Homeमनोरंजनचायना फ्लाइंग कार एक्सपेंग एरोहट किंमत उत्पादन तपशील तपशील तुम्हाला मराठीत माहित...

चायना फ्लाइंग कार एक्सपेंग एरोहट किंमत उत्पादन तपशील तपशील तुम्हाला मराठीत माहित असणे आवश्यक आहे


फ्लाइंग कार किंमत उत्पादन तपशील तपशील: चीनच्या अग्रगण्य ईलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपनीने ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन सुरू केले आहे. हे पाऊल टेस्ला आणि अमेरिकन कंपनी एलेफ यांच्या प्रकल्पांपूर्वी टाकल्यामुळे जागतिक वाहन उद्योगात उत्सुकता निर्माण झाली आहे. चीनमधील इलेक्ट्रिक वाहन उत्पादक एक्सपेंग मोटर्सची सहयोगी कंपनी ‘एक्सपेंग एरोहॉट’ ने नुकतेच जगातील पहिल्या ‘इंटेलिजंट फ्लाइंग कार फॅक्टरी’मध्ये हे उत्पादन सुरू केले.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

वर्षाला किती उडत्या कार बनवणार?

ही उडणारी कार पुढील पिढीच्या वाहतुकीच्या व्यावसायिकीकरणाच्या दिशेने एक मोठी झेप मानली जात आहे. दक्षिण चीनमधील ग्वांगडोंग शहरातील ग्वांगझूच्या हुआंगपू जिल्ह्यातील 1.2 लाख चौरस मीटरच्या कारखान्यात ‘लैंड एअरक्राफ्ट कॅरियर’ नावाचा पहिला वेगळा करता येणारे ईलेक्ट्रिक विमान मॉड्यूल तयार करण्यात आले आहे. या कारखान्याची वार्षिक उत्पादन क्षमता 10 हजार विमान मॉड्यूल्स इतकी आहे, तर सुरुवातीला दरवर्षी 5 हजार युनिट्स तयार करण्याची क्षमता असेल.

ही वाहने चालकांद्वारेच चालवली जाणार

पूर्ण क्षमतेने उत्पादन सुरू झाल्यावर दर 30 मिनिटांनी एक विमान असेंबल होईल, अशी माहिती कंपनीने दिली आहे. ही वाहने चालकांद्वारेच चालवली जाणार असून, चालकांकडे वाहन चालवण्याचा परवाना आणि हलक्या विमानांचे परवाना (लायसन्स) दोन्ही असणे आवश्यक असेल. ही संपूर्ण कार उडणार नसून तिच्यातील कॅप्यूलसारखा भाग डिटॅच होऊन उड्डाण करु शकेल.

उत्तम प्रतिसाद

1 अब्ज डॉलरहून अधिक ‘प्री-बुकिंग’ ऑर्डर्स एलेफ कंपनीला उडणाऱ्या कारसाठी प्राप्त झाल्या आहेत. 5000 ग्राहकांनी एक्सपेंगला ऑर्डर दिली. चिनी कंपन्यांनी गेल्या आठ महिन्यांत 20.1 लाख इलेक्ट्रिक वाहने निर्यात केली.

कारची किंमत किती?

XPeng AeroHT (X2 आणि Voyager X2)  XPeng ही चीनची इलेक्ट्रिक कार कंपनी असून त्यांची AeroHT सबसिडियरी उडणारी वाहने बनवते. X2 ही दोन सीटर उडणारी कार आहे जी 2024 मध्ये पहिल्यांदा समोर आली. 2026 पासून ही कार विक्रीला उपलब्ध होण्याची शक्यता आहे. या कारची किंमत सुमारे 1-1 मिलियन आरबीएम (अंदाजे भारतीय चलनानुसार 1 कोटी 20 लाख रुपये ते अडीच कोटी रुपये) असू शकते.

इलॉन मस्क म्हणतात…

टेस्लानेही स्वतःच्या उडणाऱ्या कारचा प्रकल्प सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. इलॉन मस्क यांनी सांगितले की, ही कार आतापर्यंतच्या सर्वात लक्षात राहणाऱ्या उत्पादनांपैकी एक ठरेल. टेस्लाची उडणारी कार पुढील काही महिन्यांत समोर येण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, अमेरिकन कंपनी एलेफ एरोनॉटिक्सनेही अलीकडेच स्वतःची उडणारी कार चाचणीसाठी सादर केली असून, तिचे व्यावसायिक उत्पादन लवकरच सुरू होणार आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...

0
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...
spot_img

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
error: Content is protected !!