Homeदेश-विदेशमहाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था सर्वोच्च न्यायालयाच्या निवडणूक ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर सरन्यायाधीश सूर्यकांत...

महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था सर्वोच्च न्यायालयाच्या निवडणूक ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर सरन्यायाधीश सूर्यकांत खंडपीठाचे आदेश पुढील सुनावणी २८ नोव्हेंबरला


महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत सर्वोच्च न्यायालयाचे आदेश: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बाबतची सुप्रीम कोर्टात दुपारी 12 वाजता सुनावणी सुरू झाली. याचिकाकर्तांनी आपली बाजू मांडली. ट्रिपल टेस्ट घ्यावी लागते आणि आरक्षण मर्यादा ओलांडता येत नाही हे खानविलकर यांच्या जजमेंटमध्ये म्हटल्याचा उल्लेख करण्यात आला. राज्य सरकारला फक्त तारीख पाहीजे असते. त्यांना सुनावणी नको असते, अशी आक्रमक भूमिका याचिकाकर्त्यांचे ॲड विकास सिंग यांनी घेतली.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

सरकारने काय सांगितलं? याचिकाकर्त्यांनी काय म्हटलं?

सरकारची बाजू मांडताना महाअधिवक्ता तुषार मेहता यांनी, “नगर पंचायतीचा निकाल 2 डिसेंबरला येणार आहे. हा मुद्दा कोणत्या कोणत्या स्थानिक स्वराज्य संस्थेत आहे याची आम्ही माहिती काढतोय,” असं सांगितलं. तसेच पुढे बोलताना मेहता यांनी, “सेमी अर्बन एरियात निवडणूका जाहीर झाल्या आहेत,” अशी माहितीही दिली. राज्य सरकारकडून पुढील तारीख मागण्यात आली असता याचिकाकर्त्यांनी विरोध केला. प्रत्येकवेळी सरकार अशीच तारीख मागितली जातेय, असा आक्षेप याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी नोंदवला.

चीफ जस्टीस सुर्यकांत काय म्हणाले?

चीफ जस्टीस सुर्यकांत यांनी या प्रकरणासंदर्भात आदेश देताना, “पुढील तारीखेपर्यंत कोणत्याही निवडणुका जाहीर करू नये,” असं सांगितलं. यावर राज्य सरकारच्या वकिलांनी,  “57 जागांवर नगर पालिका आणि नगर परिषद ठिकाणी आरक्षण मर्यादा पार झालीय,” असं राज्य सरकार वकिलांनी सांगितलं. ॲड विकास सिंग यांनी आपली बाजू मांडताना, 50 टक्के ही आरक्षणाची लक्ष्मणरेषा आहे. ती ओलांडता येणार नाही,” असं नमूद केलं. “आम्ही सध्या कोणतेही महत्त्वाचे निर्देश देत नाही. परंतु खाली लोकशाहीच्या प्रक्रियेचे आणि नियमांचे पालन करायला पाहीजे,” असं मत सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलं. यानंतर न्यायालयाने पुढील तारीख देताना शुक्रवारी म्हणजेच 28 तारखेला पुढील सुनावणी होईल असं जाहीर केलं.

