Homeमनोरंजनऑटो न्यूज 5 सीटर बजेट कार मारुती एस प्रेसोची अल्टो k10 शी...

ऑटो न्यूज 5 सीटर बजेट कार मारुती एस प्रेसोची अल्टो k10 शी तुलना


ऑटो न्यूज 5-सीटर कार मारुती अल्टो पेक्षा स्वस्त: भारतीयांची एकंदर मिळकत आणि त्यांच्या गरजा पाहता कार कंपन्यांकडून कायमच वेतनश्रेणीवर ताण येणार नाही अशा कारच्या निर्मितीवर भर देण्यात आला आहे. एक नव्हे तर बऱ्याच कार कंपन्यांनी मध्यमवर्गीयांच्या गरजा लक्षात घेतही कार तयार केल्या आहेत. ज्यामुळं स्वत:ची कार खरेदी करण्याचं स्वप्न ही मंडळी EMI न काढताही पूर्ण करु शकतात. यामध्येच येणारा एक अनेकांच्याच आवडीचा पर्य़ाय म्हणजे, मारुति ऑल्टो के10 (Maruti Alto K10).

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

चार लाख रुपयांहूनही कमी किमतीत विक्री केली जाणारी ही कार अनेक कारप्रेमींच्या आवडीची आणि खिशाला परवडणारी असल्यानं तिला मिळणारी लोकप्रियता कमाल आहे. त्याहूनही स्वस्त अशी मारुतीची आणखी एक कार म्हणजे मारुति एस-प्रेसो (Maruti S-Presso). या कारची किंमत आहे 3.5 लाख रुपये.

स्वस्त आणि मस्त कार…

मारुति ऑल्टोची एक्स शोरुम किंमत आहे, 3,69,600 रुपये. याहूनही स्वस्त कार म्हणजे एस प्रेसो. या कारची एक्स-शोरूम  किंमत आहे 3,49,900 रुपये. 7 विविध रंगांमध्ये कंपनीनं ही कार विक्रीसाठी उपलब्ध केली असून, त्यात एडवांस्ड डुअल जेट, डुअल VVT इंजिन मिळतं. या इंजिनसह कारमधून 5500 आरपीएमवर 49 kW इतकी पॉवर जनरेट केली जाते. या कारच्या इंजिनसह 5-स्पीड आणि AGS ट्रान्समिशनसुद्धा मिळतं.

एस प्रेसोमध्ये एंटी-लॉक ब्रेकिंग सिस्टीमसह इलेक्ट्रॉनिक ब्रेक डिस्ट्रीब्यूशनचंही फिचर उपलब्ध आहे. ज्यामुळं या कारमध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेवरही कंपनीनं भर दिल्याचं कळतं. दोन एअरबॅगसह येणाऱ्या या कारमध्ये हिल होल्ड असिस्टसह रिवर्स पार्किंह सेंसरसुद्धा आहेत. ऑटो गियर शिफ्ट टेक्नोलॉजी असणाऱ्या या कारच्या टॉप व्हेरिएंटची किंमत आहे 5,24,900 रुपये.

मारुतीची स्पर्धा मारुतीशीच!

Car Market मध्ये मारुती एसप्रेसोची स्पर्धा याच कंपनीच्या ऑल्टो के10 या मॉडेलशी आहे. ऑल्टोची एक्स शोरूम किंमत आहे 3.70 लाख रुपये. याशिवाय रेनॉ क्विडसुद्धा कंपनीची स्वस्त कार असून, तिची एक्स शोरूम किंमत आहे 4.30 लाख रुपये. मारुतीच्या कारचं सांगावं तर सामान्यांवर EMI चा भार न देता Car खरेदीचं स्वप्न साकार करण्याची आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव घेण्याची मुभा ही कार देते. त्यामुळं किमान खर्चात कार प्रवासाचा आनंद घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी एसप्रेसो ही कार एक उत्तम पर्याय ठरते.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

मारुती एस-प्रेसो ही कार काय आहे आणि तिची किंमत किती आहे?
मारुती एस-प्रेसो ही मारुती सुजुकीची स्वस्त आणि मध्यमवर्गीयांसाठी तयार केलेली कार आहे. तिची एक्स-शोरूम किंमत 349900 रुपये आहे.

मारुती एस-प्रेसोच्या इंजिन आणि परफॉर्मन्सची वैशिष्ट्ये काय आहेत?
या कारमध्ये एडवांस्ड डुअल जेट, डुअल VVT इंजिन आहे, जे 5500 आरपीएमवर 49 kW पॉवर जनरेट करते. यासोबत 5-स्पीड मॅन्युअल आणि AGS (ऑटो गियर शिफ्ट) ट्रान्समिशन उपलब्ध आहे.

मारुती एस-प्रेसोमध्ये कोणती सेफ्टी फीचर्स आहेत?
कारमध्ये एंटी-लॉक ब्रेकिंग सिस्टीम (ABS) सह इलेक्ट्रॉनिक ब्रेक डिस्ट्रीब्यूशन (EBD), दोन एअरबॅग्स, हिल होल्ड असिस्ट आणि रिवर्स पार्किंग सेंसरसारखी फीचर्स आहेत.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...

0
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...
spot_img

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
error: Content is protected !!