Homeदेश-विदेशइम्रान खान जिवंत की मृत? जेलमध्ये भावाला भेटून आल्यानंतर बहीण उज्मा यांनी...

इम्रान खान जिवंत की मृत? जेलमध्ये भावाला भेटून आल्यानंतर बहीण उज्मा यांनी अवघ्या काही तासांत केला मोठा खुलासा


इम्रान खान: गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या प्रकृतीबद्दल अनेक अफवा पसरल्या आहेत. इम्रान खान आदियाला तुरुंगात असून त्यांच्या बहिणीला भेट घेता यावी यासाठी जेलबाहेर मोठ्या प्रमाणात निदर्शने करण्यात आली. इम्रान खान यांच्या पक्षाचे, पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) हजारो कार्यकर्ते आणि समर्थकही उपस्थित होते.  इम्रान खान यांना गेल्या तीन आठवड्यांपेक्षा जास्त काळ कोणालाही भेटण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. कारण इम्रान खान जिवंत आहे की नाही याबद्दल सस्पेंस आज मंगळवारी संपुष्टात आला. कारण इम्रान खान यांची बहीण उज्मा यांनी तुरुंगात भावाची 20 मिनिटं भेट घेतली.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

भेटीनंतर बहीणने केला मोठा खुलासा!

इम्रानला भेटल्यानंतर उज्मा यांनी सांगितलं की त्यांची प्रकृती ठीक आहे पण त्यांना मानसिक त्रास दिला जात आहे. बहिणीसोबतच्या भेटीदरम्यान इम्रान खान अत्यंत संतापल्याचे पाहिला मिळाले. पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) रावळपिंडीमध्ये नियोजित निषेधासाठी पुढे जात असताना पाकिस्तान सरकारने उज्मा यांना इम्रान खान यांच्याशी भेटण्याची परवानगी दिली होती. पण, अधिकाऱ्यांनी रावळपिंडीमध्ये सार्वजनिक मेळाव्यांवर बंदी घालत कलम 144 लागू केलंय.

इम्रान खान ठीक आहे का?

इम्रान खान कुठे आहेत याबद्दल प्रश्न उपस्थित करण्यात येत होता. ते जिवंत आहेत की सरकारने त्यांची हत्या केली असा प्रश्न त्यांच्या समर्थकांना पडला होता. त्यांच्या बहिणींनी आदियाला तुरुंग अधीक्षक आणि इतर अधिकाऱ्यांविरुद्ध न्यायालयाचा अवमान याचिका दाखल करुन भेटण्याची परवानगी मागली. तर इम्रान यांच्या मुलांनी तुरुंग अधिकाऱ्यांकडून उत्तरं मागितली. इम्रान खान यांची शेवटची सोशल मीडिया पोस्ट 5 नोव्हेंबरची होती. या पोस्टमध्ये त्यांनी पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्यावर देश पूर्णपणे ताब्यात घेतल्याचा आरोप केल्याचा पाहिला मिळाला होता.

इम्रान यांनी काय आरोप केला?

त्या पोस्टवरून अनेकांनी असे गृहीत धरलं की इम्रान खानला त्यांच्या जीवाला धोका असल्याचे संकेत दिले आहेत. त्यांनी X वर लिहिलंय, “लष्कराने माझ्याविरुद्ध जे काही करता येईल ते केलंय. आता त्यांच्याकडे मला मारण्याशिवाय पर्याय नाही. मी जाहीरपणे म्हटलंय की जर मला किंवा माझ्या पत्नीला काही झालं तर जनरल असीम मुनीर जबाबदार असतील. पण मला भीती वाटत नाही कारण माझा विश्वास मजबूत आहे. मी गुलामगिरीपेक्षा मृत्यूला प्राधान्य देईन.”

त्यांनी मुनीरला “देशाच्या इतिहासातील सर्वात क्रूर हुकूमशहा आणि मानसिकदृष्ट्या अस्थिर माणूस” असेही या पोस्टमध्ये म्हटलं. इम्रान खान यांनी असा दावाही केला की मुनीर पाकिस्तानी सरकारमध्ये सर्वकाही चालवतो, त्याला “मुनीर कायदा” असे संबोधलं जातं. त्यांनी सांगितलं की ते आणि त्यांची पत्नी बुशरा बीबी “अत्यंत क्रूरतेचा” सामना करत आहेत. त्यांनी असीम मुनीर आणि पाकिस्तानी सरकारवर महिला, मुले किंवा वृद्धांची पर्वा न करता पीटीआय सदस्यांना लक्ष्य करण्याचा आरोपही केला.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना उच्च पद मिळण्याचे योग, तर कन्या राशीच्या लोकांना प्रमोशन...

0
बुधवार, २५ नोव्हेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना उच्च पद किंवा मोठी प्रशासकीय जबाबदारी मिळण्याचे प्रबळ संकेत आहेत. सरकारी कंत्राटे आणि बांधकाम क्षेत्राशी संबंधित...

एका शाश्वत जगाची सुरुवात आंतरिक परिवर्तनातून! – श्री. शॉन क्लार्क

0
‘कॉप-३१’ जागतिक हवामान परिषदेत भारतीय शिष्टमंडळातर्फे भारताचा आध्यात्मिक संशोधन दृष्टिकोन सादर ‘पर्यावरण जाणीव चळवळ’ : एका शाश्वत जगाची सुरुवात आंतरिक परिवर्तनातून! - श्री. शॉन...

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...
spot_img

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
error: Content is protected !!