मोठ्या खंडपीठांची स्थापना झाली

ॲड मंगेश ससाणे यांनी आजच्या सुनावणीसंदर्भात माहिती देताना, “याचिकाकर्त्याचे वकील यांनी केर्टाच्या निदर्शनास आणून दिले की 50 टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण गेले आहे. 46 ठिकाणी आरक्षण मर्यादा ओलांडली जात आहे, असं राज्य सरकारच्या वकिलांनी सांगितले. इंदिरा जयसिंग यांनी सांगितले की बांठीया कमिशनने ओबीसी आरक्षण मर्यादा ओलांडली आहेत. शेखर नाफडे हे राज्य सरकारचे वकील आहेत. त्यांनी लक्षात आणून दिले की शेड्युल ट्राईब परिसरात आरक्षण पुढे जाते,” असं स्पष्ट केलं. पुढे बोलताना ॲड ससाणे यांनी, “यावर कोर्ट म्हणाले की काही मुद्द्यांवर लार्ज बेंच स्थापन करता येऊ शकेल. जरी निवडणूका झाल्या तरी अंतिम निकालाच्या अधीन राहून निर्णय घेता येऊ शकतो. निवडणूका थांबवता येणार नाही हे कोर्टाकडून निदर्शनास आले. ओबीसी प्रमाण किती आणि एससी एसटी प्रमाण किती हे राज्य सरकारला शुक्रवारी सांगावे लागेल,” असं ॲड मंगेश ससाणे म्हणाले. “काही ग्रे एरिया राहत असेल तर लार्जर बेंचचा विचार करू असं कोर्ट म्हणाले आहे,” असं ॲड मंगेश ससाणेंनी स्पष्ट केलं. कालच सरन्यायाधीश पदाची शपथ घेतलेले सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली.

जाहीर केलेल्या निवडणुका पुढे ढकलल्या जाणार का?

जाहीर झालेल्या म्हणजेच 2 डिसेंबर रोजी मतदान पार पडत असलेल्या निवडणुका पुढे ढकलल्या जातील का? असा सवाल विचारण्यात आला असता ॲड मंगेश ससाणे यांनी तशी शक्यता दिसत नाही असं सांगितलं. न्यायालयाने वर्केबल सोल्यूशन म्हणजेच अंमलात आणता येईल अशा निकालापर्यंत पोहण्यासंदर्भात सकारात्मक दृष्टीकोन दाखवला असल्याने जाहीर केलेला निवडणूक कार्यक्रम रद्द करावा लागेल असं वाटत नसल्याचं ॲड मंगेश ससाणे यांनी स्पष्ट केलं आहे.

त्या वकिलाला सांगितलं मुंबई उच्च न्यायालयात जा

सर्वोच्च न्यायालयात नाशिकमधील चक्रणुक्रणे आरक्षण सोडतीबाबत वकील देवदत्त पालोदकर यांनी सर्वोच्च न्यायालयासमोर सुनावणीदरम्यान मुद्दा उपस्थित केला. कोर्टाने त्यांना मुंबई उच्च न्यायालयात जाण्यास सांगितलं.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

28 नोव्हेंबरचे टॅरो राशिभविष्य: कुंभ राशीच्या लोकांच्या रखडलेल्या पदोन्नतीला मंजुरी मिळेल, कन्या राशीच्या लोकांसाठी...

0
11 तासांपूर्वीकॉपी लिंकशनिवार, 28 नोव्हेंबर रोजी कुंभ राशीच्या सरकारी कर्मचाऱ्यांना रखडलेल्या बढती आणि थकीत भत्त्यांना मंजुरी मिळण्याची दाट शक्यता आहे. मकर राशीच्या ज्या...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना उच्च पद मिळण्याचे योग, तर कन्या राशीच्या लोकांना प्रमोशन...

0
बुधवार, २५ नोव्हेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना उच्च पद किंवा मोठी प्रशासकीय जबाबदारी मिळण्याचे प्रबळ संकेत आहेत. सरकारी कंत्राटे आणि बांधकाम क्षेत्राशी संबंधित...

एका शाश्वत जगाची सुरुवात आंतरिक परिवर्तनातून! – श्री. शॉन क्लार्क

0
‘कॉप-३१’ जागतिक हवामान परिषदेत भारतीय शिष्टमंडळातर्फे भारताचा आध्यात्मिक संशोधन दृष्टिकोन सादर ‘पर्यावरण जाणीव चळवळ’ : एका शाश्वत जगाची सुरुवात आंतरिक परिवर्तनातून! - श्री. शॉन...

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...
spot_img

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
error: Content is protected !!