Homeमनोरंजनind vs sa 2री कसोटी पहिल्या दिवशी टीम इंडियाने 247 धावांवर दक्षिण...

ind vs sa 2री कसोटी पहिल्या दिवशी टीम इंडियाने 247 धावांवर दक्षिण आफ्रिकेच्या 6 विकेट्स घेतल्या


IND VS SA: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India VS South Africa) यांच्यात गुवाहाटीच्या मैदानावर टेस्ट सीरिजमधील दुसरा आणि शेवटचा सामना खेळवला जातोय. शनिवार 22 नोव्हेंबर पासून या सामन्याला सुरुवात झाली. पहिल्या दिवशी झालेला टॉस दक्षिण आफ्रिकेने जिंकला आणि त्यांनी प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेची सुरुवात चांगली झाली, टीम इंडियाला त्यांच्या विकेट घेणं सहज शक्य होत नव्हतं. अशावेळी टीम इंडियाचा गोलंदाज कुलदीप यादवने 3 विकेट काढल्या, ज्यामुळे टीम इंडियाचं (Team India) सामन्यातील आव्हान कायम राहीलं. पहिल्या दिवसाच्या अंती टीम इंडियाने 247 धावांवर दक्षिण आफ्रिकेच्या 6 विकेट घेतल्या.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

टॉस जिंकल्यावर फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेचा सलामी फलंदाज ऐडन मार्करम आणि रायन रिकेल्टनने पहिल्या सेशनमध्ये चांगली कामगिरी केली. टी-ब्रेकवर दोघेही नाबाद परततील अशी अपेक्षा होती पण बुमराहने इनिंगच्या शेवटच्या ओव्हरमध्ये मार्करामला (38) बाद करून ही भागीदारी मोडली. भारताकडून दुसऱ्या सत्राची सुरुवात कुलदीप यादवने रिकेल्टनला (35) बाद करून केली, परंतु नंतर त्याला एकही विकेट मिळाली नाही. टेम्बा बावुमा आणि ट्रिस्टन स्टब्स यांनी भारतीय गोलंदाजांना जोरदार प्रत्युत्तर दिले.

शेवटच्या सेशनमध्ये टीम इंडियाच्या गोलंदाजांचा दबदबा :

दिवसाच्या शेवटच्या सेशनमध्ये भारतीय गोलंदाजांचा दबदबा पाहायला मिळाला. आधी रवींद्र जडेजाने सेट झालेल्या टेम्बा बावुमाला (41) पॅव्हेलियनमध्ये धाडले. त्यानंतर ट्रिस्टन स्टब्स (49) हा कुलदीप यादवच्या गोलंदाजीचा शिकार बनला. तो त्याच्या अर्धशतकापासून फक्त एक धाव कमी पडल्याने बाद झाला. त्यानंतर कुलदीप यादवने विआन मुल्डर (13) ला अडकवून बाद केलं. दिवस संपण्याच्या काहीवेळापूर्वी मोहम्मद सिराजने हल्ला बोल जेल आणि टोनी जॉर्जी (28) ला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. दुसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेकडून फलंदाजीची सुरुवात सेनुरन मुथुसामी (25) आणि काइल वेरेयेने (1) हे करतील. टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेला ऑल आउट करण्याच्या उद्देशाने उतरतील.

प्लॅनिंग 11:

केएल राहुल, यशस्वी जैस्वाल, साई सुदर्शन, ध्रुव जुरेल, ऋषभ पंत (कर्णधार/ विकेटकिपर), रवींद्र जडेजा, नितीशकुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज

दक्षिण आफ्रिकेची प्लेईंग 11 :

एडन मार्कराम, रायन रिकेल्टन, वियान मुल्डर, टेम्बा बावुमा (कर्णधार), टोनी डी जॉर्झी, ट्रिस्टन स्टब्स, काइल व्हेर्न (कर्णधार), मार्को जॅन्सन, सेनुरान मुथुसामी, सायमन हार्मर, केशव महाराज

वारंवार विचारले जाणारे प्रश्न:

गुवाहाटी टेस्टमध्ये कोणी जिंकला टॉस?

दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकला आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.

कुलदीप यादवने किती विकेट घेतल्या?

कुलदीप यादवने 3 विकेट घेतल्या.

टेम्बा बावुमाने किती धावा केल्या?

टेम्बा बावुमाने 41 धावा केल्या.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...

0
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...
spot_img

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
error: Content is protected !!