Homeमनोरंजनसेनुरन मुथुसामी कोण आहे ज्याने टीम इंडिया विरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पहिले कसोटी...

सेनुरन मुथुसामी कोण आहे ज्याने टीम इंडिया विरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पहिले कसोटी शतक झळकावले


IND VS SA चाचणी: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India VS South Africa) यांच्यात दोन सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवली जातेय. यातील पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेकडून 30 धावांनी पराभव झाला ज्यामुळे दक्षिण आफ्रिकेने 1-0 ने आघाडी घेतली आहे. सीरिजमधील शेवटचा सामना हा गुवाहाटी येथे खेळवला जात असून रविवारी या सामन्याचा दुसरा दिवस आहे. रविवारी सामन्यादरम्यान भारतीय वंशाच्या दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूने टीम इंडियाला घाम फोडला आणि दमदार शतक ठोकले. पाकिस्तान आणि बांगलादेशनंतर या क्रिकेटरने भारताला सुद्धा जखम दिली. ऑलराऊंडर सेनुरन मुथुसामीने टेस्ट करिअरमधील त्याचं पहिलं शतक ठोकलं आणि टीम इंडियाच्या जखमेवर मीठ चोळलं. पहिल्या दिवशी गुवाहाटी टेस्टमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या 246 धावांवर 6 विकेट पडल्या होत्या. टीम इंडिया दुसऱ्या दिवशी त्यांना 300 च्या आत गुंडाळू शकली असती पण तसं झालं नाही आणि दक्षिण आफ्रिकेचा स्कोअर 400 च्या पार पोहोचला.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

कोण आहे सेनुरन मुथुसामी?

सेनुरन मुथुस्वामी यांचे भारताशी खोलवरचे संबंध आहेत. ते मूळचे तामिळनाडूतील नागापट्टिनमचे आहेत. सेनुरन मुथुस्वामी याचे पूर्वज नागापट्टिनमचे होते. सेनुरन मुथुस्वामी यांच्या कुटुंबातील काही सदस्य अजूनही नागापट्टिनममध्ये राहतात. सेनुरन मुथुस्वामी याचा जन्म 22 फेब्रुवारी 1994 रोजी दक्षिण आफ्रिकेतील नताल प्रांतातील डर्बन येथे झाला. सेनुरन मुथुस्वामी याने 2 ऑक्टोबर 2019 रोजी भारताविरुद्ध विशाखापट्टणम टेस्टमधून पदार्पण केले.

नंबर 7 वर येत झळकावलं शतक :

दक्षिण आफ्रिकेचा ऑलराऊंडर सेनुरन मुथुसामी ने नंबर 7 वर बॅटिंग करण्यासाठी उतरला आणि त्याने टेस्ट क्रिकेटमध्ये त्याचं पहिलं शतक ठोकलं. सेनुरन मुथुसामीने 206 बॉलवर 109 धावा केल्या. दरम्यान 10 चौकार आणि 2 षटकार ठोकले. गेल्या महिन्यात ऑक्टोबर 2025 मध्ये रावळपिंडी येथे पाकिस्तानविरुद्ध झालेल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात सेनुरन मुथुसामीने 89 धावा केल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेने हा कसोटी सामना 8 विकेट्सने जिंकला.

भारताची प्लेईंग 11 : केएल राहुल, यशस्वी जयस्वाल, साई सुदर्शन, ध्रुव जुरेल, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, नितीशकुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज

दक्षिण आफ्रिकेची प्लेईंग 11: एडन मार्कराम, रायन रिकेल्टन, वियान मुल्डर, टेम्बा बावुमा, टोनी डी जोर्झी, ट्रिस्टन स्टब्स, काइल व्हेर्न, मार्को जॅन्सन, सेनुरान मुथुसामी, सायमन हार्मर, केशव महाराज

वारंवार विचारले जाणारे प्रश्न:

सेनुरन मुथुसामी कोण आहे?

सेनुरन मुथुसामी हा दक्षिण आफ्रिकेचा एक ऑलराऊंडर क्रिकेट खेळाडू आहे. तो भारतीय वंशाचा आहे.

सेनुरन मुथुसामीचा जन्म कुठे झाला?

सेनुरन मुथुसामीचा जन्म 22 फेब्रुवारी 1994 रोजी दक्षिण आफ्रिकेतील डर्बन येथे झाला.

सेनुरन मुथुसामीने टेस्ट करिअरमधील त्याचं पहिलं शतक कुठे ठोकलं?

सेनुरन मुथुसामीने टेस्ट करिअरमधील त्याचं पहिलं शतक गुवाहाटी टेस्टमध्ये ठोकलं.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...

0
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...
spot_img

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
error: Content is protected !!