Homeमहाराष्ट्रShahajiBapu Patil Angry On Mahayuti Maharashtra Politics Marathi News | निवडणुकीच्या आधीच...

ShahajiBapu Patil Angry On Mahayuti Maharashtra Politics Marathi News | निवडणुकीच्या आधीच महायुती तुटणार? शहाजीबापूंकडून ‘ठिणगी’नं ‘वणवा’?


शहाजी बापू पाटील महायुतीच्या नेत्यांमधील अंतर्गत कलह आता चव्हाट्यावर येऊ लागलाय. याला स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत वर्चस्व कायम ठेवण्याचा भाजपचा हट्ट हे निमित्त ठरलंय. सोलापूर जिल्ह्यातील 11 नगरपालिका आणि 1 नगरपंचायतीमध्ये भाजपने मित्रपक्षांच्या ताकदीकडे दुर्लक्ष करून सर्व ठिकाणी आपले उमेदवार दिलेत.सांगोला नगरपालिका निवडणुकीत नैसर्गिक मित्र शिवसेना असतानाही भाजपने शेकापचे आमदार डॉ बाबासाहेब देशमुख यांच्या सोबत युती केली. हे सगळं करताना शिवसेनेचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांना कुठलंही महत्त्व दिलं नाही. त्यामुळे शहाजीबापू नाराज आहेत. काय आहे नेमकं प्रकरण? जाणून घेऊया.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

या राजकारणात एकटे पाडल्याची भावना निर्माण झालेल्या शहाजीबापूंनीही 23 नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष स्वतंत्र शिवसेना चिन्हावर लढवण्याचा निर्णय घेतला. यानंतर शहाजीबापूंनी एक एक गुपिते जाहीरपणे सांगण्यास सुरुवात केली. विधानसभा निवडणुकीत आपल्याविरोधात मंत्री जयकुमार गोरेंनी शेकाप उमेदवाराला पैसा पुरवला असा आरोप शहाजीबापूंनी केलाय. याबाबत निवडणुकीआधीच माहिती असूनही भाजपवर टीका केली नाही याची आठवणही करुन दिली.

सांगोल्यात एकटं पडलेल्या शहाजीबापूंसाठी उपमुख्यमंत्री शिंदेही मैदानात उतरले. सांगोल्यातील सभेत जखमी शेर, ऑलराऊंडर, धोनी, सचिन अशी विशेषणं वापरत शिंदेंनी शहाजीबापूंचं कौतुक केलं.

उपमुख्यमंत्री शिंदेंनी मित्रपक्ष भाजपला लोकसभेला केलेल्या मदतीची आठवण करुन दिली. तसंच शहाजीबापूंच्या पाठिशी ठामपणे असल्याचंही जाहीररित्या सांगितलं.. तर आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा चांगल्या पद्धतीने निवडणूक लढू असा सल्ला महसूलमंत्री बावनकुळेंनी दिलाय.

काही दिवसांपूर्वी मित्रपक्षातील ऑपरेशन लोटसमुळे उपमुख्यमंत्री शिंदेंनी थेट अमित शाहांकडे नाराजी व्यक्त केली होती.. आता नगरपालिका निवडणुका प्रचाराच्या निमित्ताने सांगोल्यातून शहाजी बापू पाटील यांनी मित्रपक्ष भाजपविरोधात मनातील खदखद व्यक्त केलीय. त्यामुळे आगामी काळात शहाजीबापूंच्या या ‘ठिणगी’मुळे महायुतीत ‘वणवा’ तर पेटणार नाही ना याबाबत उलटसुलट चर्चा रंगल्यात.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

प्रश्न: महायुतीमध्ये कलहाचे मुख्य कारण काय आहे?

उत्तर: महायुतीमध्ये कलहाचे मुख्य कारण सोलापूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपचा वर्चस्वाचा हट्ट आहे. भाजपने ११ नगरपालिका आणि १ नगरपंचायतीत मित्रपक्ष शिवसेनेच्या ताकदीकडे दुर्लक्ष करून सर्वत्र स्वतःचे उमेदवार उभे केले. सांगोला निवडणुकीत शिवसेनेऐवजी शेकापच्या आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्याशी युती केल्याने शिवसेनेचे माजी आमदार शहाजीबापू पाटील एकटे पडले आणि त्यांनी स्वतंत्रपणे २३ नगरसेवक व एक नगराध्यक्ष शिवसेना चिन्हावर लढवण्याचा निर्णय घेतला.

प्रश्न: शहाजीबापू पाटील यांनी भाजपवर कोणते आरोप केले?

उत्तर: शहाजीबापूंनी आरोप केला की, विधानसभा निवडणुकीत मंत्री जयकुमार गोरे यांनी शेकाप उमेदवाराला पैसा पुरवला. ही माहिती निवडणुकीआधीच माहीत असूनही त्यांनी भाजपवर टीका केली नाही, कारण महायुती एकत्र लढत होती. आता सांगोल्यात एकटे पडल्याने त्यांनी हे गुपिते जाहीरपणे सांगण्यास सुरुवात केली आणि भाजपविरोधात मनातील खदखद व्यक्त केली.

प्रश्न: या कलहावर उपमुख्यमंत्री शिंदे आणि इतर नेत्यांची प्रतिक्रिया काय आहे?

उत्तर: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगोल्यातील सभेत शहाजीबापूंच्या पाठीशी ठाम उभे राहिले आणि त्यांचे ‘जखमी शेर, ऑलराऊंडर, धोनी, सचिन’ असे कौतुक केले. शिंदेंनी भाजपला लोकसभा निवडणुकीत केलेल्या मदतीची आठवण करून दिली. दुसरीकडे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आरोप-प्रत्यारोप टाळून चांगल्या पद्धतीने निवडणूक लढवण्याचा सल्ला दिला. शिंदेंनी यापूर्वी ऑपरेशन लोटसमुळे अमित शाहांकडे नाराजीही व्यक्त केली होती.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...

0
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...
spot_img

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
error: Content is protected !!