Homeदेश-विदेशएपस्टाईन फाइल्स केस जेफ्री एपस्टाईन प्रायव्हेट आयलंड इनसाइड फोटो आणि व्हिडिओ नवीनतम...

एपस्टाईन फाइल्स केस जेफ्री एपस्टाईन प्रायव्हेट आयलंड इनसाइड फोटो आणि व्हिडिओ नवीनतम अपडेट

जेफ्री एपस्टाईन प्रायव्हेट आयलंड इनसाइड फोटो: संपूर्ण जगभरात चर्चेचा विषय ठरलेलं आणि आंतरराष्ट्रीय राजकारणात खळबळ माजवणारं सेक्स रॅकेट आणि त्यासंदर्भातील काही अशा गोष्टींचा खुलासा टप्प्प्याटप्प्यानं केला जात आहे ज्यामुळं प्रस्थापितांना दणका बसण्याची शक्यता आहे. यामध्ये येणारं एक महत्त्वाचं नाव म्हणजे अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प. नुकतंच या प्रकरणात अमेरिकी ओवरसाईट समितीच्या डेमोक्रॅट सदस्यांनी या प्रकरणात दोषी असणाऱ्या जेफरी एपस्टीनच्या खासगी बेटाबाबत खळबळजनक खुलासा केला आहे. हे तेच ठिकाण आहे जिथं बऱ्याच काळापासून अल्पवयीन मुली आणि महिलांचं लैंगिक शोषण आणि मानवी तस्करी केली जात होती. ज्यामुळं या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश होत आहे

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

कधीही न पाहिलेलं चित्र जगासमोर…

नव्यानं समोर आलेल्या पुराव्यांमध्ये अमेरिकेच्या वर्जिन आयलंडमधील ‘लिटील सेंट जेम्स आयलंड’चे फोटो आणि काही व्हिडीओ समितीनं जारी केले आहेत. यामध्ये बेडरुम, बाथरुम आणि काही विचित्र खोल्याचे फोटो समोर आले आहेत. जिथं एका खोलीत दंतचिकित्सांकडे गेल्यावर दिसणारी खुर्ची, त्याच खोलीतील भिंतीवर असणारे मुखवटे लक्ष वेधत आहेत. एका फोटोमध्ये लँडलाईन टेलिफोन दिसत असून त्यावर डॅरेन, रिच, माईक, पॅट्रिक, लॅरी अशी नावं स्पीड डायलवर असल्याचं पाहायला मिळत आहे.

फोटोंव्यतिरिक्त या बेटावर असणारी आकर्षक आणि महागडी सजावट लक्ष वेधत आहे. जिथं अनोख्या पायवाटा, पाम ट्री, समुद्र दिसेल अशा ठिकाणी असणारा स्विमिंग पूल, आतमध्ये असणारा स्टडी रूम जिथं असणाऱ्या फळ्यावर, ‘power, deception, plots, political’ असे शब्द लिहिल्याचं आढळलं. काही छायाचित्रांवर महिलांची नावंसुद्धा आढळली. मात्र ती सुरक्षा आणि गोपनीयतेच्या कारणास्तव जारी करण्यात आली नाहीत असं समितीनं स्पष्ट केलं.

सदर खळबळजनक खुलासा करणाऱ्या समितीच्या अध्यक्षस्थानी असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार ही छायाचित्र एपस्टीनच्या ‘मन हेलावणाऱ्या, हादरवणाऱ्या’ विश्वाचा पर्दाफाश करत असून ते पीडितांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी जारी केले जाणार आहेत. दरम्यान अमेरिकेच्या संसदेनं राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एपस्टीन प्रकरणाशी संबंधित उर्वरित सर्व पुरावे सार्वजनिक स्तरावर प्रसिद्ध करण्याचं आवाहन केलं आहे.

दरम्यान सध्या समोर आलेले हे पुरावे अशा वेळी सादर करण्यात आले आहेत जेव्हा काही दिवसांपूर्वीच ट्रम्प यांनी एका कायद्यावर स्वाक्षरी केली, ज्यामध्ये न्याय विभागानं 30 दिवसांच्या आत एपस्टीन संबंधी पुरावे जारी करावेत असा आदेश काढण्यात आला होता.

Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्राद्धविधीमुळे श्राद्धकर्ता आणि त्याचे पूर्वज यांना आध्यात्मिक लाभ होतो का ?

0
गोवा - पिढ्यानपिढ्या, पितृपक्ष हा पूर्वजांचे (पितरांचे) स्मरण करण्याचा आणि त्यांच्यासाठी श्राद्धविधी करण्याचा काळ म्हणून ओळखला जातो. पूर्वजांच्या आध्यात्मिक कल्याणासाठी आणि सद्गतीसाठी केला जाणारा...
spot_img

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...
error: Content is protected !!