Homeदेश-विदेशअरुणाचल प्रदेश या महिलेने शांघाय विमानतळावर 18 तासांच्या भयानक अनुभवाचे वर्णन केले...

अरुणाचल प्रदेश या महिलेने शांघाय विमानतळावर 18 तासांच्या भयानक अनुभवाचे वर्णन केले चीनने तिचा पासपोर्ट नाकारल्यानंतर भारतातील लॉजचा तीव्र निषेध तिच्या पोस्टने लक्ष वेधून घेतले


चीन शांघाय विमानतळावर अरुणाचल प्रदेश : भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं चीनच्या एका कृतीवर स्पष्ट शब्दांत खदखद व्यक्त करत निषेधाचा सूर आळवला आहे. (India Vs China) चीनमध्ये अरुणाचल प्रदेशातील महिलेला जवळपास 18 तासांसाठी शांघाई विमानतळावर (hanghai Pudong International Airport) जवळपास नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं. जिथं तिचा पासपोर्ट अवैध असल्याचं सांगत (Arunachal Pradesh) अरुणाचल प्रदेशचा भाग हा चीनच्या हद्दीत येत असल्याची धक्कादायक भूमिका चीननं मांडली, ज्यानंतर या वादानं डोकं वर काढत हे वक्तव्यच हास्यास्पद असून हे सार्वभौमत्वाचं अस्वीकारार्ह उल्लंघन असल्याची ठाम भूमिका भारतानं मांडली.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

‘अन्न नाकारलं, विचित्र वागणूक दिली… आणि….’

Prema Wangjom Thongdok या युकेमधील एक आर्थिक सल्लागार असून, त्या मुळच्या अरुणाचल प्रदेशच्या पश्चिमेकडे असणाऱ्या पश्चिम केमांग जिल्ह्यातील रुपा येथील रहिवासी असून, लंडनहून जपानच्या दिशेनं त्या 21 नोव्हेंबर रोजी प्रवास करत होत्या. त्यांचा प्रवास चीनमार्गे होणार असल्यानं इथं शांघाई विमानतळावर त्यांना तीन तासांचा लेओव्हर होता. पण, इथं नेहमीच्या सुरक्षा तपासणीदरम्यानच त्यांना काहीतरी सुरळीत सुरू नाहीये याची कुणकूण लागली आणि प्रेमा यांच्यापुढं एकएक संकट उभं राहत गेलं.

जवळपास 18 तासांसाठी प्रेमा थोंगडोक यांना नजरकैदेत ठेवल्यासारखी वागणूक दिली, त्यांना थांबलून विमानतळावरील अधिकाऱ्यांनी चौकशी केली आणि सातत्यानं ‘चीनी पासपोर्टसाठी अर्ज करा’ असं सांगण्ता आलं, कारण अधिकाऱ्यांच्या लेखी त्या ‘भारतीय नसून मूळच्या चीनच्या नागरिक आहेत.’ विमानतळावरी अधिकाऱ्यांनी प्रेमा यांचा पासपोर्ट जप्त करत त्यांना जपानच्या दिशेनं जाणारं विमान पकडून दिलं नाही. अधिकृत जपानी व्हिसा असतानाही त्यांना चीनमध्ये या विचित्र प्रसंगाचा सामना करावा लागला जिथं त्यांना अन्नसुद्धा नाकारण्यात आलं.

‘माझा भारतीय पासपोर्ट तिथं लागू होत नाही, कारण माझं जन्मस्थळ अरुणाचल प्रदेश आहे’, असं X पोस्टमध्ये लिहित इमिग्रेशन विभागातील अधिकारी आणि विमान कंपनीतील कर्मचाऱ्यांनी आपल्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचं प्रेमा यांनी म्हटलं. चीनमध्ये गुगलच्या वापरावर बंदी असल्या कारणानं प्रेमा यांना कोणाशीच संपर्क साधता येईना, प्राथमिक स्वरुपात भारतीय अधिकाऱ्यांपर्यंतही त्या पोहोचू शकत नव्हत्या. बऱ्याच प्रयत्नांनंतर त्यांना युकेतील मित्रांशी संपर्क साधता आला आणि त्यांनी तिथून शांघाईतील भारतीय दूतावासाशी संपर्क साधला.

‘तासाभरात भारतीय अधिकारी विमानतळावर आले, त्यांनी मला खायला दिलं. तिथं चीनच्या यंत्रणांशी संवाद साधला आणि तिथून निघण्यास आपल्याला मदत केली’, असं प्रेमा वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीत म्हणाल्या. हे सर्व इथंच थांबलं नाही, तर त्याना चीनमध्ये पुन्हा एकदा विमानाचं तिकीट काढण्यास भाग पाडत पुढील प्रवास थायलंडवरून करण्यास सांगितलं.

भारताकडून चीनचा कठोर शब्दांत निषेध…

चीनच्या या भूमिकेचा भारतानं कडाडून विरोध करत अरुणाचल प्रदेश गा भारताचा अविभाज्य भाग असून, या राज्यातील नागरिकांकडे इतर भारतीय नागरिकांप्रमाणेच भारतीय पासपोस्ट आहे असंही लक्षात आणून दिलं. दरम्यान घडल्या प्रकरणानंतर प्रेमा यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या संपूर्ण प्रकरणात आपल्याला मदत करणाऱ्या यंत्रणांचे आभार मानले. याशिवाय सोशल मीडिया वर्तुळात त्यांना मिळणाऱ्या पाठिंब्यासाठीसुद्धा त्यांनी सर्वांचे आभार मानले. घडल्या प्रकरणी प्रेमा यांनी भारतीय परराष्ट्र मंत्रालयाला पत्र लिहित या प्रकरणी कठोर कारवाई करत आपल्याला मानसिक छळ, आर्थिक नुकसान आणि प्रवासासमयी निर्माण केलेल्या या अडचणींसाठी चीननं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणीसुद्धा केली.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्राद्धविधीमुळे श्राद्धकर्ता आणि त्याचे पूर्वज यांना आध्यात्मिक लाभ होतो का ?

0
गोवा - पिढ्यानपिढ्या, पितृपक्ष हा पूर्वजांचे (पितरांचे) स्मरण करण्याचा आणि त्यांच्यासाठी श्राद्धविधी करण्याचा काळ म्हणून ओळखला जातो. पूर्वजांच्या आध्यात्मिक कल्याणासाठी आणि सद्गतीसाठी केला जाणारा...

Masik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, sagittarius...

0
Marathi NewsJeevan mantraJyotish newsMasik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, Sagittarius Gemini Cancer Singh Rashi Meen Libra...
spot_img

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...
error: Content is protected !!