Homeसांस्कृतिकDurgashtami 2025 28 November Remedies for Business Success and Wish Fulfilment |...

Durgashtami 2025 28 November Remedies for Business Success and Wish Fulfilment | 28 नोव्हेंबर 2025 च्या दुर्गाष्टमीला करा ‘हे’ उपाय, व्यवसायात मिळेल यश; सर्व इच्छा होतील पूर्ण


२८ नोव्हेंबर २०२५ दुर्गाष्टमी : दर महिन्याच्या मासिक दुर्गाष्टमीला दुर्गा देवीची मनोभावे पूजा केली जाते. या महिन्याची दुर्गाष्टमी  28 नोव्हेंबर 2025 रोजी साजरी केली जाणार आहे. या अष्टमीला अग्रहायण महिन्यातील दुर्गाष्टमी म्हणूनही ओळखले जाते. दुर्गाष्टमीला दुर्गादेवीची पूजा-अर्चा केल्यास सर्व इच्छा पूर्ण होतात असे मानले जाते. या दिवशी अनेक फलदायी आणि शुभ योग बनत आहेत. त्यामुळे या पवित्र दिनी योग्य उपाय केल्यास देवी दुर्गा तुमच्या जीवनातील सर्व प्रश्न सोडवेल आणि तिची कृपा कायम राहील.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

अग्रहायण दुर्गाष्टमीच्या तिथीची सुरूवात:

हिंदू पंचांगानुसार मार्गशीर्ष महिन्यातील शुक्लाष्टमी तिथी 28 नोव्हेंबर रोजी रात्री 12 वाजून 29 मिनिटांनी सुरू होईल. आणि दुसऱ्या दिवशी 29 नोव्हेंबर रोजी रात्री 12 वाजून 15 मिनिटांनी समाप्त होईल. दुर्गीष्टमीचा हा मुहूर्त 28 तारखेचा दिवस संपल्यानंतर सुरू होत असला तरीही, दुर्गा देवीची पूजा रात्री करण्याला जास्त महत्त्व दिले जाते. त्यामुळे 28 नोव्हेंबरचा दिवसच अग्रहायण दुर्गाष्टमीचा दिवस मानला जाईल.

खास मुहूर्तावर देवीची पूजा करावी:

येत्या दुर्गाष्टमी दिवशी शुक्रवारी हर्षण योगाची स्थिती तयार होत आहे. याशिवाय शतभिषा नक्षत्र आणि बव करण योगाची स्थितीही तयार होत आहे. तसेच शुक्रवार हा दिवस देवी दुर्गेला समर्पित आहे. त्यामुळे नेमक्या या दिवशी दुर्गाष्टमीचा मुहूर्त असणे अधिक फलदायी ठरेल. अष्टमी स्थिती सुरू झाल्यानंतर काही खास मुहूर्तावर देवीची पूजा करावी. पूजेसाठीचा ब्रम्ह मुहूर्त पहाटे 5 वाजून 9 मिनिटांपासून 6 वाजून 3 मिनिटांपर्यंत आहे. विजय मुहूर्त दुपारी 2 वाजून 1 मिनिटांपासून 2 वाजून 43 मिनिटांपर्यंत आहे. गोधूलि मुहूर्त संध्याकाळी 5 वाजून 31 मिनिटांनी 5 वाजून 58 मिनिटांपर्यंत आहे. तर निशिता मुहूर्त रात्री 11 वाजून 48 मिनिटांनी 12 वाजून 42 मिनिटांपर्यंत आहे.

दुर्गाष्टमी दिवशी करा हे उपाय:

जर तुमची एखादी इच्छा पूर्ण होत नसेल तर देवी दुर्गेची पूजा करताना फूलांच्या हारासह लवंग अर्पण करा. आणि एकूण 11 वेळा ‘देवी सर्व भूतेषु विद्या रूपेण संस्थिता’ या मंत्राचा जप करा. तुमच्या जीवनात आर्थिक समस्या जाणवत असतील तर, या शुभ दिवशी घराच्या मुख्य द्वारावर कुंकवाने देवीच्या चरणांचे चिन्ह काढा. तसेच तुळशीचे पान आणि दूध अर्पण करा. हा उपाय तुम्ही रोजही करू शकता. जर तुम्हाला तुमच्या कामात किंवा व्यवसायात भर व्हावी असे वाटत असेल तर, एका डोळ्याच्या नारळावर सात वेळा पवित्र धागा गुंडाळा. तो नारळ देवीला अर्पण करा आणि मनोभावे प्रार्थना करा.

१. प्रश्न: यंदाची अग्रहायण दुर्गाष्टमी नेमकी कोणत्या दिवशी आहे?

उत्तर: 28 नोव्हेंबर 2025 (शुक्रवार) हा दिवस अग्रहायण दुर्गाष्टमी म्हणून साजरा केला जाईल. तिथी रात्री 12:29 वाजल्यापासून सुरू होत असली तरी पूजा 28 तारखेलाच करावी, कारण रात्रीची पूजा अधिक फलदायी मानली जाते.

२. प्रश्न: दुर्गाष्टमीला पूजेसाठी कोणते मुहूर्त शुभ आहेत?

उत्तर: ब्रम्ह मुहूर्त पहाटे 5 वाजून 9 मिनिटांपासून 6 वाजून 3 मिनिटांपर्यंत आहे. विजय मुहूर्त दुपारी 2 वाजून 1 मिनिटांपासून 2 वाजून 43 मिनिटांपर्यंत आहे. गोधूलि मुहूर्त संध्याकाळी 5 वाजून 31 मिनिटांनी 5 वाजून 58 मिनिटांपर्यंत आहे. तर निशिता मुहूर्त रात्री 11 वाजून 48 मिनिटांनी 12 वाजून 42 मिनिटांपर्यंत आहे.

३. प्रश्न: व्यवसायात यश व इच्छापूर्ती होण्यासाठी कोणते सोपे उपाय करावेत?

उत्तर: इच्छापूर्तीसाठी: देवीला फुलांचा हार व लवंग अर्पण करून ११ वेळा “देवी सर्व भूतेषु विद्या रूपेण संस्थिता” हा मंत्र म्हणा. आर्थिक समस्या दूर करण्यासाठी: मुख्यद्वारावर कुंकुमाने देवीचे चरण काढा व तुळशीचे पान-दूध अर्पण करा. व्यवसाय आणि  कार्यसिद्धीसाठी: एकडोळ्याच्या नारळावर ७ वेळा मौली गुंडाळून देवीला अर्पण करा आणि मनोभावे प्रार्थना करा.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...

0
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...
spot_img

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
error: Content is protected !!