Homeदेश-विदेशशवपेटीमध्ये जिवंत सापडलेल्या महिलेला मृत समजल्याने अंत्यसंस्कार करण्यापूर्वी गोंधळ उडाला Marathi News

शवपेटीमध्ये जिवंत सापडलेल्या महिलेला मृत समजल्याने अंत्यसंस्कार करण्यापूर्वी गोंधळ उडाला Marathi News


मृत गृहीत स्त्री: एखादा व्यक्ती मृत पावल्यास त्याच्यावर विधीप्रमाणे अंत्यसंस्कार केले जातात. पण श्वासोच्छ्वास केलेल्या व्यक्तीला अंत्यसंस्काराला नेत असताना तिच्या शरीरात हालचाल जाणवू लागली तर परिस्थिती काय असेल? अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कुठे घडला हा प्रकार? काय झालं पुढे? सविस्तर जाणून घेऊया.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

नोंथाबुरी प्रांतातील वॅट रॅट प्रखोंग थाम बौद्ध मंदिरात अंत्यसंस्काराची पूर्ण तयारी झाली होती. 65 वर्षीय महिलेचा 2 दिवसांपासून श्वास बंद झाला होता. यानंतर ती मृत झाल्याचे कुटुंबियांच्या लक्षात आले. त्यांनी तिचा शेवटचा निरोप घेतला, पांढरी शवपेटी मंदिरात आणली आणि विधी सुरू केले.  इतक्यात अचानक पेटी हलली. मंदिराच्या फेसबुकवर व्हायरल झालेल्या व्हिडिओत ही थरारक घटना कैद झालीय. कर्मचाऱ्यांना प्रथम हा भास वाटला पण पुन्हा आवाज आल्यावर त्यांनी पेटी उघडली आणि महिला जिवंत असल्याचे समजले.

प्रकृती अचानक खालावली

महिलेच्या भावाने या घटनेवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्या गेल्या दोन वर्षांपासून पूर्णपणे अंथरुणाला खिळून होत्या. अलीकडे त्यांची प्रकृती अतिशय गंभीर झाली आणि श्वास-हृदयगती बंद झाल्याचे वाटल्याने कुटुंबीयांनी मृत्यू गृहीत धरल्याचे त्याने सांगितले. आम्ही अवयवदानासाठी बँकॉकच्या रुग्णालयात संपर्क साधला; पण मृत्यू प्रमाणपत्र नसल्याने रुग्णालयाने मृतदेह स्वीकारला नाही. शेवटी मोफत अंत्यविधी करण्यासाठी मंदिरात नेण्याचा निर्णय घेतला गेल्याचे त्याने सांगितले.

डोळे उघडले आणि सर्वांना धक्का

पेटीतून प्रथम हलका आवाज आला. दुसऱ्यांदा आवाज येताच झाकण उघडले असता महिलेचे डोळे थोडे उघडलेले दिसले आणि ती बाहेर येण्याचा प्रयत्न करत असल्याचे लक्षात आल्याची माहिती मंदिराचे महाव्यवस्थापक पिरत सुदथुप यांनी दिली. ही घटना पाहून उपस्थित सर्वजण स्तिमित झाले.

तात्काळ रुग्णालयात दाखल

कर्मचाऱ्यांनी लगेच महिलेला रुग्णालयात हलवले. तिच्या पुढील उपचाराचा पूर्ण खर्च मंदिर उचलेल, असा निर्णय मंदिराचे मठाधिपतींनी जाहीर केला. स्थानिक पातळीवर या घटनेची खूप चर्चा झाली.

कोमात गेलेली अवस्था

वैद्यकीय तज्ज्ञांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. अशा प्रकरणांमध्ये व्यक्ती खूप खोल कोमात (deep coma) जाते आणि श्वास-हृदयगती अत्यंत मंदावल्याने मृत्यू समजला जातो, असे तज्ज्ञ सांगतात. योग्य वेळी लक्षात आल्याने महिलेचा जीव वाचला. मृत्यूची खात्री वैद्यकीय तपासणीनेच करावी, हे या घटनेतून लक्षात येते.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

प्रश्न: थायलंडमध्ये मृत समजलेली महिला शवपेटीत कशी जिवंत सापडली?

उत्तर: नोंथाबुरी प्रांतातील वॅट रॅट प्रखोंग थाम मंदिरात अंत्यसंस्काराची तयारी सुरू असताना शवपेटीतून प्रथम हलका आवाज आला. कर्मचाऱ्यांनी पुन्हा आवाज ऐकल्यावर पेटी उघडली तर ६५ वर्षीय महिला जिवंत होती आणि तिचे डोळे थोडे उघडलेले दिसले. ती बाहेर येण्याचा प्रयत्न करत होती.

प्रश्न: कुटुंबीयांनी तिला मृत का समजले होते?

उत्तर: महिला गेल्या दोन वर्षांपासून अंथरुणाला खिळलेली आणि गंभीर आजारी होती. शेवटचे दोन दिवस श्वास आणि हृदयगती पूर्णपणे बंद झाल्याचे वाटल्याने कुटुंबीयांनी तिचा मृत्यू गृहीत धरला. अवयवदानासाठी रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला; पण मृत्यू प्रमाणपत्र नसल्याने रुग्णालयाने नकार दिला आणि मंदिरात मोफत अंत्यसंस्कारासाठी नेले.

प्रश्न: महिलेच्या पुढील उपचाराचा खर्च कोण उचलणार आहे?

उत्तर: घटना घडल्यानंतर मंदिराच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ महिलेला रुग्णालयात दाखल केले. मंदिराचे मठाधिपतींनी जाहीर केले आहे की, तिच्या संपूर्ण उपचाराचा आणि पुढील खर्च मंदिर पूर्णपणे उचलेल.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्राद्धविधीमुळे श्राद्धकर्ता आणि त्याचे पूर्वज यांना आध्यात्मिक लाभ होतो का ?

0
गोवा - पिढ्यानपिढ्या, पितृपक्ष हा पूर्वजांचे (पितरांचे) स्मरण करण्याचा आणि त्यांच्यासाठी श्राद्धविधी करण्याचा काळ म्हणून ओळखला जातो. पूर्वजांच्या आध्यात्मिक कल्याणासाठी आणि सद्गतीसाठी केला जाणारा...

Masik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, sagittarius...

0
Marathi NewsJeevan mantraJyotish newsMasik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, Sagittarius Gemini Cancer Singh Rashi Meen Libra...
spot_img

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...
error: Content is protected !!