Homeमहाराष्ट्रपुणे कोरेगाव पार्क जमीन प्रकरण शीतल तेजवानी यांना पोलिस स्टेशनला जाण्यास नकार...

पुणे कोरेगाव पार्क जमीन प्रकरण शीतल तेजवानी यांना पोलिस स्टेशनला जाण्यास नकार देत जबरदस्तीने गाडीतून काढून टाकले.


शीतल तेजवानी अटक: झी 24 तासने पुणे कोरेगाव पार्कमधील जमीन गैरव्यवहार उघड केल्यानंतर मेगा इम्पॅक्ट झाला आहे. पुणे पोलिसांनी शीतल तेजवानीला अटक केली आहे. अटकेनंतर पोलिसांनी ससून रुग्णालयात तिची वैद्यकीय तपासणी केली. यानंतर तिला पोलीस आयुक्तालयात आणण्यात आलं असता, तिचा तोरा मात्र कायम होता. पोलिसांना जबरदस्तीने तिला गाडीतून खाली उतरवावं लागलं. यानंतर तिला पोलीस आयुक्तालयात चालत नेण्यात आलं. ती गॉगल आणि मास्क घालून पोहोचली होती.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

पुण्याच्या कोरेगाव पार्क परिसरातल्या 40 एकर जमिनीच्या गैरव्यवहारप्रकरणात शीतल तेजवानी हिनं मोठी भूमिका बजावली होती. शीतल तेजवानीनं जमीन ताब्यात घेण्यासाठी पॉवर ऑफ अटर्नीचं हत्यार वापरलं होतं. तिनं जमीन थेट नावावर करण्यासाठी वेगवेगळे फंडेही वापरले होते. पुणे पोलिसांनी तिची याप्रकरणी चौकशीही केली होती. अखेर आता तिला अटक करण्यात आली आहे.

शीतल तेजवानीला अटक केल्यानंतर पोलीस आयुक्तालयात आणण्यात आलं, तेव्हा गाडीतून उतरण्यास तिने विरोध केला. पोलिसांना जेव्हा तिला आम्ही तुम्हाला शॉर्टकटने नेऊ असं सांगितलं, तेव्हाच ती गाडीतून खाली उतरली. आरोप सिद्ध झाल्यानंतरही तेजवानीच्या वागण्यात कुठेही नरमाई दिसली नाही. शीतल तेजवानीला अटक केल्यानंतरही तिच्यातली मग्रुरी कायम दिसली.

पोलिसांनी काय सांगितलं?

शीतल तेजवानीला शासकीय जमीन लाटल्याचा प्रयत्न केला म्हणून मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी पुणे पोलिसांनी अटक केल्याची माहिती सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी झी 24 तासशी बोलताना दिली आहे.

पुरेसे पुरावे मिळाल्यानंतर अटक करण्यात आली. तपासात जे मुद्दे पुढे येतील त्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे. खडक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. याच गुन्ह्यात शीतल तेजवानीला अटक झाली. मुंढवामध्ये 43 एकर जमीन बेकायदेशीर पद्धतीने खरेदी केली आहे. या प्रकरणात सखोल चौकशी केली जाणार यामध्ये जे नावं येतील त्याच्यावर कारवाई केली जाईल असं आर्थिक गुन्हे शाखा उपायुक्त विवेक मासाळ यांनी सांगितलं आहे.

पुण्यातील कोरेगाव पार्कमधील मोक्याची 40 एकर जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार, दिग्विजय पाटील आणि शीतल तेजवानी यांनी संगनमत करून बळकावल्याचे ‘झी 24 तास’ ने कागदोपत्री सिद्ध करून हा घोटाळा समोर आणला होता. या प्रकरणाचा गंधही नसल्याचे दाखवणाऱ्या सरकारी यंत्रणांना कामाला लावले आणि या व्यवहारातील मास्टरमाइंड शीतल तेजवानी अखेर पोलिसांनी अटक केली.

शीतल तेजवानीच्या अटकेमुळे या गैरव्यवहारातील बरेच काळेबरे बाहेर येतील. या प्रकरणात तेजवानी आणि अमेडिया कंपनीच्या संचालकांनी नेमकी काय आणि कशी बनवाबनवी केली आहे, यानुषंगाने पोलीस तपास करीत होते. त्यात, विकास खारगे समिती आणि राजेंद्र मुठे समितीही पोलिसांना माहिती देत होती. शिवाय, पुणे शहर तहसिल कार्यालयापासून अगदी जिल्हाधिकारी , विभागीय आयुक्त, जमाबंदी आयुक्त मुद्रांक शुल्क विभागाचे महानिरीक्षकांच्या अहवालांचा आधार घेऊन पुणे पोलिसांनी तपास केला. याबाबत शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील यांनी पोलिसांना फारसे सहकार्य केले नव्हते, असे सांगितले जात आहे. या प्रकरणात  दिग्विजय पाटील, शीतल तेजवानी यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...

0
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...
spot_img

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
error: Content is protected !!