Homeमहाराष्ट्रSharad Pawar On MNS BMC निवडणूक 2025 मध्ये मनसेला महाविकास आघाडीसोबत घ्यायचे...

Sharad Pawar On MNS BMC निवडणूक 2025 मध्ये मनसेला महाविकास आघाडीसोबत घ्यायचे की नाही याचा निर्णय शरद पवारांनी जाहीर केला.


शरद पवार मनसेवर महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य निवडणुकांची जोरदार तयारी सुरु आहे. अशातच चर्चेत आहे ती उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती. ठाकरे बंधू एकत्र आले असले तरी मनसेच्या मार्ग मोकळा झालेला नाही. उद्धव ठाकरेंचा शिवसेना पक्ष हा महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष आहे.  उद्धव ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशी ही महाविकास आघाडी आहे. मनसेला महाविकास आघाडीत घेण्यासा काँग्रेसचा जाहीर विरोध आहे. तर,  दुसरीकडे  मनसेला सोबत घ्यायचे की नाही याबाबत शरद पवार यांनी निर्णय जाहीर केला आहे.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

मनसेसोबत जाण्यास काँग्रेसने स्पष्ट नकार दिला आहे. मारहाणीची भाषा करणा-यांसोबत जाणार नाही, अशी रोखठोक भूमिका खासदार वर्षा गायकवाड यांनी मांडली. तर, उद्धव ठाकरेंशी कोणतंही बोलणं झालं नसल्याचं त्यांनी स्पष्ट केले. तर, मनसेला महाविकास आघाडीत घेण्यासाठी शरद पवार सकारात्मक असल्याची माहिती  सूत्रांकडून मिळाली आहे.  मुंबईत मविआ म्हणून लढण्यासाठी पवार आग्रही असल्याची माहिती समोर येत आहे.

मोर्चात एकत्र, निवडणूक वेगळी का लढवता? असं शरद पवारांचं मत असल्याची माहिती आहे.  महाविकास आघाडी म्हणून मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढवली पाहिजे अस शरद पवार यांचं मत आहे.  मतदार यादीच्या घोळाच्या संदर्भात आणि मतचोरी च्या संदर्भात एकत्रित येत सत्याचा मोर्चा काढता आणि मग निवडणूक का वेगळी लढवावी असा मुद्दा शरद पवार यांनी उपस्थित केला.   महाविकास आघाडी मधे मनसे ला सोबत घेऊन निवडणूक लढवण्याच्या संदर्भात शरद पवार सकारात्मक आहेत.

दरम्यान, मुंबई महापालिका निवडणुक एकक्ष लढण्याबाबाबत महायुतीत चर्चा सुरु आहे.  शरद पवारांनी काँग्रेसशी फोनवरुन चर्चा केली. मुंबई महानगरपालिका कशी लढायची यासंदर्भात सोमवारी किंवा मंगळवारी बैठक होणार आहे. दोन दिवसांपूर्वी शरद पवारांची मुंबई कांग्रेसच्या नेत्यांनी भेट घेतली होती. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक  शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत लढण्यास काँग्रेस नेत्यांनी हिरवा कंदिल दिला होता. मात्र, शरद पवार काँग्रेस सोबत आघाडी करणार की महाविकास आघाडी म्हणून नव्याने आणखी काही प्रयत्न करणार याबाबत स्पष्टता नव्हती दरम्यान आता पवारांनीच काँग्रेस नेत्यांना फोन केल्यानं पुढील बैठकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या आघाडीबाबत चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

मुंबई महापालिकेत काँग्रेसला सोबत घेण्यासाठी उद्धव ठाकरे आग्रही असल्याची माहिती आहे. त्यासाठी उद्धव ठाकरे काँग्रेस हायकंमाडसोबत संपर्कात असल्याची माहिती आहे. मनसेला सोबत घेण्यास काँग्रेसनं स्पष्ट नकार दिलाय. मात्र निवडणुकीत फाटाफूट झाल्यास तोटा होऊ शकतो असा युक्तीवाद करत उद्धव ठाकरे काँग्रेस हायकमांडच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान ठाकरेंच्या एका नेत्यानंही वर्षा गायकवाड यांच्यासोबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीये.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...

0
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...
spot_img

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
error: Content is protected !!