्या 30 दिवसांमध्ये 14000 उड्डाणे रद्द झाली आहेत. त्यामुळे मुंबई, दिल्ली, बंगळुरू, हैदराबादसारख्या मोठ्या विमानतळांवर फ्लाइट्सचे शेड्युल बिघडल्यामुळे प्रवाशांचे नाहक होत आहेत. सलग तिसऱ्या दिवशी वैमानिकांसाठी नवीन फ्लाइट-ड्युटी आणि विश्रांती-कालावधीच्या नियमांच्या पार्श्वभूमीवर, देशांतर्गत विमान कंपनी इंडिगोने गुरुवारी तीन प्रमुख विमानतळांवरून 300 हून अधिक उड्डाणे रद्द केली आहेत.
इंडिगोने गुरुवारी विमान वाहतूक नियामक डीजीसीएला कळवलं की, ते 8 डिसेंबरपर्यंत आणखीन उड्डाणे कमी करणार आहे. तसंच इंडिगोचे 10 फेब्रुवारी 2026 पर्यंत सेवा पूर्ववत होईल असं सांगण्यात आलंय. गेल्या काही दिवसांत इंडिगोच्या विमान वाहतुकीत झालेल्या मोठ्या प्रमाणात व्यत्ययाच्या पार्श्वभूमीवर, नागरी विमान वाहतूक मंत्रालय आणि नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) एअरलाइन अधिकाऱ्यांसोबत एक सविस्तर आढावा बैठक घेतली.
डीजीसीएने इंडिगोच्या व्यत्ययांचा आढावा घेतला कारण विमान कंपनीने सामान्य फ्लाइट रद्द करण्यापेक्षा जास्त अनुभव घेतला; फेब्रुवारी 2026 पर्यंत ऑपरेशन्स सामान्य होतील
वाचा @ANI कथा | https://t.co/qHYjFj73Aq#Indigo #DGCA #MOCA #AAI pic.twitter.com/nCwVA5RWhv
— ANI डिजिटल (@ani_digital) ४ डिसेंबर २०२५
विविध विमानतळांवर 500 हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आल्याचे आज डीजीसीएने जारी केलेल्या निवेदनात सांगण्यात आले आहेत. चुकीच्या निर्णयामुळे, फ्लाइट ड्युटी टाइम लिमिटेशन (एफडीटीएल) नियमांच्या दुसऱ्या टप्प्याच्या अंमलबजावणीतील नियोजनातील त्रुटींमुळे उड्डाणांमध्ये व्यत्यय आल्याचे बोलं जात आहे. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी दिल्ली, मुंबईसह 10 हून अधिक विमानतळांवर इंडिगोची 300 हून अधिक विमाने रद्द झाली आहेत.
इंडिगो उडवू नका. शून्य माहिती किंवा आधार नसतानाही प्रवाशांना तासन्तास अडकून ठेवले जात आहे. लोकांसाठी एअरलाईन्सची अवहेलना अस्वीकार्य आहे आणि त्यांना कोणत्याही जबाबदारीचा सामना करावा लागत नाही हे लज्जास्पद आहे. @MoCA_GoI @DGCAIndia @IndiGo6E #indigo #मुंबई #विमानतळ pic.twitter.com/SLjIMp6Yb6
— mmk666 (@mmk6664) ४ डिसेंबर २०२५
याचा सर्वाधिक फटका दिल्लीतील प्रवाशांना बसला आहे. दिल्ली विमानतळावरून 95 फ्लाइट्स तर मुंबईहून 86, बंगळुरूमधून 73, हैदराबादमधून 64, जयपूरमधून 4 आणि इंदूरमधून 3 फ्लाइट्स रद्द झाली आहेत.





















